विकिपीडिया:दिनविशेष/सप्टेंबर
- इ.स.पू. ५५०९ - बायझेन्टाईन साम्राज्यातील समजाप्रमाणे या दिवशी सृष्टीची रचना झाली.
- १९२३ - टोक्यो आणि योकोहामा परिसरात भूकंप १,०५,००० ठार.
- १९७४ - लॉकहीड एस.आर.-७१ ब्लॅकबर्ड (चित्रीत) प्रकारच्या विमानाने न्यू यॉर्क ते लंडन अंतर (~५५७० कि.मी) १ तास ५४ मिनिटे व ५६.४ सेकंदात तोडून जागतिक विक्रम स्थापला.
- १९८३ - शीत युद्ध - कोरियन एर फ्लाईट ००७ हे बोईंग ७४७ प्रकारचे विमान सोवियेत हद्दीत घुसल्याने सोवियेत संघाच्या लढाऊ विमानांनी तोडून पाडले. २६९ ठार.
जन्म
- १८७५ - एडगर राइस बरोज, अमेरिकन लेखक.
- १९०६ - होआकिन बॅलाग्वेर, डॉमिनिकन प्रजासत्ताकचा राष्ट्राध्यक्ष.
- १९२६ - अब्दुर रहमान बिश्वास, बांगलादेशचा राष्ट्राध्यक्ष.
- १९४६ - रोह मू-ह्युन, दक्षिण कोरियाचा राष्ट्राध्यक्ष.
- १९४९ - पी.ए. संगमा, भारतीय राजकारणी.
- १९५१ - डेव्हिड बेरस्टो, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९७६ - क्लेर कॉनोर, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
मृत्यू
- ११५९ - पोप एड्रियान चौथा.
- १२५६ - कुजो योरित्सुने, जपानी शोगन.
- १५७४ - गुरू अमरदास, तिसरे शीख गुरू.
- १५८१ - गुरू रामदास, चौथे शीख गुरू.
- १७१५ - लुई चौदावा, फ्रांसचा राजा.
मागील दिनविशेष: ऑगस्ट ३१ - ऑगस्ट ३० - ऑगस्ट २९
- १९४५ - जपानी आत्मसमर्पणाचा करारनामावर स्वाक्षरी करुन (चित्रीत) औपचारिकपणे दुसरे महायुद्ध समाप्त झाले.
- १९४६ - भारताचे अंतरिम सरकार स्थापन झाले.
- २००८ - गूगल ने गूगल क्रोम हे आंतरजाल न्याहाळक सुरु केले.
जन्म:
- १८५३ - विल्हेल्म ऑस्टवाल्ड, नोबेल पारितोषिक विजेता जर्मन रसायनशास्त्रज्ञ.
- १९५२ - जिमी कॉनोर्स, अमेरिकेचा टेनिस खेळाडू.
- १९६६ - सलमा हायेक, मेक्सिकोची अभिनेत्री.
- १९८८ - इशांत शर्मा, भारतीय क्रिकेट खेळाडू.
मृत्यू:
- १९६९ - हो चि मिन्ह, व्हियेतनामचा राष्ट्राध्यक्ष.
- १९७३ - जे.आर.आर. टॉल्कीन, इंग्लिश लेखक.
- २००९ - वाय.एस. राजशेखर रेड्डी, आंध्र प्रदेशचा मुख्यमंत्री.
- २०११ - श्रीनिवास खळे, मराठी संगीतकार
मागील दिनविशेष: सप्टेंबर १ - ऑगस्ट ३१ - ऑगस्ट ३०
- ३०१ - सान मारिनो, (ध्वज चित्रीत) जगातील सर्वात लहान राष्ट्रांपैकी एक आणि जगातील सर्वात जुने प्रजासत्ताक जे अजूनही अस्तित्वात आहे, याची स्थापना सेंट मारिनस यांनी केली.
- २०१६ - एकत्रितपणे जगातील ४०% कार्बन उत्सर्जनासाठी जबाबदार असलेल्या यु.एस.ए. आणि चीन दोघांनी पॅरिस जागतिक हवामान कराराला औपचारिकपणे मान्यता दिली.
जन्म:
- १०३४ - गो-सांजो, जपानी सम्राट.
- १८६९ - फ्रित्झ प्रेगल, नोबेल पारितोषिक विजेता स्लोव्हेकियाचा रसायनशास्त्रज्ञ.
- १८७५ - फर्डिनांड पोर्श, ऑस्ट्रियाचा कार-अभियंता.
- १९०५ - कार्ल डेव्हिड अँडरसन, नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ.
- १९३८ - रायोजी नोयोरी, नोबेल पारितोषिक विजेता जपानी रसायनशास्त्रज्ञ.
मृत्यू:
- १६५८ - ऑलिव्हर क्रॉमवेल, इंग्लंडचा राज्यकर्ता.
- १९४८ - एडवर्ड बेनेस, चेकोस्लोव्हेकियाचा दुसरा राष्ट्राध्यक्ष.
- १९६७ - अनंत हरी गद्रे, मराठी समाजसुधारक.
- २००५ - विल्यम रेह्नक्विस्ट, अमेरिकेचा सर्वोच्च न्यायाधीश.
मागील दिनविशेष: सप्टेंबर २ - सप्टेंबर १ - ऑगस्ट ३१
- १८८८ - जॉर्ज ईस्टमनने कोडॅकचा ट्रेडमार्क नोंदणीकृत केला आणि फिल्म वापरणाऱ्या कॅमेऱ्यासाठी पेटंट प्राप्त केले.
- १९९८ - लोकप्रिय टीव्ही गेम शो हू वांट्स टू बी अ मिलियनेअर? (चित्रीत) प्रथमच प्रसारित झाला.
जन्म:
- १०३४ - गो-सांजो, जपानी सम्राट.
- १८२५ - दादाभाई नौरोजी, भारतीय विचारवंत, शिक्षणतज्ज्ञ, स्वातंत्र्यलढ्यातले राजकारणी.
- १८६९ - फ्रित्झ प्रेगल, नोबेल पारितोषिक विजेता स्लोव्हेकियाचा रसायनशास्त्रज्ञ.
- १८७५ - फर्डिनांड पोर्श, ऑस्ट्रियाचा कार-अभियंता.
मृत्यू:
- १६५८ - ऑलिव्हर क्रॉमवेल, इंग्लंडचा राज्यकर्ता.
- १९९१ - फ्रँक काप्रा, अमेरिकन चित्रपट दिग्दर्शक.
- २००५ - विल्यम रेह्नक्विस्ट, अमेरिकेचा सर्वोच्च न्यायाधीश.
मागील दिनविशेष: सप्टेंबर ३ - सप्टेंबर २ - सप्टेंबर १
- भारतात शिक्षक दिन
- १९७२ - ब्लॅक सप्टेंबर नावाने वावरणार्या पॅलेस्टाईनच्या अतिरेक्यांनी ऑलिंपिक खेळात भाग घेणाऱ्या इस्रायेलच्या खेळाडूंना ओलिस ठेऊन म्युनिच हत्याकांडची सुरुवात झाली.
- १९६० - महम्मद अली (चित्रीत) यांनी रोममधील ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये लाइट हेवीवेट बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले.
- १९७७ - व्हॉयेजर १ या अंतराळयानाचे प्रक्षेपण
- १९८४ - एस.टी.एस. ४१-डी-स्पेस शटल डिस्कव्हरीने आपली पहिली अंतराळयात्रा पूर्ण केली
जन्म:
मृत्यू:
- ११६५ - निजो, जपानी सम्राट.
- १९०६ - लुडविग बोल्ट्झमन, ऑस्ट्रियन भौतिकशास्त्रज्ञ.
- १९९७ - मदर तेरेसा, समाजसेविका
मागील दिनविशेष: सप्टेंबर ४ - सप्टेंबर ३ - सप्टेंबर २
- १५२२ - फर्डिनांड मेजेलनच्या मोहिमेतील व्हिक्टोरिया हे जगप्रदक्षिणा करणारे पहिले जहाज स्पेनला पोचले.
- १८८८ - चार्ल्स टर्नरने एकाच मोसमात २५० क्रिकेट बळी घेण्याचा विक्रम रचला.
- १९०१ - अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष विल्यम मॅककिन्लीवर खूनी हल्ला (कलात्मक चित्रण चित्रीत) ज्याने आठ दिवसात त्यांचा मृत्यू झाला.
- १९६८ - स्वाझीलँडला युनायटेड किंगडमकडुन स्वातंत्र्य.
जन्म:
- १६६६ - आयव्हन पाचवा, रशियाचा झार.
- १७६६ - जॉन डाल्टन, ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ व भौतिकशास्त्रज्ञ.
- १८९२ - सर एडवर्ड ऍपलटन, नोबेल पारितोषिक विजेता ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ.
- १९५४ - कार्ली फियोरिना, अमेरिकन उद्योगपती.
- १९५७ - होजे सॉक्रेटिस, पोर्तुगालचा पंतप्रधान.
- १९७१ - देवांग गांधी, भारतीय क्रिकेट खेळाडू.
मृत्यू:
- ९७२ - पोप जॉन तेरावा.
- १९३८ - सली प्रुडहॉम, नोबेल पारितोषिक विजेता फ्रेंच लेखक.
- १९६६ - हेन्ड्रिक व्हेरवोर्ड, दक्षिण आफ्रिकेचा पंतप्रधान.
- १९९० - लेन हटन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
मागील दिनविशेष: सप्टेंबर ५ - सप्टेंबर ४ - सप्टेंबर ३
- १८२१ - ग्रान कोलंबियाच्या प्रजासत्ताकची स्थापना.
- १९४० - दुसरे महायुद्ध-ब्लिट्झ - जर्मनीने लंडनवर बॉम्बफेक सुरू केली. यानंतर ५६ अजून रात्री सतत बॉम्बवर्षा होत राहिली.
- १९७९ - क्रायस्लर कॉर्पोरेशनने दिवाळे न काढण्याबद्दल अमेरिकेच्या सरकारकडे एक अब्ज डॉलरची मागणी केली.
- १९९८ - लॅरी पेज आणि सेर्गे ब्रिनने (दोघे चित्रीत) गूगलची स्थापना केली.
जन्म:
- १५३३ - एलिझाबेथ पहिली, इंग्लंडची राणी.
- १८३६ - हेन्री कॅम्पबेल-पुलमन, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान.
- १८५७ - जॉन मॅकइलरेथ, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १९१२ - डेव्हिड पॅकार्ड, अमेरिकन संशोधक, उद्योगपती.
मृत्यू:
- १५५२ - गुरु अनंग देव, दुसरे शीख गुरु.
- १६३२ - सुसेन्योस, इथियोपियाचा सम्राट.
- १७७७ - टेकले हयामानोत पहिला, इथियोपियाचा सम्राट.
- १८०९ - बुद्ध योद्फा चुलालोके, थायलंडचा राजा.
मागील दिनविशेष: सप्टेंबर ६ - सप्टेंबर ५ - सप्टेंबर ४
- १८३१ - विल्यम चौथा इंग्लंडच्या राजेपदी.
- १९०० - अमेरिकेच्या गॅल्व्हेस्टन शहरावर आलेल्या हरिकेनमुळे ८,००० ठार.
- १९४५ - शीतयुद्ध-अमेरिकेचे सैनिक दक्षिण कोरियात दाखल.
- १९६६ - स्टार ट्रेक मालिकेच्या पहिल्या भागाचे प्रसारण.
जन्म:
- ११५७ - रिचर्ड पहिला, इंग्लंडचा राजा.
- १२०७ - सांचो दुसरा, पोर्तुगालचा राजा.
- १८३० - फ्रेडरिक मिस्त्राल, नोबेल पारितोषिक विजेता फ्रेंच कवी.
- १९३३ - आशा भोसले, भारतीय पार्श्वगायक
मृत्यू:
- ७०१ - पोप सर्जियस पहिला.
- १९६५ - हेर्मान स्टॉडिंगर, नोबेल पारितोषिक विजेता जर्मन रसायनशास्त्रज्ञ.
- १९६० - फिरोज गांधी, भारतीय स्वातंत्र्य सैनिक, पत्रकार व राजकारणी.(चित्रित)
- १९८० - विल्लर्ड लिब्बी, नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ.
- १९८१ - हिदेकी युकावा, नोबेल पारितोषिक विजेता जर्मन भौतिकशास्त्रज्ञ.
मागील दिनविशेष: सप्टेंबर ७ - सप्टेंबर ६ - सप्टेंबर ५
- १५४३ - मेरी स्टुअर्ट, नऊ महिन्यांची असताना तिला स्कॉटलंडची राणी म्हणून घोषित करण्यात आले.
- १९९४ - सचिन तेंडुलकरने (चित्रित) श्रीलंकेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध आपल्या एकदिवसीय क्रिकेटमधील कारकिर्दीतले पहिले शतक ठोकले
- २००१ - नॉर्दन अलायन्सचा प्रमुख अहमदशहा मसूद याची तालिबानकडून हत्या करण्यात आली.
- २००१ - व्हेनिस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मीरा नायर यांच्या मॉन्सून वेडिंग चित्रपटास सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा गोल्डन लायन पुरस्कार मिळाला.
जन्म:
- १८२८ - लिओ टॉलस्टॉय, रशियन लेखक व तत्त्वज्ञ.
- १९४१ - डेनिस रिची, अमेरिकन संगणकशास्त्रज्ञ.
- १९५० - श्रीधर फडके, मराठी गायक.
- १९७४ - विक्रम बात्रा, भारतीय थलसेना अधिकारी.
मृत्यू:
- १९०९ - एडवर्ड हेन्री हॅरीमान, अमेरिकन रेल्वे उद्योगपती.
- १९७६ - माओ त्से तुंग, आधुनिक चीनचा शिल्पकार, चिनी नेता.
मागील दिनविशेष: सप्टेंबर ८ - सप्टेंबर ७ - सप्टेंबर ६
- १९६६ - भारतीय संसदेने पंजाब पुनर्रचना कायद्याला संमत केला व पूर्व पंजाबचे (नकाशा चित्रीत) विघटन होऊन पंजाब व हरियाणा अशी दोन राज्ये आणि चंदिगढ केंद्र शासित प्रदेश अस्तित्त्वात आले.
- १९७४ - गिनी-बिसाउला पोर्तुगालपासून स्वातंत्र्य.
- १९७५ - व्हायकिंग-२ हे अमेरिकन मानवविरहित अंतराळयान मंगळ ग्रहाकडे झेपावले.
जन्म:
- १४८७ - पोप जुलियस तिसरा
- १८८७ - गोविंद वल्लभ पंत, भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील नेते.
- १९३४ - रॉजर मारिस, अमेरिकन बेसबॉल खेळाडू.
- १९४८ - भक्ती बर्वे, मराठी अभिनेत्री.
मृत्यु:
- ९५४ - लुई चौथा, फ्रांसचा राजा.
- १९६४ - पं. श्रीधर पार्सेकर, नामवंत व्हायोलिनवादक.
- १९८३ - फेलिक्स ब्लॉक, नोबेल पारितोषिक विजेता स्विस भौतिकशास्त्रज्ञ.
मागील दिनविशेष: सप्टेंबर ९ - सप्टेंबर ८ - सप्टेंबर ७
- १८९३ - 'शिकागोतील सर्वधर्मपरिषदेत' स्वामी विवेकानंदांचे ऐतिहासिक भाषण.
- १९४२ - सुभाषचंद्र बोस व आझाद हिंद सेनेने जन गण मन हे गीत राष्ट्रगीत म्हणून पहिल्यांदा गायले.
- १९९७ - नासाचे मार्स ग्लोबल सर्व्हेयर हे अंतराळयान मंगळावर पोचले.
- २००१ - वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या जुळ्या इमारतींमध्ये दहशतवाद्यांनी दोन प्रवासी विमाने घुसवून केलेल्या हल्ल्यात (चित्रीत) हजारो लोक मृत्युमुखी.
जन्म:
- १८९५ - आचार्य विनोबा भावे, भूदान चळवळीचे प्रणेते.
- १९०१ - आत्माराम रावजी देशपांडे उर्फ कवि अनिल, मराठी कवी
- १९१७ - फर्डिनांड मार्कोस, फिलिपाईन्सचा राष्ट्राध्यक्ष.
मृत्यु:
- १६८० - गो-मिझुनू, जपानी सम्राट.
- १९४८ - मुहम्मद अली जीना, पाकिस्तानचे संस्थापक.
- १९८७ - महादेवी वर्मा, हिंदी कवयित्री.
मागील दिनविशेष: सप्टेंबर १० - सप्टेंबर ९ - सप्टेंबर ८
- २००२ - कल्पना-१ (चित्रीत) या भारताच्या हवामानसंशोधनउपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण.
- २००७ - फिलीपिन्सचे माजी राष्ट्राध्यक्ष जोसेफ एस्ट्राडा यांना भ्रष्टाचारप्रकरणी दोषी ठरविण्यात आले.
जन्म
- १४९४ - फ्रांसिस पहिला, फ्रांसचा राजा.
- १५७५ - हेन्री हडसन, इंग्लिश शोधक.
- १९१३ - जेसी ओवेन्स, अमेरिकन धावपटू.
- १९२० - फिरोज गांधी, भारतीय स्वातंत्र्य सैनिक, पत्रकार व राजकारणी
- १९३२ - वकार हसन, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
मृत्यू:
- १९५२ - सवाई गंधर्व उर्फ रामभाऊ कुंदगोळकर
- १९८० - सतीश दुभाषी रंगभूमी, चित्रपटसृष्टीतील अभिनेते.
- १९९२ - पंडित मल्लिकार्जुन मन्सूर, गायक.
- १९९६ - श्रीमती पद्मा चव्हाण नाट्य, चित्रपट अभिनेत्री.
मागील दिनविशेष: सप्टेंबर ११ - सप्टेंबर १० - सप्टेंबर ९
- १५०१ - इटालियन शिल्पकार मिकेलेंजेलोने डेव्हिडच्या (चित्रीत) पुतळ्यावर काम सुरू केले.
- १९२९ - लाहोर कटातील आरोपी जतींद्रनाथ दास यांनी तुरुंगातील जुलुमाचा निषेध म्हणून केलेल्या उपोषणात त्यांचा त्रेसष्टाव्या दिवशी मृत्यू.
- १९४८ - ऑपरेशन पोलो: भारतीय हैदराबाद मुक्तिसंग्रामात कारवाई सुरू व भारतीय सैन्याने राज्यात प्रवेश केला.
जन्म
- १८५१ - वॉल्टर रीड, अमेरिकन सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ.
- १८५७ - मिल्टन हर्शी, अमेरिकन उद्योगपती.
- १८७६ - पर्सी ट्वेंटीमन-जोन्स, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
- १८८२ - रमोन ग्राउ, क्युबाचा राष्ट्राध्यक्ष.
- १९६७ - मायकेल जॉन्सन, अमेरिकन धावपटू.
मृत्यू:
- ८१ - टायटस, रोमन सम्राट.
- १५९८ - फिलिप दुसरा, स्पेनचा राजा.
- १९२८ - श्रीधर पाठक, हिंदी कवी.
- १९३२ - प्रभा अत्रे, भारतीय शास्त्रीय गायक
- १९७१ - केशवराव दाते, रंगभूमीवरील अभिनेते.
मागील दिनविशेष: सप्टेंबर १२ - सप्टेंबर ११ - सप्टेंबर १०
- १७५२ - ब्रिटिश साम्राज्याने ग्रेगोरियन दिनदर्शिकेचा उपयोग सुरू केला व या वर्षातून ११ दिवस गाळले. १४ सप्टेंबरच्या आधीचा दिवस २ सप्टेंबर होता.
- १८२९ - एड्रियानोपलचा तह - रशिया व ओट्टोमन साम्राज्यातील युद्ध संपुष्टात आले.
- १९५९ - सोव्हिएत संघाचे अंतरिक्षयान लुना २ (चित्रीत) ही चंद्रापर्यंत पोचणारी सर्वप्रथम मानवनिर्मित वस्तू होती.
जन्म
- १७७४ - लॉर्ड विल्यम बेंटिंक, भारताचा १४वा गव्हर्नर जनरल
- १८८४ - डेव्हिड स्मिथ, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १९८४ - आयुष्मान खुराणा, भारतीय अभिनेता
मृत्यू
- ५८५ - बिदात्सु, जपानी सम्राट.
- ८९१ - पोप स्टीवन पाचवा
- १९०१ - विल्यम मॅककिन्ली, अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष.
- २०११ - हरिश्चंद्र माधव बिराजदार, मराठी पहिलवानी कुस्तीगीर.
मागील दिनविशेष: सप्टेंबर १३ - सप्टेंबर १२ - सप्टेंबर ११
- प्रतिवार्षिक दिनपालन - अभियंता दिन (भारत)
- १९३५ - स्वस्तिकचे चिन्ह असलेला ध्वज नाझी जर्मनीने आपला राष्ट्रध्वज म्हणून अंगीकारला.
- १९४७ - जपानला टायफून कॅथलीन या मोठ्या वादळाचा तडाखा ज्यात १,०७७ ठार.
- २००८ - लेहमान ब्रदर्स या कंपनीने दिवाळे काढले.
जन्म
- १२५४ - मार्को पोलो, इटालियन फिरस्ता.
- १८६० - सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैया, भारतीय अभियंता. (चित्रित)
- १८७६ - शरदचंद्र चट्टोपाध्याय, बंगाली साहित्यिक.
- १९०९ - सी.एन. अण्णादुराई, तामीळनाडूचे मुख्यमंत्री.
मृत्यू
- १९२६ - रुडॉल्फ क्रिस्टॉफ युकेन, जर्मन तत्वज्ञानी आणि नोबेल पारितोषिक विजेते
- १९७३ - गुस्ताफ सहावा अॅडॉल्फ, स्वीडनचा राजा.
- २००८ - गंगाधर गाडगीळ, मराठी लेखक
मागील दिनविशेष: सप्टेंबर १४ - सप्टेंबर १३ - सप्टेंबर १२
- ओझोन लेयरच्या संरक्षणासाठी आंतरराष्ट्रीय दिवस
- १९०८ - जनरल मोटर्सची स्थापना.
- १९२० - न्यू यॉर्कच्या वॉल स्ट्रीट भागातील जे. पी. मॉर्गन इमारतीसमोर घोडागाडीत ठेवलेल्या बॉम्बचा स्फोट (चित्रित). ३८ ठार, ४०० जखमी.
- १९६३ - झेरॉक्स कॉर्पोरेशनच्या "झेरॉक्स ९१४" (चित्रित) या प्रतिमुद्रक यंत्राचे पहिले प्रात्यक्षिक.
जन्म:
- १८५३ - आल्ब्रेख्त कॉसेल, नोबेल पारितोषिक विजेता जर्मन डॉक्टर.
- १९१६ - एम.एस. सुब्बलक्ष्मी, कर्नाटक शैलीतील गायिका.
- १९३१ - जॉर्ज सुदर्शन, पद्मविभूषण पुरस्कारविजेते भारतीय भौतिकशास्त्रज्ञ
- १९४२ - ना. धों. महानोर, निसर्ग कवी, शेतकरी, आमदार.
मृत्यू:
- ९६ - डॉमिशयन, रोमन सम्राट.
- १९८९ - हेमंत कुमार मुखोपाध्याय, प्रसिद्ध गायक, संगीतकार.
- १९९४ - जयवंत दळवी, लेखक.
मागील दिनविशेष: सप्टेंबर १५ - सप्टेंबर १४ - सप्टेंबर १३
- प्रतिवार्षिक दिनपालन - मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन
- १७८७ - फिलाडेल्फियामध्ये अमेरिकेच्या संविधानावर स्वाक्षरी झाली.
जन्म:
- १८७९ - पेरियार, भारतीय समाजसुधारक, राजकीय नेते
- १८८५ - केशव सीताराम ठाकरे उर्फ प्रबोधनकार ठाकरे; पत्रकार, समाजसुधारक, वक्ते.
- १९३० - लालगुडी जयरामन; भारतीय व्हायोलिन वादक.
- १९३८ - दिलीप पुरुषोत्तम चित्रे; कवी, कथाकार, समीक्षक.
- १९५० - नरेंद्र मोदी; भारताचे १४वे पंतप्रधान.(चित्रित)
मृत्यू:
- १६३२- सुसेन्योस; इथियोपियाचा सम्राट
- १९९९ - हसरत जयपुरी; गीतकार.
- २००२ - वसंत बापट; कवी.
मागील दिनविशेष: सप्टेंबर १६ - सप्टेंबर १५ - सप्टेंबर १४
- १५०२ - क्रिस्टोफर कोलंबस आपल्या चौथ्या व शेवटच्या सफरीत कोस्टा रिकाला पोचला.
- १८०९ - लंडनमधील रॉयल ऑपेरा हाऊस (चित्रित) उघडले.
- २०१६ - जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी गटाने भारतातील जम्मू आणि काश्मीरमधील उरी मुख्यालयावर हल्ला करून भारतीय लष्कराचे एकोणीस जवानांचा मृत्यू झाला.
जन्म:
- १७०९ - सॅम्युएल जॉन्सन, इंग्लिश कवी, पत्रकार, समीक्षक.
- १८९५ - जॉन डिफेनबेकर, कॅनडाचा १३वा पंतप्रधान.
- १९७१ - लान्स आर्मस्ट्रॉँग, सायकल शर्यत विश्वविजेता.
मृत्यू:
- १९९५ - प्रभुलाल गर्ग उर्फ काका हाथरसी, हिंदी कवी.
- २००२ - शिवाजी सावंत, लेखक.
- २००४ - डॉ. भालचंद्र दिनकर फडके, समीक्षक आणि लेखक.
मागील दिनविशेष: सप्टेंबर १७ - सप्टेंबर १६ - सप्टेंबर १५
- १८९३ - न्यूझीलंडमध्ये, निवडणूक कायद्याला गव्हर्नरने संमती दिली आणि सर्व महिलांना मतदानाचा अधिकार दिला.
- १९८२ - स्कॉट फॅहलमन यांनी कार्नेगी मेलॉन युनिव्हर्सिटी बुलेटिन बोर्डवर पहिले इमोटिकॉन :-) आणि :-( पोस्ट केले.
- २००७ - ट्वेंटी२० क्रिकेटमध्ये एकाच षटकात सहा षटकार मारणारा पहिला क्रिकेटखेळाडू व क्रिकेटच्या इतिहासातील सर्वाधिक वेगवान अर्धशतक नोंदवण्यासाठी (फक्त १२ चेंडू) अशी कामगिरी युवराजसिंहने (चित्रित) केली.
जन्म:
- ८६६ - लिओ सहावा, बायझेन्टाईन सम्राट.
- १५५१ - तिसरा हेन्री, फ्रान्सचा राजा.
- १८६७ - पंडित श्रीपाद दामोदर सातवळेकर - मराठी चित्रकार, वेदाभ्यासक.
मृत्यू:
- २००१ - अनंतराव दामले, प्रभात फिल्म कंपनीचे संचालक.
- २००२ - प्रिया तेंडुलकर, अभिनेत्री .
- २००७ - दत्ता डावजेकर ऊर्फ डीडी, संगीतकार.
मागील दिनविशेष: सप्टेंबर १८ - सप्टेंबर १७ - सप्टेंबर १६
- ११८७ - सालादिनने जेरुसलेमवर आक्रमण केले.
- १८५७ - १८५७ चे स्वातंत्र्ययुद्ध - हुमायूनच्या कबरीजवळ बहादूरशाह जफरला ब्रिटीश सैन्याने पकडले (चित्रित).
- २००४ - जीसॅट-३ उर्फ एज्युसॅट या उपग्रहाचे श्रीहरिकोटा येथील तळावरून यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले.
जन्म:
- १८९७ - नानासाहेब परुळेकर, मराठी पत्रकार.
- १९२२ - द. न. गोखले, चरित्र वाङ्मयाचे संशोधक व मराठी शुद्धलेखनाचे ज्येष्ठ अभ्यासक.
मृत्यू:
मागील दिनविशेष: सप्टेंबर १९ - सप्टेंबर १८ - सप्टेंबर १७
- १९३९ - रोमेनियाच्या पंतप्रधान आर्मांड कॅलिनेस्कुची हत्या.
- २००३ -नासाच्या 'गॅलेलियो' (चित्रित) या अंतराळयानाने गुरूच्या वातावरणात प्रवेश करीत 'प्राणार्पण' केले.
- २०१३ - केन्याच्या नैरोबी शहरात मुस्लिम दहशतवाद्यांनी वेस्टगेट मॉलवर हल्ला करून ७२ पेक्षा अधिक लोकांना ठार केले. सुमारे १७५ जखमी.
जन्म:
- १९३२ - पंडित जितेंद्र अभिषेकी, भारतीय-मराठी गायक, मराठी संगीतकार.
- १९५० - बिल मरे, अमेरिकन अभिनेता.
- १९७९ - क्रिस गेल, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
मृत्यू:
- इ.स.पू. १९ - व्हर्जिल, रोमन कवि.
- १७४३ - सवाई जयसिंह, जयपूर संस्थानाचा राजा.
- १९९९ - पुरुषोत्तम दारव्हेकर, मराठी नाटककार, मराठी नाट्यदिग्दर्शक.
मागील दिनविशेष: सप्टेंबर २० - सप्टेंबर १९ - सप्टेंबर १८
- १८२७ - जोसेफ स्मिथ जुनियरच्या म्हणण्यानुसार मोरोनी देवदूताने त्याला सोन्याच्या पत्र्यावर लिहीलेली मॉर्मोनपंथाची कथा दिली. (चित्रित)
- २०१३ - पाकिस्तानच्या पेशावर शहरात मुस्लिम दहशतवाद्यांनी चर्चच्या बाहेर हल्ला करून ७५ लोकांना ठार केले आणि १३० लोकांना जखमी केले.
जन्म:
- १७९१ - मायकेल फॅरेडे, इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ.
- १८८७ - कर्मवीर भाऊराव पाटील, रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक.
मृत्यू:
- १५३९ - गुरू नानक, शीख धर्माचे संस्थापक.
- १९९१ - दुर्गा खोटे, अभिनेत्री.
मागील दिनविशेष: सप्टेंबर २१ - सप्टेंबर २० - सप्टेंबर १९
- १८०३ - दुसरे इंग्रज-मराठा युद्ध: मराठे व ईस्ट इंडिया कंपनी यांच्यात आसईची लढाई (चित्रित) झाली.
- १८८९ - जपानी व्हिडिओ गेम्स बनवणारी कंपनी निनटेंडो स्थापना झाली.
- २००२ - मोझिला फायरफॉक्स ह्या आंतरजाल न्याहाळकची सुरुवात झाली.
जन्म:
- १९२० - प्रा. भालबा केळकर - प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशनचे संस्थापक, लेखक.
- १९५० - डॉ. अभय बंग.
मृत्यू:
- १९६४ - भार्गवराव विठ्ठल ऊर्फ मामा वरेरकर, नाटककार.
- १९९९ - गिरीश घाणेकर - मराठी चित्रपट, जाहिरातपट निर्माते.
मागील दिनविशेष: सप्टेंबर २२ - सप्टेंबर २१ - सप्टेंबर २०
- १८७३ - महात्मा फुले (चित्रित) यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली.
- १९३२ - पुणे करारावर स्वाक्षर्या करण्यात आल्या.
- १९९५ - मृत्युंजय या कादंबरीसाठी शिवाजी सावंत यांना 'भारतीय ज्ञानपीठ' या संस्थेतर्फे 'मूर्तिदेवी पुरस्कार' जाहीर.
जन्म:
- १९२१ - स.गं. मालशे, लेखक व समीक्षक.
मृत्यू:
- १९९८ - वासुदेव पाळंदे, दिग्दर्शक व संघटक.
- २००२ - श्रीपाद रघुनाथ जोशी - शब्दकोशकार, अनुवादक.
मागील दिनविशेष: सप्टेंबर २३ - सप्टेंबर २२ - सप्टेंबर २१
- १९५९ - श्रीलंकेचे पंतप्रधान सोलोमन भंडारनायकेवर बौद्ध भिक्षू ताल्दुवे सोमरामाने प्राणघातक हल्ला केला ज्याने दुसऱ्या दिवशी त्यांचे निधन झाले.
- १९७७ - शिकागो मॅरेथॉनच्याची स्थापना झाली ज्यात सुमारे ४,२०० लोक सहभागी झाले.
- १९८१ - सांड्रा डे ओ'कॉनोर (चित्रित) अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयातील सर्वप्रथम स्त्री न्यायाधीश झाल्या.
जन्म:
- १८८१ - गोपाळ गंगाधर लिमये, मराठी कथाकार आणि विनोदकार.
- १९२६ - बाळ कोल्हटकर - अभिनेते, दिग्दर्शक, नाटककार व कवी.
- १९४६ - बिशनसिंग बेदी, भारतीय क्रिकेट संघाचे नायक
- १९६९ - कॅथरीन झेटा-जोन्स, इंग्लिश अभिनेत्री.
मृत्यू:
- १९९८ - कमलाकर सारंग - रंगकर्मी, दिग्दर्शक, निर्माते व लेखक.
- २००४ - अरुण कोलटकर, इंग्रजी व मराठी कवी.
मागील दिनविशेष: सप्टेंबर २४ - सप्टेंबर २३ - सप्टेंबर २२
- १६८७ - व्हेनिस आणि ऑट्टोमन साम्राज्यातील लढाईत अथेन्समधील पार्थेनॉनचा (चित्रित) मोठा भाग ढासळला.
- १९१० - त्रावणकोर सरकारने स्वदेशाभिमानी या पेपरमध्ये टीका प्रकाशित केल्यानंतर भारतीय पत्रकार रामकृष्ण पिल्लई यांना अटक केली.
- १९६९ - इंग्लिश रॉक संगीतचमू बीटल्सचा शेवटची ध्वनिमुद्रिका ॲबी रोड प्रकाशीत झाली.
जन्म:
- १९२३ - देव आनंद, भारतीय, हिंदी चित्रपट अभिनेता, चित्रपट निर्माता, दिग्दर्शक.
- १९३२ - मनमोहन सिंग, भारतीय पंतप्रधान.
- १९८१ - सेरेना विल्यम्स, अमेरिकन टेनिस खेळाडू.
मृत्यू:
- १७६३ - जॉन बायरन, इंग्लिश कवी.
- २००२ - राम फाटक, मराठी संगीतकार.
मागील दिनविशेष: सप्टेंबर २५ - सप्टेंबर २४ - सप्टेंबर २३
- १५४० - पोप पॉल तिसऱ्याने सोसायटी ऑफ जीझस "जेसुइट्सला" मान्यता दिली (शिक्का चित्रित).
- १७७७ - लँकेस्टर, पेनसिल्व्हेनिया एक दिवसासाठी अमेरिकेची राजधानी झाले.
जन्म:
- १९०७ - भगत सिंग, भारतीय क्रांतिकारी.
- १९५३ - माता अमृतानंदमयी, भारतीय धर्मगुरू.
मृत्यू:
- १९७२ - एस.आर. रंगनाथन, भारतीय गणितज्ञ.
- १९९६ - नजीबुल्लाह, अफगाणिस्तानचा राष्ट्राध्यक्ष.
- २००८ - महेंद्र कपूर, विख्यात भारतीय पार्श्वगायक.
मागील दिनविशेष: सप्टेंबर २६ - सप्टेंबर २५ - सप्टेंबर २४
- १९५८ - फ्रान्सने नवीन संविधान स्वीकारले. फ्रांसचे पाचवे प्रजासत्ताक अस्तित्वात आले. गिनी या फ्रांसाधीन प्रदेशाने हे संविधान न स्वीकारता स्वतंत्र होण्याचे ठरवले.
- १९७१ - युनायटेड किंग्डमने औषधांचा गैरवापर कायदा काढून गांजाचे वैद्यकीय उपयोग बेकायदा ठरवले.
जन्म:
- १९२९ - लता मंगेशकर, (चित्रित) भारतीय पार्श्वगायक.
- १९८१ - रणबीर कपूर, भारतीय अभिनेता
- १९८७ - हिलरी डफ, अमेरिकन अभिनेत्री.
मृत्यू:
- १९१४ - रिचर्ड सीयर्स, अमेरिकन उद्योगपती.
- १९७८ - पोप जॉन पॉल पहिला.
- १९८९ - फर्डिनांड मार्कोस, फिलिपाईन्सचा राष्ट्राध्यक्ष.
- २०२३ - एम.एस. स्वामिनाथन, भारतीय शास्त्रज्ञ
मागील दिनविशेष: सप्टेंबर २७ - सप्टेंबर २६ - सप्टेंबर २५
- १२२७ - क्रुसेडमध्ये भाग न घेतल्याबद्दल पोप ग्रेगोरी नवव्याने पवित्र रोमन सम्राट फ्रेडरिक दुसऱ्याला (चित्रित) वाळीत टाकले.
- १९९२ - ब्राझीलचे अध्यक्ष फर्नांडो कोलोर डी मेलो यांच्यावर महाभियोग चालवण्यात आला.
- २०१६ - उरी हल्ल्याच्या अकरा दिवसांनंतर, भारतीय लष्कराने पाकिस्तान-प्रशासित काश्मीरमध्ये संशयित अतिरेक्यांवर "सर्जिकल स्ट्राइक" केले.
जन्म:
- १७८६ - ग्वादालुपे व्हिक्टोरिया, मेक्सिकोचा पहिला राष्ट्राध्यक्ष.
- १९५१ - मिशेल बाशेलेट, चिले देशाची पहिली स्त्री राष्ट्राध्यक्ष.
- १९५६ - सेबास्टियन को, इंग्लिश धावपटू.
मृत्यू:
- १९८७ - हेन्री फोर्ड दुसरा, अमेरिकन उद्योगपती.
- २००१ - न्विन व्हान थ्यु, दक्षिण व्हियेतनामचा राष्ट्राध्यक्ष.
- २००६ - वॉल्टर हॅडली, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू.
मागील दिनविशेष: सप्टेंबर २८ - सप्टेंबर २७ - सप्टेंबर २६
- १९३५ - अमेरिकेच्या कॉलोराडो नदी वर हूवर डॅम (चित्रित) बांधून पूर्ण.
- १९६५ - इंडोनेशियात कम्युनिस्ट पार्टीने केलेल्या उठावाचा वचपा म्हणून जनरल सुहार्तोने कम्युनिस्ट असल्याची कुणकुण लागलेल्या १०,००,००० लोकांची कत्तल करण्यास सुरुवात केली.
- १९९३ - लातूर, किल्लारी भागात तीव्र भूकंप हजारो मृत्युमुखी, लाखो बेघर.
जन्म:
- १९३३ - प्रभाकर पंडित, मराठी संगीतकार.
- १९३९ - ज्याँ-मरी लेह्न, नोबेल पारितोषिक विजेता फ्रेंच रसायनशास्त्रज्ञ.
मृत्यू:
- १२४६ - यारोस्लाव्ह दुसरा, रशियाचा झार.
- १९१३ - रुडॉल्फ डीझेल, जर्मन संशोधक.
- १९९२ - गंगाधर देवराव खानोलकर, मराठी लेखक.
मागील दिनविशेष: सप्टेंबर २९ - सप्टेंबर २८ - सप्टेंबर २७