रणबीर कपूर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
रणबीर कपूर
जन्म २८ सप्टेंबर, १९८२ (1982-09-28) (वय: ३८)
मुंबई
कार्यक्षेत्र बॉलिवूड
कारकीर्दीचा काळ २००७ - चालू
वडील ऋषी कपूर
आई नीतू कपूर

कारकीर्द[संपादन]

रणबीर कपूर (जन्म: २८ सप्टेंबर १९८२) हिंदी चित्रपटसुष्ट्रीतील नव्या पिढीचा कलाकार म्हणून ओळखला जातो. रणबीर कपूर हा ऋषी कपूरनीतू सिंग यांचा पुत्र आहे. २८ सप्टेंबर, इ.स. १९८२ रोजी जन्मलेल्या रणबीरचे शिक्षण माहीमच्या बॉम्बे स्कॉटिश स्कूलमध्ये झाले. त्यानंतर त्याने उच्च शिक्षणासाठी अमेरिका गाठले आणि न्यू यॉर्कच्या 'लि स्ट्रॅसबर्ग थिएटर ॲंड फिल्म इन्स्टिट्यूट'मध्ये अभिनयाचे धडे गिरवले. इ.स. २००७ मध्ये संजय लीला भन्साळी यांच्या 'सॉंवरीया' चित्रपटात सर्वप्रथम भूमिका केली. या चित्रपटातील त्याच्या अभिनयाची तारीफही झाली आणि त्याला पदार्पणाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. इ.स. २००९च्या 'वेक अप सिड' आणि 'अजब प्रेम की गजब कहाणी' या चित्रपटांसाठी त्याने समीक्षकांचा सर्वोत्तम अभिनयासाठीचा फिल्मफेअर पुरस्कार पटकावला. २०१६ सालचा ऐ दिल है मुश्किल हा त्याचा चित्रपट देखील प्रचंड यशस्वी झाला.

चित्रपट[संपादन]

वर्ष चित्रपट टीपा
2007 सांवरिया फिल्मफेअर सर्वोत्तम पुरुष पदार्पण पुरस्कार
2008 बचना ऐ हसीनो
2009 लक बाय चान्स पाहुणा कलाकार
2009 वेक अप सिड फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेता समीक्षक पुरस्कार
2009 अजब प्रेम की गजब कहानी
2009 रॉकेट सिंग: सेल्समन ऑफ द इयर
2010 राजनिती
2010 अंजाना अंजानी
2011 चिल्लर पार्टी पाहुणा कलाकार
2011 रॉकस्टार फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेता पुरस्कार
फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेता समीक्षक पुरस्कार
2012 बर्फी! फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेता पुरस्कार
2013 बॉम्बे टॉकीज पाहुणा कलाकार
2013 ये जवानी है दीवानी
2013 बेशरम

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: