व्हॉयेजर १

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
व्हॉयेजर १

व्हॉयेजर-१ आंतरिक्षयान आहे. याचे वजन ७२२ किलो ग्राम (१५९० lb) आहे. ही पृथ्वीपासून सर्वात दूर गेलेली माणसाने निर्माण केलेली वस्तू आहे. दिनांक ५ सप्टेंबर १९७७ रोजी व्हॉयेजर-१ या यानानं पृथ्वीवरून उड्डाण केले. सौरमालेचा अभ्यास करण्यासाठी हे यान सोडले गेले आहे. गुरू, शनी, युरेनस आणि नेपच्यून या दूरच्या ग्रहांचा अभ्यास करण्यासाठी हा प्रकल्प सुरू करण्यात आला. त्यानंतर ही यानं आपल्या सौरमालेपलीकडे जातील अशी व्यवस्था करण्यात आली होती. युरेनस आणि नेपच्यून या ग्रहांना भेट देणारी हे पहिले यान आहे.