विकिपीडिया:दिनविशेष/जानेवारी
- १८१८ - भीमा कोरेगाव येथे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या कॅप्टन एफ.एफ. स्टाँटन यांच्या नेतृत्वाखाली महार रेजिमेण्टने सुमारे ५०० सैनिकांनी पेशव्यांच्या२८००० संख्याबळाच्या मराठा साम्राज्याच्या सैन्याचा पराभव केला.
- १८४८ - महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी पुण्यात भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली.
- १८६२ - इंडियन पीनल कोड अस्तित्वात आले.
- १९१९ - गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अॅक्ट अंमलात आला व देशात कायदेमंडळे स्थापन झाली.
- १९३२ - डॉ. नारायण भिकाजी परुळेकर यांनी सकाळ हे वृत्तपत्र सुरू केले.
जन्म:
- १८९२ - महादेव हरिभाई देसाई (गांधीवादी कार्यकर्ते).
- १८९४ - सत्येंद्रनाथ बोस (भारतीय भौतिकशास्त्रज्ञ).
- १९०२ - कमलाकांत वामन केळकर (भारतीय भूवैज्ञानिक).
- १९३६ - साहित्यिक राजा राजवाडे
- १९४३ - डॉ. रघुनाथ माशेलकर, भारतीय शास्त्रज्ञ.
- १९५१ - नाना पाटेकर, अभिनेते, दिग्दर्शक.
मृत्यू :
डिसेंबर ३१ - डिसेंबर ३० - डिसेंबर २९
- १७५७ - ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीने कोलकाता जिंकून आपल्या साम्राज्याची मुहुर्तमेढ रोवली.
- १९५४ - भारतरत्न या सर्वोच्च किताबाची स्थापना तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी केली.
जन्म:
- १९४० - श्रीनिवास वरधन, भारतीय गणितज्ञ.
मृत्यू:
- १९४४ - समाजसुधारक महर्षी विठ्ठल रामजी शिंदे.
जानेवारी १ - डिसेंबर ३१ - डिसेंबर ३०

- १५२१ - पोप लिओ दहाव्याने फतवा काढून मार्टिन ल्यूथरला (चित्रित) वाळीत टाकले.
- १९५९ - अलास्का हे अमेरिकेची संयुक्त संस्थानांमध्ये ४९ वे राज्य झाले.
- १९७७ - ॲपल कंप्यूटर इंकची स्थापना झाली.
जन्म:
- १८३१ - सावित्रीबाई फुले, आधुनिक भारतातील प्रथम स्त्री शिक्षिका व समाजसुधारक.
- १९६९ - मायकेल शुमाकर, फॉर्म्युला वन शर्यतीतील चालक
मृत्यू:
- १३२२ - फ्रान्सचा पाचवा फिलिप, फ्रान्सचा राजा
- २००२ - सतिश धवन, भारतीय शास्त्रज्ञ
मागील दिनविशेष: जानेवारी २ - जानेवारी १ - डिसेंबर ३१

- १७६२ - ग्रेट ब्रिटनने स्पेनवर युद्ध घोषित केले, आणि सप्त-वार्षिक युद्धत स्पेनचा प्रवेश झाला.
- १८८१ - लोकमान्य टिळकांनी, पुणे येथे केसरी वृत्तपत्र (चित्रित) सुरू केले.
जन्म:
- १८८९ - एम. पतंजली शास्त्री, भारताचे दुसरे सरन्यायाधीश
- १९०९ - प्रभाकर आत्माराम पाध्ये, मराठी नवसाहित्यिक.
- १९१४ - इंदिरा संत, मराठी कवियत्री.
- १९४० - श्रीकांत सिनकर, मराठी कादंबरीकार.
मृत्यू:
- १९९४ - राहुल देव बर्मन, भारतीय संगीतकार.
- २००६ - मक्तूम बिन रशीद अल मक्तूम, संयुक्त अरब अमिरातीचे पहिला पंतप्रधान
मागील दिनविशेष: जानेवारी ३ - जानेवारी २ - जानेवारी १

- १४७७ - नॅन्सीच्या लढाईत बरगंडीच्या ड्यूक चार्ल्स द बोल्डचा मृत्यू आणि बरगंडीचा फ्रांसमध्ये समावेष.
- १९३३ - सान फ्रांसिस्कोच्या खाडीवर गोल्डन गेट ब्रिजचे (चित्रित) बांधकाम सुरू झाले.
जन्म:
- १५९२ - शहाजहान, मोगल सम्राट
- १९५५ - ममता बॅनर्जी, राजकारणी
मृत्यू:
- १७६२ - रशियाची एलिझाबेथ, रशियाची सम्राज्ञी
- १९३३ - कॅल्विन कूलिज, अमेरिकेचे २९वे अध्यक्ष
मागील दिनविशेष: जानेवारी ४ - जानेवारी ३ - जानेवारी २

- १८३८ - सॅम्युएल मॉर्स आणि आल्फ्रेड वेलने तारयंत्राचे (चित्रीत) पहिले यशस्वी प्रात्यक्षिक केले.
- १९२९ - मदर तेरेसा समुद्रमार्गे कलकत्ता येथे पोहोचल्या व त्यांनी गरीब, आजारी लोकांमध्ये आपले काम सुरू केले.
जन्म:
- १९२५ - रमेश मंत्री, मराठी विनोदी लेखक
- १९२८ - विजय तेंडुलकर, नाटककार, साहित्यिक, चित्रपटकथा लेखक
- १९५९ - कपिल देव निखंज, भारतीय क्रिकेटपटू
मृत्यू:
मागील दिनविशेष: जानेवारी ५ - जानेवारी ४ - जानेवारी ३

- १६१० - गॅलेलियो गॅलिलीने दुर्बिणीद्वारे गुरू ग्रहाचे चार चंद्र: आयो, युरोपा, गॅनिमीड व कॅलिस्टो (चित्रित) यांचा शोध लावला.
- १९२७ - न्यू यॉर्क ते लंडन अशी अटलांटिक महासागर पार करणारी दूरध्वनीसेवा सुरू झाली.
- २०१५ - मोहम्मदचे व्यंगचित्रात वादग्रस्त चित्रण केल्याबद्दल चार्ली हेब्दो या फ्रेंच मासिकावर दहशतवाद्यांनी हल्ला केला व १२ जणांची हत्या केली.
जन्म:
- १९२१ - चंद्रकांत रघुनाथ गोखले, मराठी रंगभूमी नट व चित्रपट अभिनेता.
- १९४८ - शोभा डे, भारतीय लेखिका.
- १९५० - जॉनी लिव्हर, अभिनेता.
मृत्यू:
- १९८९ - मिचियोमिया हिरोहितो, जपानचे १२४वे सम्राट.
- २०१६ - मुफ्ती महंमद सईद, जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री
मागील दिनविशेष: जानेवारी ६ - जानेवारी ५ - जानेवारी ४

- १८३५ - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष अँड्रु जॅक्सन यांनी राष्ट्रीय कर्ज पहिल्यांदाच आणि एकदाच शून्य झाल्याची घोषणा केली.
- १९७२ - आंतरराष्ट्रीय दबावापुढे झुकून पाकिस्तानचे अध्यक्ष झुल्फिकार अली भुट्टो यांनी बांग्लादेशी नेते शेख मुजिबुर रहमान यांची तुरुंगातून सुटका केली, ज्यांना बांगलादेशच्या स्वातंत्र्याची घोषणा केल्यानंतर अटक करण्यात आली होती (चित्रीत).
- २००६ - मराठी साहित्यिक विंदा करंदीकर यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर.
जन्म:
- १९०८ - निर्भय नादिया, चित्रपट अभिनेत्री आणि स्टंट नायिका.
- १९२६ - केलुचरण मोहपात्रा, ओडिसी नर्तक आणि गुरू.
मृत्यू:
- १६४२ - गॅलेलियो गॅलिली, इटलीचे खगोलशास्त्रज्ञ, गणितज्ञ व तत्त्वज्ञ.
- १९६६ - बिमल रॉय, हिंदी चित्रपट दिग्दर्शक.
मागील दिनविशेष: जानेवारी ७ - जानेवारी ६ - जानेवारी ५

- १३४९ - काळा प्लेग प्रसारीचे कारण ठरवून बासल, स्वित्झर्लंड मधील ज्यूंना जाळण्यात आले (चित्रीत).
- १८६१ - अमेरिकन यादवी युद्ध - मिसिसिपी अमेरिकेपासून विभक्त होणारे दुसरे राज्य झाले.
- १९६० - इजिप्तमध्ये आस्वान धरणाचे बांधकाम सुरू झाले.
जन्म:
- १९२२ - हरगोविंद खुराणा, नोबेल-पुरस्कृत जैव-रसायनशास्त्रज्ञ.
- १९७४ - फरहान अख्तर, हिंदी अभिनेता, दिग्दर्शक, गायक.
मृत्यू:
- १८७३ - नेपोलियन तिसरा, फ्रान्सचा पहिला राष्ट्राध्यक्ष आणि शेवटचा सम्राट
- २०२४ - राशिद खान, हिंदुस्तानी शास्त्रीय गायक
मागील दिनविशेष:जानेवारी ८ - जानेवारी ७ - जानेवारी ६

- १७३० - पहिल्या बाजीरावने पुण्यात शनिवारवाडा (चित्रीत) बांधायला सुरुवात केली.
- १९२९ - टिनटिनच्या चित्रकथेचा पहिला अंक प्रकाशित झाला.
- १९६६ - भारत आणि पाहिस्तानने ताश्कंद करारावर स्वाक्षऱ्या करून भारत-पाकिस्तान दुसरे युद्ध संपवले.
जन्म:
- १८९६ - काकासाहेब तथा नरहर विष्णू गाडगीळ, भारतीय स्वातंत्र्यसैनिक, मराठी साहित्यिक, वक्ता.
- १९४० - येशू दास, भारतीय पार्श्वगायक.
- १९७४ - हृतिक रोशन, भारतीय चित्रपट अभिनेता.
मृत्यू:
- १२७६ - पोप ग्रेगोरी दहावा.
- १७६० - दत्ताजी शिंदे, मराठा सेनापती (कुतुबशहाने शिरच्छेद केला).
मागील दिनविशेष: जानेवारी ९ - जानेवारी ८ - जानेवारी ७

- १९२२ - कृत्रिम इन्शुलिनच्या शोधानंतर, कॅनडातील टोराँटो येथील लिओनार्ड थॉम्पसन हे ते घेणारे पहिले व्यक्ती बनले.
- १९८० - बुद्धिबळाच्या खेळात नायजेल शॉर्ट (चित्रीत) वयाच्या १४व्या वर्षी जगातील सर्वात लहान ईंटरनॅशनल मास्टर झाले.
जन्म:
- १८९८ - वि.स. खांडेकर, मराठी लेखक.
- १९७३ - राहुल द्रविड, भारतीय क्रिकेट खेळाडू.
मृत्यू:
- १९६६ - लाल बहादूर शास्त्री, भारताचे दुसरे पंतप्रधान.
- २००८ - एडमंड हिलरी, माउंट एव्हरेस्टवर सर्वप्रथम चढाई करणारे न्यू झीलंडचे गिर्यारोहक.
मागील दिनविशेष: जानेवारी १० - जानेवारी ९ - जानेवारी ८

- १९१५ - महिलांना मतदानाचा अधिकार देण्याचा प्रस्ताव अमेरिकन संसदेने फेटाळला.
- १९६७ - अमेरिकेन जेम्स बेडफोर्ड हे भविष्यातील पुनरुत्थानाच्या उद्देशाने क्रायोनिक पद्धतीने जतन केलेले पहिले व्यक्ती बनले.
- २०१० - हैतीमध्ये झालेल्या भूकंपात ३,००,००० पेक्षा अधिक मृत्यू. (कोसळलेला राष्ट्रीय राजवाडा चित्रीत.)
जन्म:
- १५९८ - जिजाबाई शहाजी भोसले, मराठा महाराज शिवाजी यांची आई.
- १८६३ - स्वामी विवेकानंद, भारतीय तत्त्वज्ञ.
मृत्यू:
- १९३९ - हरदास लक्ष्मणराव नगराळे, भारतीय समाजसुधारक आणि जय भीम या अभिवादनाचे प्रणेते.
- १९९२ - कुमार गंधर्व, हिंदुस्थानी शास्त्रीय गायक.
मागील दिनविशेष: जानेवारी ११ - जानेवारी १० - जानेवारी ९
- १८८८ - वॉशिंग्टन डी.सी. येथे नॅशनल जिओग्राफिक सोसायटीची स्थापना झाली. (मुख्यालय चित्रीत)
- २००० - बिल गेट्स यांच्या जागी स्टीव बाल्मर हे मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी बनले.
- २०२० - थाई सार्वजनिक आरोग्य मंत्रालयाने चीनबाहेर कोविड-१९ च्या पहिल्या रुग्णाची पुष्टी केली.
जन्म:
- १९४९ - राकेश शर्मा, अंतरिक्षात जाणारे पहिले भारतीय.
- १९७७ - ऑरलँडो ब्लूम, इंग्लिश चित्रपट अभिनेता.
मृत्यू:
- १९८८ - च्यांग चिंग-कुओ, तैवानचा राष्ट्राध्यक्ष.
- २०२४ - प्रभा अत्रे, भारतीय शास्त्रीय गायीका.
मागील दिनविशेष: जानेवारी १२ - जानेवारी ११ - जानेवारी १०

- १६९० - जर्मनीच्या न्युरेम्बर्ग शहरात जोहान क्रिस्टोफ डेनर यांनी पहिले क्लॅरिनेट (चित्रीत) तयार केले.
- १८५८ - फ्रान्सचा नेपोलियन तिसरा पॅरिसमध्ये फेलिस ओरसिनी आणि त्याच्या साथीदारांनी केलेल्या हत्येच्या प्रयत्नातून बचावला.
- १९५३ - योसिफ ब्रोझ तितो हे युगोस्लाव्हियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडले गेले.
जन्म:
- १९२६ - महाश्वेता देवी, ज्ञानपीठ विजेत्या बंगाली लेखिका.
- १९५० - रामभद्राचार्य, भारतीय धार्मिक नेते, विद्वान आणि लेखक.
मृत्यू:
- १७४२ - लुईस कॅरोल, इंग्लिश लेखक व गणितज्ञ.
- १७६१ - विश्वासराव पेशवे, पेशवे, पानिपतच्या ३ऱ्या लढाईत मारले गेले.
मागील दिनविशेष: जानेवारी १३ - जानेवारी १२ - जानेवारी ११

- १५५९ - वयाच्या २५व्या वर्षी पहिल्या एलिझाबेथचा वेस्टमिन्स्टर अॅबी येथे राज्याभिषेक झाला.
- १९७५ - दक्षिण अफ्रिकन अँगोला देशाने (राष्ट्रध्वज चित्रित) पोर्तुगाल पासून स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अल्वोर करारावर स्वाक्षऱ्या केल्या.
- २००१ - विकिपीडिया सुरू झाले.
जन्म:
- १९२९ - मार्टिन ल्यूथर किंग, जुनियर, अमेरिकन सुधारक व धर्मगुरू.
- १९५६ - मायावती, भारतीय राजकारणी.
मृत्यू:
- १९७१ - दीनानाथ दलाल, महाराष्ट्रातील चित्रकार.
- १९९८ - गुलझारीलाल नंदा, भारतीय पंतप्रधान, स्वातंत्र्यसैनिक व गांधीवादी कार्यकर्ते.
मागील दिनविशेष: जानेवारी १४ - जानेवारी १३ - जानेवारी १२

- १९२० - लीग ऑफ नेशन्सची पहिली कौन्सिल बैठक पॅरिस, फ्रान्स येथे झाली.
- १९७९ - इराणच्या शेवटचे शहा मोहम्मद रझा पेहलवीनी (चित्रीत) कुटुंबासहित इजिप्तला पळ काढला.
जन्म:
- १९२० - नानी पालखीवाला, भारतीय कायदेपंडित आणि अर्थतज्ञ.
- १९२६ - ओ.पी. नय्यर, भारतीय संगीतकार.
मृत्यू:
- १७१० - हिगाशीयामा, जपानी सम्राट.
- १९३८ - शरच्चंद्र चट्टोपाध्याय, बांगला साहित्यिक, स्वातंत्र्यसैनिक.
मागील दिनविशेष: जानेवारी १५ - जानेवारी १४ - जानेवारी १३
- १८९९ - अमेरिकेने पॅसिफिक महासागरात असलेल्या वेक आयलंडचा (चित्रीत) ताबा घेतला.
- १९९५ - जपानच्या कोबे शहरात रिश्टर मापनपद्धतीनुसार ७.२ तीव्रतेचा भूकंप. ६,४०० पेक्षा अधिक व्यक्ती मृत.
जन्म:
- १७०६ - बेंजामिन फ्रँकलिन, अमेरिकन लेखक, संशोधक, प्रकाशक व राजदूत.
- १९१७ - एम. जी. रामचंद्रन, चित्रपट अभिनेता आणि तामिळनाडुचे मुख्यमंत्री.
- १९४२ - मुहम्मद अली, अमेरिकन मुष्टियोद्धा.
मृत्यू:
- १९६१ - पॅट्रिस लुमुम्बा, कॉंगोचे पंतप्रधान.
- १९७१ - नाथ पै, भारतीय स्वातंत्र्य सैनिक व घटनातज्ञ
- २०१४ - सुचित्रा सेन, बंगाली व हिंदी चित्रपट अभिनेत्री.
मागील दिनविशेष: जानेवारी १६ - जानेवारी १५ - जानेवारी १४

- १८७१ - विल्हेम पहिला हा जर्मन साम्राज्याचा पहिला कैसर (सम्राट) झाला (सोहळा चित्रीत).
- १९८३ - मृत्यूनंतर तीस वर्षांनी, आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीने अमेरिकन खेळाडू जिम थॉर्प यांच्या कुटुंबाला स्मारक पदके प्रदान केली, ज्यांच्याकडून १९१२ उन्हाळी ऑलिंपिकपूर्वी अर्ध-व्यावसायिक बेसबॉल खेळल्याबद्दल त्यांचे सुवर्णपदके काढून घेण्यात आली होती.
जन्म:
- १८४२ - न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, अर्थशास्त्रज्ञ, समाजसुधारक,राजकारणी.
- १८९२ - ऑलिव्हर हार्डी, लॉरेल आणि हार्डी या जोडीतील अमेरिकन अभिनेता.
मृत्यू:
- १९३६ - रूड्यार्ड किप्लिंग, ब्रिटिश लेखक.
- १९९६ - एन.टी. रामाराव, तेलगू चित्रपट अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते व आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री.
मागील दिनविशेष: जानेवारी १७ - जानेवारी १६ - जानेवारी १५

- १९५४ - कोयना धरणाच्या जलविद्युत प्रकल्पाचे (चित्रीत) भूमिपूजन मोरारजी देसाई यांच्या हस्ते झाले.
- १९९३ - चेक प्रजासत्ताक आणि स्लोव्हाकिया हे संयुक्त राष्ट्रांमध्ये सामील झाले.
- १९९० - उग्रवादामुळे भारत-प्रशासित काश्मीरमधुन काश्मिरी पंडितांचे पलायन सुरू झाले.
जन्म:
- १८९२ - चिंतामण विनायक जोशी, मराठी विनोदी लेखक.
- १९०७ - मास्टर विनायक मराठी अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते.
मृत्यू:
- १५९७ - महाराणा प्रताप, राजस्थानातील ऐतिहासिक योद्घा, लढवय्या.
- १९९० - ओशो, भारतीय तत्त्वज्ञानी.
मागील दिनविशेष: जानेवारी १८ - जानेवारी १७ - जानेवारी १६

- १६४९ - चार्ल्स पहिलाच्या देशद्रोहाच्या खटल्याची उच्च न्यायालयाने कार्यवाही सुरू केली; परिणामी दोषी ठरवून शिरच्छेद करण्यात आले.
- १९२१ - तुर्कस्तानचे (राष्ट्रध्वज चित्रित) पहिले संविधान अस्तित्त्वात आले.
- २००९ - बराक ओबामा यांचा अमेरिकेचे ४४ वे राष्ट्राध्यक्ष व पहिले आफ्रिकन-अमेरिकन राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथविधी झाला (चित्रीत).
जन्म:
- १८७१ - रतनजी टाटा, भारतीय उद्योगपती.
- १९१५ - गुलाम इशाक खान, पाकिस्तानचा राष्ट्राध्यक्ष.
मृत्यू:
- १९८८ - खान अब्दुल गफार खान, पश्तुन नेता, स्वातंत्र्यसेनानी.
- १९९३ - ऑड्रे हेपबर्न, ॲंग्लो-डच अभिनेत्री.
मागील दिनविशेष: जानेवारी १९ - जानेवारी १८ - जानेवारी १७

- १९५४ - युएसएस नॉटिलस या अणुउर्जेवर चालण्याऱ्या जगातील पहिल्या पाणबुडीचे जलावतरण.
- १९७२ - ईशान्य क्षेत्र (पुनर्रचना) कायदा, १९७१ लागू होऊन भारतातील त्रिपुरा, मणिपूर आणि मेघालय (चित्रीत) राज्यांची स्थापना.
जन्म:
- १८९४ - माधव ज्युलियन, मराठी कवी.
- १९१० - शांताराम आठवले, कवी व चित्रपट दिग्दर्शक.
- १९२४ - मधु दंडवते, समाजवादी नेते व संसदपटू.
मृत्यू:
- १९२४ - व्लादिमिर लेनिन, रशियन क्रांतिकारी नेता.
- १९४५ - रासबिहारी बोस, स्वातंत्र्य चळवळीतील क्रांतिकारक नेते.
- १९६५ - गीता बाली, भारतीय चित्रपट अभिनेत्री.
मागील दिनविशेष: जानेवारी २० - जानेवारी १९ - जानेवारी १८

- १५०६ - स्वित्झर्लंडच्या १५० सैनिकांचे पथक, स्विस गार्ड (सैनिक चित्रीत), हे व्हॅटिकन सिटीमध्ये दाखल व पोपचे अंगरक्षक म्हणून तैनात झाले.
- १९०१ - एडवर्ड सातवा यांना त्यांची आई राणी व्हिक्टोरिया यांच्या निधनानंतर युनायटेड किंग्डमचा राजा म्हणून घोषित करण्यात आले.
- १९९९ - ऑस्ट्रेलियन मिशनरी ग्रॅहाम स्टेन्स आणि त्यांच्या दोन मुलांना ओडिशात त्यांच्या कारमध्ये झोपलेले असताना कट्टरपंथी हिंदूंनी जिवंत जाळले.
जन्म:
- १५६१ - फ्रांसिस बॅकन, इंग्लिश तत्त्वज्ञानी.
- १९२१ - अँड्ऱ्यू गंतॉम, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
- १९३४ - विजय आनंद, हिंदी चित्रपट निर्माते व दिग्दर्शक.
मृत्यू:
- १६६६ - शाह जहान, मोगल सम्राट.
- १९७२ - स्वामी रामानंद तीर्थ, हैदराबाद संस्थानातील स्वातंत्र्य चळवळीचे नेते, समाजसुधारक.
- १९७३ - लिंडन बी. जॉन्सन, अमेरिकेचा ३६वे राष्ट्राध्यक्ष.
मागील दिनविशेष: जानेवारी २१ - जानेवारी २० - जानेवारी १९

- १५५६ - चीनच्या षा'न्शी प्रांतात प्रचंड भूकंप ज्यात अंदाजे ८,३०,००० ठार.
- १५६५ - तालिकोटची लढाई - विजयनगर साम्राज्याच्या विरुद्ध अहमदनगरचा निजामशाहा, विजापूरचा आदिलशाहा, बिदरचा इमादशहा, बेरारचा बरीदशाहा व गोवळकोंडाचा कुतुबशहा या दख्खनी सुलतानांनी एकी करून राजा रामरायाचा पाडाव केला (चित्रीत).
जन्म:
- १७१९ - जॉन लँडन, इंग्लिश गणितज्ञ.
- १८९७ - सुभाषचंद्र बोस, भारतीय स्वातंत्रसेनानी.
- १९२६ - बाळ ठाकरे, शिवसेना पक्षाचे संस्थापक, राजकारणी व व्यंगचित्रकार.
मृत्यू:
- १६६४ - शहाजीराजे भोसले.
- १९१९ - राम गणेश गडकरी, मराठी साहित्यिक.
- २०१५ - सौदी अरेबियाचा अब्दुल्ला.
मागील दिनविशेष: जानेवारी २२ - जानेवारी २१ - जानेवारी २०
- इ.स. १९६६ -एर इंडियाचे बोईंग ७०७ जातीचे विमान युरोपमधील मोंट ब्लांक या सर्वोच्च शिखरावर कोसळले. ११७ ठार. मृतांत होमी भाभा.
जानेवारी २३ - जानेवारी २२ - जानेवारी २१
- १९१९ - पहिल्या महायुद्धाच्या अंतानंतर लीग ऑफ नेशन्सची स्थापना.
- १९८० - सोलापूरचे पंचांगकर्ते लक्ष्मणशास्त्री दाते यांचे निधन.
- २००१ - स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर व शहनाईवाझ उस्ताद बिस्मिल्ला खॉं यांना भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च सन्मान जाहीर.
जानेवारी २४ - जानेवारी २३ - जानेवारी २२
जानेवारी २६ : भारतीय प्रजासत्ताक दिन
- १९५० - स्वतंत्र भारत प्रजासत्ताक झाले.
- १७८८ - ऑस्ट्रेलियातील सिडने शहराची स्थापना. हाच ऑस्ट्रेलिया स्थापना दिन मानला जातो.
जानेवारी २५ - जानेवारी २४ - जानेवारी २३
- १९६७ - केनेडी अंतराळ केंद्रात अपोलो १ या अंतराळयानाच्या चाचणी दरम्यान आग. गस ग्रिसम, एडवर्ड व्हाइट व रॉजर शॅफी हे अंतराळवीर मृत्युमुखी.
जानेवारी २६ - जानेवारी २५ - जानेवारी २४
- १९८६ - अंतराळ यान(स्पेस शटल) चॅलेंजरचा उड्डाण करताना विस्फोटात विनाश. सात अंतराळयात्र्यांचा मृत्यू.(चित्रित)
- २००३ - मंगेश पाडगावकरांना जनस्थान पुरस्कार जाहीर.
जन्म:
- १८६५ - लाला लजपतराय, भारतीय क्रांतिकारी.
जानेवारी २७ - जानेवारी २६ - जानेवारी २५
- १७८० - हिकीज बेंगाल गॅझेट हे भारतातील पहिले वर्तमानपत्र सुरु.
- १९६४ - ऑस्ट्रियाच्या इन्सब्रुक शहरात नववे हिवाळी ऑलिंपिक खेळ सुरू. (चित्रित)
जानेवारी २८ - जानेवारी २७ - जानेवारी २६
- १६४९ - इंग्लंडचा राजा चार्ल्स पहिल्याचा शिरच्छेद.
- १६६१ - ऑलिव्हर क्रॉमवेल, ज्याच्या राजवटीत चार्ल्स पहिल्याचा शिरच्छेद झाला, त्याचा स्वतःचा शिरच्छेद केला गेला. क्रॉमवेल २ वर्षांपूर्वीच मृत्यू पावला होता.
- १८३५ - रिचर्ड लॉरेन्स नावाच्या माथेफिरू माणसाने अमेरिकेचा अध्यक्ष अँड्रु जॅक्सनचा खून करण्याचा प्रयत्न केला. लॉरेन्सची दोन्ही पिस्तुले ऐनवेळी बिघडली. चिडलेल्या जॅक्सनने लॉरेन्सला काठीने मारून पळवून लावले.
- १९११ - जॅक्सन खून प्रकरणी स्वातंत्र्यवीर सावरकर यांना जन्मठेपेची शिक्षा.
- १९४८ - नथुराम गोडसेने महात्मा गांधींचा (चित्रीत) पिस्तुलाने खून केला.
जानेवारी २९ - जानेवारी २८ - जानेवारी २७
- १९६८ - नौरूला(राष्ट्रध्वज चित्रित) ऑस्ट्रेलिया पासून स्वातंत्र्य.
जन्म:
- १९७५ - प्रिती झिंटा, हिंदी चित्रपट अभिनेत्री.
- १९३१ - गंगाधर महांबरे, मराठी गीतकार.
मृत्यू:
जानेवारी ३० - जानेवारी २९ - जानेवारी २८