जोसेफ एस्ट्राडा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जोसेफ एस्ट्राडा

Flag of the Philippines फिलिपिन्सचा १३वा राष्ट्राध्यक्ष
कार्यकाळ
जून ३०, इ.स. १९९८ – जानेवारी २०, इ.स. २००१
मागील फिदेल रामोस
पुढील ग्लोरिया मॅकापगाल-अरोयो

जन्म १९ एप्रिल, १९३७ (1937-04-19) (वय: ८७)
मनिला, फिलिपाईन्स
धर्म रोमन कॅथोलिक
सही जोसेफ एस्ट्राडायांची सही

जोसेफ एस्ट्राडा (इंग्लिश: Joseph Ejercito Estrada; १९ एप्रिल १९३७) हा फिलिपिन्स देशाचा १३वा राष्ट्राध्यक्ष होता. राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी एस्ट्राडा फिलिपिन्समधील एक लोकप्रिय सिने-अभिनेता होता व त्याने आपल्या ३३ वर्षांच्या कारकिर्दीत १००हून अधिक चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत. आपल्या लोकप्रियतेचा फायदा घेऊन राजकारणत शिरणारा एस्ट्राडा १९६९ ते १९८६ दरम्यान १७ वर्षे सान हुआन ह्या मनिलाच्या उपनगराचा महापौर, त्यानंतर १९८६ ते १९९२ दरम्यान राष्ट्रीय सेनेटर तर १९९२ ते १९९८ दरम्यान उप-राष्ट्राध्यक्षपदावर होता.

१९९८ साली राष्ट्राध्यक्षपदाच्या सत्तेवर आल्यानंतर केवळ २ वर्षांतच एस्ट्राडावर भ्रष्टाचाराचे आरोप होऊ लागले व जानेवारी २००१ मध्ये झालेल्या एका क्रांतीनंतर एस्ट्राडाला सत्तेवरून हाकलले गेले. २००७ साली फिलिपिन्सच्या सर्वोच्च न्यायालयाने त्याला दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा ठोठावली परंतु तत्कालीन राष्ट्राध्यक्ष ग्लोरिया मॅकापगाल-अरोयोने त्याला माफी दिली.

बाह्य दुवे[संपादन]