म्युनिच हत्याकांड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

म्युनिच हत्याकांड पश्चिम जर्मनीच्या म्युनिच मधे आयोजित १९७६ च्या उन्हाळी ऑलिंपिक मधे झाला ज्यात अकरा इस्रायलचे ऑलिंपिक चमूचे सदस्य बंधक बनवले होते व शेवटी त्यांची हत्या करण्यात आली.[१] तसेच, एक जर्मन पोलीस अधिकारी देखील ठार झाला. हा दहशतवादी हल्ला पॅलेस्टीनी दहशतवादी गट ब्लॅक सप्टेंबरने केला होता, जी पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशनची एक तुकडी आहे.[२]

हल्ला सुरू झाल्यानंतर लवकरच, दहशतवाद्यांनी इस्रायलमधील तुरुंगातील २३४ कैद्यांची सुटका करण्याची मागणी केली आणि जर्मनीमध्ये बंदिवान असलेल्या लाल सेना गटाचे संस्थापक एंड्रियास बादेर आणि उल्रीके मीनहोफ यांच्या सुटकेची मागणी केली.

घटना[संपादन]

१९७६ च्या उन्हाळी ऑलिंपिकचा उद्घाटन समारंभ २६ ऑगस्ट रोजी झाला. ४ सप्टेंबरच्या संध्याकाळी इस्रायलचे खेळाडू फिडलर ऑन द रूफच्या नाट्यप्रयोगाला गेले आणि रात्री ऑलिंपियापार्क मध्ये पोहोचला, जिथे खेळाडूंची रहाण्याची सोय होती. सकाळी ४:३० वाजता (स्थानिक वेळ, ५ सप्टेंबर), पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशनची तुकडी ब्लॅक सप्टेंबरचे सदस्य एकेएम रायफल, टीटी पिस्तोल, हातबॉम्ब घेऊन साखळीचे कंपाउंड ओलांडून आत आले. असा विश्वास होता की काही अमेरिकन खेळाडूंचे यामध्ये त्यांना सहकार्य मिळाले. २०१२ मध्ये समजले की ते खेळाडू कॅनेडाचे होते.[३]

नक्कल चंबी वापरून दहशतवाद्यांनी अपार्टमेंट १ मध्ये प्रवेश केला. तेव्हा कुस्तीचे रेफरी योसेफ गुटफ़्रुंड यांची झोप उघडली आणि बंदुकांसह मुखवटा घातलेला लोक बघुन ते ओरडले, [४] आणि जनळ ठेवले १३५ किलोचे वजन फेकुन मारण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. गुटफ्रुंडचे इतर साथीदार उठले आणि कुस्ती प्रशिक्षक मोशे वेनबर्ग घुसपैठ्यांपासून लढले, ज्यांनी त्यांना गालत गोळी मारली आणि नंतर त्यांना इतर बंधकांना पकडण्यास मदत करण्याची सक्ती केली. वेनबर्ग घुसपैठ्यांना अपार्टमेंट ३ कडे घेऊन गेले आणि खोटे सांगितले की अपार्टमेंट २ मध्ये कोणी इस्रायली नाहीत. अपार्टमेंट 3 मध्ये घुसखोरांनी सहा पैलवान आणि भारोत्तोलकांना पकडले. वेनबर्ग विचार करत होते की हे खेळाडू कदाचित अचूक आक्रमण करतील पण ते झोपेत असल्याने काही करु नाही शकले. अपार्टमेंट १ वर परतताना वेनबर्गने पुन्हा एकदा हल्ला केला, ज्यामुळे पैलवान गाद त्सोबारी पळुन जाऊ शकले. वेटलिफ्टर योसेफ रोमानो, ज्यांनी पूर्वी सहा दिवसांच्या युद्धामध्ये भाग घेतला होता, एका घुसखोराला इजा करू शकले पण त्यांचा गोळी घालून मृत्यू करण्यात आला. बंदुकधाऱ्यां जवळ आता नऊ बंधक होते; योसेफ गुटफ़्रुंड, तीक्ष्ण नेमबाज प्रशिक्षक केहत शोर, क्रीडा प्रशिक्षक अमीतजुर शपीरा, तलवारबाजीचे खेळाडू आंद्रे स्पिट्जर, वेटलिफ्टिंग पंच याकोव स्प्रिंगर, कुस्तीपटू एलीज़र हाल्फिन आणि मार्क स्लेविन, आणि वेटलिफ्टिंगपटु डेव्हिड बर्जर आणि जेव फ्राइडमैन.[५]

अयशस्वी बचाव प्रयत्न[संपादन]

उल्रीके मीनहोफ यांच्या सुटकेची मागणी केली होती

दहशतवाद्यांनी इस्रायलमधील तुरुंगात बंदी असलेल्या २३४ कैद्यांची सुटका करण्याची मागणी केली होती. सोबत जर्मनीमध्ये बंदिवान असलेल्या लाल सेना गटाचे संस्थापक एंड्रियास बादेर आणि उल्रीके मीनहोफ यांच्या सुटकेची मागणी पण केली. अनेक जर्मन अधिकाऱ्यांनी दहशतवाद्यांशी चर्चा करण्यास सुरुवात केली, पण इस्रायलचे धोरण वाटाघाटी वाढविण्यास आणखी हल्ल्यांना उत्तेजन देणे आहे असे होते. संध्याकाळी ४:३० वाजता, म्युनिच पोलीस तेथे तैनात झाले व "सनशाईन" ह्या संकेताची वाट बघत थांबले. ते वेंटिलेशन शाफ्टच्या माध्यमातून इमारतीमध्ये प्रवेश करून दहशतवाद्यांवर हल्ला करण्याचा विचार करत होते. पण तोपर्यंत, जर्मन अपार्टमेंटमधुन अनेक पत्रकारांनी स्थितीचे प्रसारण करण्यास प्रारंभ केला होता, ज्यामुळे दहशतवाद्यांना हे धोरण माहित झाले.[६][७]

दहशतवाद्यांच्या मागणीनुसार दोन हेलिकॉप्टर्स फर्स्टेनफेल्डबर्क एयर बेस येथे त्यांना घेऊन जाण्यास आणले गेले. तिथून ते विमानातुन इजिप्तला जाण्याचा विचार करत होते. विमानतळावरील अनेक जर्मन सैनिकांनी हल्ला केला, परंतु अननुभवी कामगारांमुळे, खराब प्रकाशामुळे आणि अयोग्य नियोजनामुळे, दहशतवाद्यांनी सर्व बंधक मारले. तीन सोडुन सर्व आतंकवादीही मारले गेले, आणि एक जर्मन पोलीस अधिकारी सुद्धा मरण पावला.[७]

परिणाम[संपादन]

६ सप्टेंबर रोजी ऑलिंपिक खेळांमध्ये मृत खेळाडूंना श्रद्धांजली दिली गेली. तेथे कुस्ती प्रशिक्षक मोशे वेनबर्ग यांची बहीण कारमेल एलियैश यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचा मृत्यू झाला. ऑलिंपिकचा ध्वज अर्धा माथा वर केला होता आणि सोबत बऱ्याच देशांचा ध्वज पण; परंतु दहा अरब देशांच्या विरोधा नंतर त्यांचे ध्वज पुन्हा पूर्ण माथावर फडकवले गेले.[८][९]

८ सप्टेंबर १९७२ रोजी इस्रायलने पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशनच्या सीरिया आणि लेबेनॉनमध्ये दहा अड्डांवर हवाई हल्ला केला आणि जवळजवळ २०० लोक मारले. तीन दहशतवादी ज्यांना पकडले होते ते म्युनिचमधील तुरुंगात बंद होते. २९ ऑक्टोबर १९७२ रोजी लुफ्तान्सा ६१५ चे अपहरण करण्यात आले आणि परिणामी या तीन दहशतवाद्यांना सोडण्यात आले. इस्रायलची गुप्तचर संस्था मोसादने यापैकी दोन दहशतवाद्यांना ठार केले; जे ऑपरेशनचा "देवाचा कोप"चा एक भाग होता. इस्रायलची चौथी पंतप्रधान गोल्डा मायर यांनी ऑपरेशनसाठी हिरवा सिग्नल दिला.[१०]

चित्र गॅलरी[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ एंथोनी ब्रेज़निकन (२२ डिसेंबर २००५). "Messages from 'Munich'" (इंग्रजी भाषेत). १० नोवेंबर २०१७ रोजी पाहिले. Unknown parameter |trans_title= ignored (सहाय्य); |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  2. ^ टोनी कारोन. "Revisiting the Olympics' Darkest Day" (इंग्रजी भाषेत). ६ नवम्बर २०१७ रोजी पाहिले. Unknown parameter |trans_title= ignored (सहाय्य); |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  3. ^ केली, कैथल. "Munich massacre helped unwittingly by Canadians in 1972 Olympic atrocity" (इंग्रजी भाषेत). ६ नवम्बर २०१७ रोजी पाहिले. Unknown parameter |trans_title= ignored (सहाय्य); |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  4. ^ https://kheliyad.com/the-1972-munich-massacre-in-olympic-history/
  5. ^ सायमन बुर्टान. "50 stunning Olympic moments No 26: The terrorist outrage in Munich in 1972" (इंग्रजी भाषेत). ६ नोव्हेंबर २०१७ रोजी पाहिले.
  6. ^ वृत्त चित्र वन डे इन सप्टेंबर, निर्देशक केविन मैकडोनाल्ड
  7. ^ a b Simon Reeve. One Day in September: The Full Story of the 1972 Munich Olympics Massacre and the Israeli Revenge Operation "Wrath of God".
  8. ^ Brendan Gallagher. "Athletics: Memories stirred of Olympic hostage horror" (इंग्रजी भाषेत). ८ नवम्बर २०१७ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  9. ^ डेव्हीड फ्लेमिंग. "Remembering the Munich 11?". Sports Illustrated (इंग्रजी भाषेत). Archived from the original on 16 September 2000. ८ नवम्बर २०१७ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  10. ^ जेम्स मोंटेग. "The Munich massacre: A survivor's story" (इंग्रजी भाषेत). ८ नवम्बर २०१७ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)