मायकेल फॅरेडे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
थॉमस फिलिप्स याने चितारलेले मायकेल फॅरेडे याचे चित्र (काळ: सुमारे इ.स. १८४१-४२)[१]

मायकेल फॅरेडे (देवनागरी लेखनभेद: मायकेल फॅराडे ; इंग्लिश: Michael Faraday ;) (सप्टेंबर २२, इ.स. १७९१ - ऑगस्ट २५, इ.स. १८६७) हा इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ आणि रसायनशास्त्रज्ञ होता. त्याने विद्युतचुंबकत्व आणि विद्युत रसायनशास्त्र या विज्ञानाच्या शाखांमध्ये महत्त्वपूर्ण संशोधन केले.

जन्म आणि सुरुवातीचे आयुष्य[संपादन]

मायकेल फॅरेडे याचा जन्म सप्टेंबर २२, इ.स. १७९१ रोजी न्यूइंग्टन बट्स, सरे, इंग्लंड येथे झाला. घरच्या गरीब परिस्थितीमुळे फॅरेडे फक्त जुजबी शिक्षण घेऊ शकला व वयाच्या १४ व्या वर्षी त्याला एका पुस्तकाच्या दुकानात नोकरी पत्करावी लागली. या नोकरीच्या काळात त्याने दुकानात जुळवण्यासाठी आलेली पुस्तके भरपूर वाचून काढली. तो electric boy म्हणून ओळखला जातो.

संदर्भ[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: