मार्को पोलो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मार्को पोलो

मार्को पोलो (१२५४:व्हेनिस - १३२५) हा सध्याच्या इटलीतील व्हेनिस प्रजासत्ताकमधील एक हौशी साहसी भ्रमंती करणारा होता. मंगोल साम्राज्याच्या का़ळात याने चीनला भेट दिली व परतीच्या वाटेवर भारत व इतर आशियाई देश व अरबस्तानात अनुभव घेउन पुन्हा व्हेनिसला आला. व आल्यानंतर त्याने आपल्या साहसी सहलींचे वर्णन युरोपपुढे केले. त्याने आपल्या भ्रमंतीवर अनेक पुस्तके लिहिली. ज्याचा परिणाम युरोपच्या जनमानसावर झाला.

मार्कोने वयाच्या सोळाव्या वर्षी, १२७० मध्ये प्रवासास सुरुवात केली. त्याने आशिया खंडात चीनपर्यंत प्रवास करून पूर्वेकडील देशांमधील निसर्ग, सांस्कृतिक जीवन, व्यापार इत्यादीविषयी बारीक माहिती मिळवली. या माहितीच्या आधारामुळेच युरोपियन लोकांचा आशियाई लोकांशी संवाद आणि व्यापार सुरू झाला. १२७० साली प्रवासास निघालेला मार्को इराण, अफगाणिस्तान, मामीरचे पठार असा खडतर प्रवास करीत १२७५ मध्ये चीनमध्ये पोहोचला. मार्कोचे विविध भाषांचे ज्ञान, त्याची आकलनशक्ती, प्रवासातील माहितीने प्रभावित होऊन चीनचा सम्राट कुब्लाखान याने मार्कोला सरकारी नोकरीत ठेवले. १७ वष्रे चीनमध्ये राहिलेला मार्को १२९५ साली व्हेनिसला परत आला.

पुढे तीन वर्षांनी १२९८ साली व्हेनिस जिनोआ युद्धात मार्को पकडला जाऊन जिनोआच्या तुरुंगात युद्धकैदी बनून राहिला. आपल्या प्रवासातील विस्मयकारक हकिकती तो इतर कैद्यांना सांगत असे. त्याच तुरुंगातील एका लेखक कै याने मार्कोच्या रोजनिशीवरून ‘डिस्क्रिप्शन ऑफ वर्ल्ड’ हे पुस्तक लिहिले. मूळचे लॅटिनमध्ये लिहिलेले हे पुस्तक पुढे अनेक युरोपियन भाषांमध्येही प्रसिद्ध झाले. मार्कर्ो पोलोचा चीन ते व्हेनिस परतीचा प्रवास इ.स. १२९२ ते १२९५ असा झाला. परतीच्या प्रवासात मार्कोने भारताच्या दक्षिण किनारपट्टीतूनही प्रवास केला. दक्षिणेतील मलबार प्रांताचे लोकजीवन, तिथली गूढविद्या याचेही मार्कोच्या पुस्तकात वर्णन आहे. पुढे दोन शतकांनी मार्को पोलोचे पुस्तक ख्रिस्तोफर कोलंबस याच्या वाचनात आले आणि भारतासाठी जलमार्गाचा शोध घेण्याचा ध्यास त्याने घेतला! आशियाई देशांची मूलभूत माहिती युरोपियन लोकांना प्रथम मार्को पोलोच्या नोंदीमुळेच झाली.

मार्को पोलोच्या भारत व चीनच्या वर्णनांमुळे युरोपभर भारतभेटीचे वेध लागले व त्याचे पर्यवसान पुढे कोलंबसवास्को द गामाच्या साहसी शोधांमध्ये झाले.