गूगल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
गूगल इन्कॉर्पोरेटेड
ब्रीदवाक्य Don't be evil
प्रकार सार्वजनिक कंपनी
उद्योग क्षेत्र इंटरनेट, संगणक सॉफ्टवेर
स्थापना मेन्लो पार्क, कॅलिफोर्निया
सप्टेंबर ७, १९९८
मुख्यालय माउंटन व्ह्यू, कॅलिफोर्निया, अमेरिका
महत्त्वाच्या व्यक्ती एरिक ई. श्मिट, मुख्य कार्यकारी अधिकारी, संचालक
सर्जी ब्रिन, सहसंस्थापक, तंत्रज्ञान अध्यक्ष
लॅरी पेज, सहसंस्थापक, उत्पादन अध्यक्ष
महसूली उत्पन्न १०,६०४ अब्ज अमेरिकन डॉलर (२००६)
एकूण उत्पन्न
(कर/व्याज वजावटीपूर्वी)
३,०७७ अब्ज अमेरिकन डॉलर (२००६)
कर्मचारी १५,९१६ (सप्टेंबर ३०, २००७)
संकेतस्थळ www.google.com

गूगल (किंवा गूगल इनकॉर्पोरेटेड) (इंग्लिश: Google, नॅसडॅक: GOOG) नावाची अमेरिकन कंपनी गूगल शोधयंत्र, ऑर्कुट, यूट्यूब, ॲडसेन्स व इतर अनेक सेवा पुरवते.

गूगल कंपनी विशेषत: आंतरजाल-शोध व आंतरजाल-जाहिराती या क्षेत्रांत सेवा पुरवते. डिसेंबर ३१, २००६ रोजी गूगल मध्ये १०,६७४ लोक काम करीत होते. गूगलचे मुख्यालय अमेरिकेमधील कॅलिफोर्निया राज्यात माउंटन व्ह्यू येथे आहे. गूगलची स्थापना लॅरी पेजसर्गेई ब्रिन यांनी सप्टेंबर ७, १९९८ रोजी केली. एरिक श्मिट हे गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.

गूगल हे नाव Googol या मूळ इंग्रजी नावावरून आले आहे. एकावर शंभर शून्य ह्या मोठ्या संख्येचे Googol हे नाव आहे.

गूगल चा जीमेल मराठी भाषेत उपलब्ध