Jump to content

पी.ए. संगमा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पी.ए. संगमा हे आधी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे व नंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याचा विरोध धुडकावून त्यांनी स्वतःला राष्ट्रपदाचा उमेदवार घोषित केले. त्यामुळे त्यांची राष्ट्रवादी काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आली. त्यानंतर संगमा यांनी राष्ट्रीय जनता पक्ष नावाचा एक नवाच राजकीय पक्ष स्थापन केला. २०१४ साली झालेल्या भारताच्या लोकसभेच्या निवडणुकांसाठी त्यांनी त्यांच्या पक्षाचे उमेदवार उभे केले होते. दुर्दैवाने ते सर्वजण पडले. मात्र, निवडणुकीच्या खर्चाचा तपशील सादर न केल्याने निवडणूक आयोगाने जून २०१५मध्ये, पी.ए. संगमा यांच्या राष्ट्रीय जनता काँग्रेसची मान्यता रद्द केली.

मागील:
शिवराज पाटील
लोकसभेचे अध्यक्ष
मे २५, इ.स. १९९६मार्च २३,इ.स. १९९८
पुढील:
जी.एम‌.सी.बालयोगी