जेरुसलेम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जेरुसलेम
ירושלים
इस्रायल देशाची राजधानी

Jerusalem infobox image.JPG

Flag of Jerusalem.svg
ध्वज
Emblem of Jerusalem.svg
चिन्ह
जेरुसलेम is located in इस्रायल
जेरुसलेम
जेरुसलेम
जेरुसलेमचे इस्रायलमधील स्थान

गुणक: 31°47′N 35°13′E / 31.783°N 35.217°E / 31.783; 35.217

देश इस्रायल ध्वज इस्रायल
जिल्हा जेरुसलेम जिल्हा
महापौर निर बरकत
क्षेत्रफळ १२५.१६ चौ. किमी (४८.३२ चौ. मैल)
लोकसंख्या  
  - शहर ७,६०,८००
http://www.jerusalem.muni.il


जेरुसलेम ही इस्रायल देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. जेरुसलेम हे जगातील सर्वात जुन्या व पौराणिक शहरांपैकी एक आहे. यहुदी धर्मामध्ये जेरुसलेम शहर पृथ्वीवरील सर्वात पवित्र तर इस्लाम धर्मामध्ये तिसरे सर्वात पवित्र ठिकाण मानले जाते. तसेच जेरुसलेम येथे अनेक ऐतिहासिक ख्रिस्ती स्थळे व वास्तू आहेत.

जेरुसलेमचा ताबा व अखत्यारी हे इस्रायल-पॅलेस्टाइन दरम्यान सुरू असलेल्या भांडणाचे प्रमुख कारण आहे. पूर्व जेरुसलेम कायदेशीर रित्या जरी वेस्ट बँकचा भूभाग असला तरी तेथील अनेक जागांवर इस्रायलने लष्करी कब्जा करून अतिक्रमण केले आहे.

जेरुसलेममधील अस्थिर राजकीय परिस्थितीमुळे अनेक देशांनी आपले इस्रायलमधील दूतावास तेल अवीव येथे हलवले आहेत.

हे सुद्धा बघा[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत