कार्ली फियोरिना

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कारा कार्ल्टन कार्ली फियोरिना तथा कारा स्नीड (६ सप्टेंबर, १९५४:ऑस्टिन, टेक्सास, अमेरिका - ) या अमेरिकन उद्योजक आहेत. या ह्युलेट-पॅकार्ड कंपनीच्या मुख्याधिकारी होत्या.

फियोरिनाच्या एचपीमधील कारकिर्दीत एचपीने प्रतिस्पर्धी कॉम्पॅकला विकत घेतले व त्याद्वारे एचपी जगातील सगळ्यात मोठी संगणक उत्पादक कंपनी झाली. त्यानंतर एचपीने ८०,००० लोकांची नोकरी सांभाळण्यासाठी ३०,००० कर्मचाऱ्यांना बरखास्त केले. फेब्रुवारी २००५मध्ये संचालकमंडळाशी मतभेद झाल्याने त्यांना राजीनामा देणे भाग पडले.

२०१०मध्ये त्यांनी रिपब्लिकन पक्षातर्फे कॅलिफोर्नियाच्या सेनेटरपदासाठी निवडणूक लढवली परंतु त्यात त्या बार्बरा बॉक्सरकडून पराभूत झाल्या. २०१५-१६मध्ये त्यांनी रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्राध्यक्षीय प्राथमिक निवडणूकीत भाग घेतला आणि माघार घेतली.