दुर्गा खोटे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
दुर्गा खोटे
अमर ज्योती (इ.स. १९३६) चित्रपटात दुर्गा खोटे
जन्म जानेवारी १४, इ.स. १९०५
मुंबई, ब्रिटिश भारत
मृत्यू सप्टेंबर २२, इ.स. १९९१
मुंबई, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषा मराठी
प्रमुख चित्रपट अयोध्येचा राजा

दुर्गा खोटे (जानेवारी १४, इ.स. १९०५ - सप्टेंबर २२, इ.स. १९९१) या मराठी अभिनेत्री होत्या. इ.स. १९३२ सालच्या अयोध्येचा राजा या मराठीतील पहिल्या बोलपटात प्रमुख भूमिकांपैकी राणी तारामतीची भूमिका यांनी केली होती. भरत मिलाप (इ.स. १९४२) चित्रपटात कैकेयी, तर मुघल-ए-आझम (इ.स. १९६०) चित्रपटात जोधाबाई, इत्यादी यांनी रंगवलेल्या भूमिकादेखील विशेष गाजल्या. सुमारे पाच दशकांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत यांनी मराठीहिंदी भाषांतील अनेक चित्रपट व नाटकांतून भूमिका केल्या. इ.स. १९६८ साली पद्मश्री पुरस्कार, तर इ.स. १९८३ साली दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन यांना गौरवण्यात आले.

बाह्य दुवे[संपादन]Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.