क्रुसेड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
अँटीयक चा वेढा

क्रुसेड ही मध्य पूर्वेतील Holy Land ("पवित्र भूमी") व जेरुसलेम च्या ताब्या साठी लादलेली धार्मिक युद्धे होती. क्रुसेड ची युद्धे मुख्यतः फ्रेंच पवित्र रोमन साम्राज्य, कॅथोलिक युरोप व सेल्युक तुर्क, मामलुक, सुलतान सलादीन सारख्या मुस्लिम राज्यांमध्ये झाली.

इ.स. 1095 मध्ये, पोप अर्बन दुसरा याने यरुशलेमे जवळ असणाऱ्या सर्व पवित्र ख्रिश्चन धर्मस्थळचे पुन्हा ताबे मिळवण्यासाठी या लढ्याची घोषणा केली. पहिल्या क्रुसेड पासून जवळजवळ २०० वर्ष पवित्र भूमीच्या ताब्यासाठी हा संघर्ष चालू होता. १२९१ मध्ये ख्रिश्चनानचा बालेकिल्ला एकर(Acre ) चा पाडाव झाला आणि या संघर्षाचा अंत झाला. हा ख्रिश्चनानचा पराभव होता. यानंतर युरोपातून एकही क्रुसेड पवित्र भूमीत परतली नाही.

रशिदुन आणि उमय्याद कॅलिफ यांच्या नेतृत्वाखालील मुस्लिम आक्रमणा समोर ब्य्झातीन साम्राज्य अधिक काळ टिकाव धरू शकले नाही आणि ते आपला बराचसा प्रदेश गमाउन बसले. हे युद्धे अरब-ब्य्झातीन आणि ब्य्झातीन-सेल्जुक़ युद्धे(Arab–Byzantine Wars and the Byzantine–Seljuq Wars) म्हणून ओळखले जातात. या युद्धांमुळे अनातोलियाचा विस्तार्ण सुपीक प्रदेश मुस्लिम साम्राज्यात गेला. १०७१ मध्ये, मान्झीकेर्त च्या लढाईत सेल्जुक तुर्कांकडून झालेल्या पराभवा नंतर, पोप अर्बन दुसरा याच्या नेतृत्वाखाली सर्व ख्रिश्चन चर्च एकत्र आले.


सुलतान सलादीन


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.