Jump to content

मोक्षगुंडम विश्वेश्वरैया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मोक्षगुंडम विश्वेश्वरैया
ಮೋಕ್ಷಗುಂಡಂ ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯ

जन्म सप्टेंबर १५, १८६१
मुद्देनहळ्ळी, चिकबळ्ळापूर तालुका व जिल्हा, मैसूर संस्थान (सध्या कर्नाटक)
मृत्यू १४ एप्रिल, १९६२ (वय १००)
बंगळूर
निवासस्थान मुद्देनहळ्ळी, चिकबळ्ळापूर तालुका व जिल्हा, मैसूर संस्थान (सध्या कर्नाटक)
नागरिकत्व भारतीय
राष्ट्रीयत्व भारतीय
वांशिकत्व भारतीय
धर्म हिंदू
कार्यक्षेत्र अभियांत्रिकी
कार्यसंस्था अभियंता, मैसूरचे दिवाण
प्रशिक्षण अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे
ख्याती आंतरराष्ट्रीय इन्स्टिट्यूट ऑफ सिव्हिल इंजिनिअर्स यालंडन स्थित संस्थेचे सन्माननिय सदस्यत्व, तर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स च्या बंगळूर शाखेची फेलोशिप
पुरस्कार भारतरत्न, 'नाईट कमांडर ऑफ दी ऑर्डर ऑफ दी इंडियन एंपायर'
वडील श्रीनिवास शास्त्री
आई वेंकट लक्षम्मा
Visvesvarayya in Karnataka.com

मोक्षगुंडम विश्वेश्वरैय्या, ('नाईट कमांडर ऑफ दी ऑर्डर ऑफ दी इंडियन एंपायर') ; (कन्नड:ಶ್ರೀ ಮೋಕ್ಷಗುಂಡಂ ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯ); (सप्टेंबर १५ १८६१ - एप्रिल १४ १९६२). हे एक भारतातील कर्नाटक राज्यातील चिकबळ्ळापूर तालुक्यातील कोलार जिल्ह्यातील मुद्देनहळ्ळी या गावी जन्मलेले समर्थ अभियंते व नागरिक होते. सन १९५५ मध्ये त्यांना भारतरत्न हा भारतातील सर्वोच्च सन्मान मिळाला. ब्रिटीशांनी त्यांना, त्यांनी केलेल्या जनहिताच्या चांगल्या कामामुळे 'नाईट' (knight) या पुरस्काराने सन्मानित केले. भारतात त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ प्रत्येक वर्षी १५ सप्टेंबर हा दिवस अभियंता दिन म्हणून पाळला जातो.[] काही ठिकाणी विशेषतः त्यांच्या जन्मराज्य असलेल्या कर्नाटकात या दिवशी सार्वजनिक सुट्टी असते.

बालपण

[संपादन]

यांचा जन्म भारतातील कर्नाटक राज्यातील चिकबळ्ळापूर तालुक्यातील कोलार जिल्ह्यातील मुद्देनहळ्ळी या गावी झाला. ते श्रीनिवास शास्त्री व वेंकटलक्षम्मा यांचे अपत्य होते. त्यांचे जन्मगाव पूर्वी मैसूर राज्यात होते. त्यांचे वडील हे एक संस्कृत विद्वान, हिंदू ग्रंथांचे भाष्यकार आणि आयुर्वेदिक वैद्य होते. त्यांचे पूर्वज हे मोक्षगुंडम या गिद्दलपूर नजीकच्या, सध्याच्या आंध्र प्रदेशातील प्रकाशम जिल्ह्यात असलेल्या गावातील होते. त्यांनी मैसूर राज्यात सुमारे तीन शतकापूर्वी स्थलांतर केले. 'मोक्षगुंडम' हे नाव त्यांची आंध्र प्रदेशशी असलेली संलग्नता दाखवते.

तरुण विश्वेश्वरैय्या यांच्या वडिलांचे ते १५ वर्षाचे असतांना निधन झाले. त्याने त्यांचे कुटुंब हादरले. त्यानंतर ते परतकुर्नुल येथून मुद्देनहळ्ळीला आले. त्यांचे प्राथमिक शिक्षण चिकबळ्ळापूर येथे तर उच्चमाध्यमिक शिक्षण बंगळूर येथे झाले. ते १८८१ साली मद्रास येथून बी.ए.ची परीक्षा उच्च श्रेणीत उत्तीर्ण झाले. स्थापत्य अभियांत्रिकीचे पुढील शिक्षण त्यांनी कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, पुणे मध्ये पुणे येथे घेतले. १८८३ मध्ये ते इंजिनिअरिंगच्या पदवी परीक्षा प्रथम श्रेणीने उत्तीर्ण झाले.

चित्र:SirMVfamily.JPG
A family photograph

अभियंता म्हणून वाटचाल

[संपादन]

अभियांत्रिकीमध्ये स्नातक झाल्यावर, त्यांनी बॉम्बे (सध्याचे मुंबई) येथे सार्वजनिक बांधकाम विभागात नोकरी केली. नंतर त्यांना भारतीय पाटबंधारे महामंडळ येथून निमंत्रण आले. त्यांनी, दख्खन क्षेत्रात पाटबंधाऱ्यांची एक अतिशय क्लिष्ट योजना राबविली. त्यांनी 'सांडव्याची स्वयंचलीत पूरनियंत्रण द्वार प्रणाली' विकसित केली व त्याचे पेटेंट घेतले, जी सन १९०३ मध्ये पहिल्यांदा पुण्याजवळील खडकवासला धरणास लावण्यात आली. ह्याद्वारे धरणातील साठ्याची पूर-पातळी, पूर आल्यावर धरणास कोणताही धोका न होता, उच्चतम स्थितीस वाढविण्यास वापरण्यात आली. या द्वारांच्या कामात मिळालेल्या यशामुळे, ती टिग्रा धरण ग्वाल्हेरकृष्णराज सागर धरण म्हैसूर येथे बसविण्यात आली. विश्वेश्वरैया यांनी हैदराबाद शहराचे पुरापासून संरक्षण करण्यासाठी जी प्रणाली विकसित केली त्यासाठी त्यांना सन्मानित करण्यात झाले. विशाखापट्टणम बंदरास समुद्री पाण्यापासून गंजरोधक करण्याची प्रणाली तयार करण्यातही त्यांनी पुढाकार घेतला.

सर मो. विश्वेश्वरैया यांनी, कावेरी नदीवर कृष्णराजसागर धरण बांधण्याच्या प्रस्तावापासून ते उद्घाटनपर्यंत सर्व कामांची देखरेख केली. या बांधकामाने, धरण बांधल्या गेल्याच्या वेळचे ते आशियातील सर्वात मोठे सरोवर निर्माण झाले. त्यांना यामुळे, 'मैसूर राज्याचे पिता' म्हणून ओळखले जायचे. त्यांच्या म्हैसूर राज्याचे नोकरीदरम्यान त्यांनी सरकारच्या नियंत्रणाखालील मैसूर सोप फॅक्टरी, किटकनाशक प्रयोगशाळा, भद्रावती आयर्न व स्टील वर्कस्, श्री जयचमाराजेंद्र पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट, बंगळूर ॲग्रीकल्चरल युनिव्हर्सिटी, स्टेट बँक ऑफ मैसूर, सेंचुरी क्लब, मैसूर चेंबर ऑफ कॉमर्स असे अगणी औद्योगिक प्रकल्प सुरू केले. त्यांनी उद्योगात खाजगी गुंतवणुकीवर भर दिला. ते प्रामाणिकपणा, वेळेचे नियोजन व कामातील पूर्ण समर्पणासाठी ओळखले जात होते. तिरुमला-तिरुपती दरम्यानच्या रस्तेबांधणीतही त्यांनी योगदान केले.

मैसूर येथे दिवाण म्हणून

[संपादन]

सन १९०८ मध्ये स्वेच्छानिवृत्तीनंतर, मैसूर या भारतातील मोठ्या व महत्त्वाच्या राज्याचे दिवाण म्हणून त्यांना नियुक्त केले गेले. कृष्णराज वोडेयार चतुर्थ या मैसूरच्या महाराजांच्या पाठिंब्यामुळे विश्वेश्वरया यांनी राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी मोठे योगदान दिले. इतर अनेक कामांसोबत सन १९१७ मध्ये बंगळूर येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाची त्यांनी स्थापना केली. ही भारताची पहिली अभियांत्रिकी संस्था होती. ती अद्यापही कर्नाटकातील एक प्रतिष्ठित संस्था आहे.

पुरस्कार व सन्मान

[संपादन]
त्यांना मिळालेले 'भारतरत्न' पदक

ते म्हैसूर येथे असतांना त्यांनी जनतेसाठी केलेल्या कामांमुळे, 'नाईट कमांडर ऑफ दी ऑर्डर ऑफ दी इंडियन एंपायर' या सन्मानाने गौरविले गेले. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर, त्यांना सन १९५५ मध्ये 'भारतरत्न' या देशाच्या सर्वोच्च पुरस्काराने गौरविले गेले.

'नाईट कमांडर ऑफ दी ऑर्डर ऑफ दी इंडियन एंपायर' पदक

सर मो.विश्वेश्वरैया यांना आंतरराष्ट्रीय इन्स्टिट्यूट ऑफ सिव्हिल इंजिनिअर्स या लंडन स्थित संस्थेने सन्माननीय सदस्यत्व, तर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सच्या बंगळूर शाखेने फेलोशिप देऊन त्यांचा सन्मान केला. देशातील अनेक विद्यापीठांनी त्यांना 'डॉक्टर' ही अनेक विद्याशाखातली पदवी देऊन गौरविले. ते सन १९२३ च्या इंडियन सायन्स काँग्रेसचे अध्यक्ष होते.

मुद्देनहळ्ळी येथील कौटुंबिक मंदिर

[संपादन]

त्यांच्या आईस शेतात जाताना एका दगडावर कोरलेली एक मूर्ती दिसली. ती कोणाची आहे अशी गावात विचारपूस केल्यावर कोणीच समोर येईना. म्हणून त्यांनी ती घरी आणून त्याची घरी प्रतिष्ठापना केली. हेच त्यांचे कौटुंबिक मंदिर होय. हे हनुमानाचे मंदिर अजूनही अस्तित्वात आहे.

मुद्देनहळ्ळी येथील स्मारक

[संपादन]
सर मो.विश्वेश्वरैया यांची मुद्देनहळ्ळी येथिल समाधी

नंदी हिल्सच्या पृष्ठभूमीवर, सर मो.विश्वेश्वरैया यांचे, त्यांच्या कुटुंबाच्या मालकीच्या भूमीवर,एक सुंदर व चित्रमय स्मारक मुद्देनहळ्ळी येथे उभारण्यात आले आहे.

विश्वेश्वरय्या यांच्या सन्मानाप्रित्यर्थ निघालेल्या संस्था

[संपादन]

विश्वेश्वरया यांनी लिहिलेली पुस्तके

[संपादन]
नाव प्रकाशन वर्ष (इ.स.)
Vision of prosperous Mysore १९०७
Speeches of Sir Visvevaraya (Diwan of Mysore) १९१७
Reconstructing India १९२०
Unemployment in India Causes and Cure १९३२
Planned Eeonomy of India १९३४
Nation Building १९३७
District Development Schemes (Economic progress by forced marches) १९३९
Prosperity Through Industry (move towards rapid industrialization) १९४२
1942 Memories of my Working Life (Reprint) १९५१
Saying - Wise or Witty (compiled by MV) १९५७
Building of Modern India १९५७
Brief Memories of My Complete Working Life १९५९
Rapid Development of Industries १९४७
Village Industiralization of Mysore Vol. I, II & III १९५५-५७
Village Industries Handbook Vol. I & II १९५७-५८
Reconstructing of Postwar India १९४४
Building of Modern India १९५६
Automobile Factory in Bombay (Vols.1 to 4) १९३३,३६,३८,४०
Govt. and Automobile Industry in India १९४०
The Indian Automobile Co. Ltd. The Explanatory Note १९४०
District Industiralization Drive १९४३
Iron & Steel Industry of India १९४३
Development Industries in the Province १९४५
Rural Industrialization of Mysore (Vol. 1) १९५५
Rural Industrialization of Mysore (Vol. 2) १९५५
Rural Industrialization of Mysore (Vol. 3) १९५७
Rural Industrialization of Mysore (Vol. 4) १९५९
Village Industries (Part I & II ) १९५०

[]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "अभियंता दिन: १५ सप्टेंबर". 2019-11-27 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
  2. ^ धाराशिवकर, २०१८ पृ. विश्वेश्वरय्या यांनी लिहिलेली पुस्तके.

संदर्भसूची

[संपादन]

धाराशिवकर, मुकुंद. द्रष्टा अभियंता सर विश्वेश्वरय्या.

बाह्य दुवे

[संपादन]

वरील दुव्याची वेबॅक मशिनवरील आवृत्ती जानेवारी २८, २००७ (वरील दुव्यात त्रुटी जाणवल्याने वेबॅक मशिन वापरुन ही आवृत्ती मिळवलेली आहे.)

वरील दुव्याची वेबॅक मशिनवरील आवृत्ती नोव्हेंबर २०, २००५ (वरील दुव्यात त्रुटी जाणवल्याने वेबॅक मशिन वापरुन ही आवृत्ती मिळवलेली आहे.)