हूवर धरण
Appearance
(हूवर डॅम या पानावरून पुनर्निर्देशित)
हूवर धरण | |
हूवर धरण | |
धरणाचा उद्देश | दुष्काळी व वाळवंटी भागांत पाणी, जलविद्युत |
---|---|
अडवलेल्या नद्या/ प्रवाह |
कॉलोराडो नदी |
स्थान | नेव्हाडा व अॅरिझोना राज्यांच्या सीमा |
लांबी | ३७९ मीटर |
उंची | २२१.४ मीटर |
रुंदी (तळाशी) | १४ मीटर |
बांधकाम सुरू | १९३१ |
उद्घाटन दिनांक | ३० सप्टेंबर १९३५ |
बांधकाम खर्च | $४९ दशलक्ष |
जलाशयाची माहिती | |
क्षमता | २४,८०,००० घन मीटर |
जलसंधारण क्षेत्र | ४,५३,००० वर्ग मीटर |
क्षेत्रफळ | ६४० वर्ग मीटर |
विद्युत उत्पादनासंबंधित माहिती | |
टर्बाइनांची संख्या | १७ |
स्थापित उत्पादनक्षमता | ४०८० मॅगावॅट |
वार्षिक निर्मिती | ४२,००,००,००,००० किलोवॅट्स |
भौगोलिक माहिती | |
हूवर धरण |
|
निर्देशांक | 36°00′56″N 114°44′16″W / 36.015556°N 114.737778°W |
हूवर धरण (इंग्लिश: Hoover Dam) हे अमेरिकेच्या नेव्हाडा व अॅरिझोना राज्यांच्या सीमेवरून वाहणाऱ्या कॉलोराडो नदीवरील एक धरण आहे. १९३६ साली बांधून पूर्ण केलेले हूवर धरण ३७९ मी लांब व २२१.४ मी उंच आहे या धरणाच्या मागील बाजूला मीड हे जगातील खुपच मोठ्या तळ्यांपैकी एक तळे आहे. या तळ्याने ६०३ वर्ग इतके क्षेत्रफळ व्यापलेले आहे. या तळ्याच्या काठाची लांबी ८८९ कि. मी. इतकी आहे. हुव्हर धरणातून जलविद्यूत निर्माण करण्याची सोय आहे. [१]
नैऋत्य अमेरिकेतील दुष्काळी व वाळवंटी भागांत पाणी तसेच जलविद्युत निर्मितीसाठी हे धरण बांधले गेले. ह्या धरणामधून २०८० मेगावॉट विजनिर्मिती व ११,००० घनमीटर प्रतिसेकंद जलप्रवाह होऊ शकतो. लास व्हेगास शहराच्या ४० किमी आग्नेयेला असलेले हूवर धरण ह्या भागातील एक लोकप्रिय पर्यटक आकर्षण आहे.
संदर्भ
[संपादन]- ^ भालेराव, विवेक (२००७). जगातील आश्चर्ये. औरंगाबाद: साकेत प्रकाशन. pp. ३०. ISBN 81-7786-399-1.
बाह्य दुवे
[संपादन]विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
- अधिकृत संकेतस्थळ
- नेव्हाडा राज्याचे पर्यटन संकेतस्थळ Archived 2018-06-01 at the Wayback Machine.