Jump to content

विल्यम मॅककिन्ली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
विल्यम मॅककिन्ली

सही विल्यम मॅककिन्लीयांची सही

विल्यम मॅककिन्ली, कनिष्ठ (इंग्लिश: William McKinley, Jr., विल्यम मॅककिन्ली, ज्यूनियर) (२९ जानेवारी, इ.स. १८४३ - १४ सप्टेंबर, इ.स. १९०१) हा अमेरिकेचा २५वा राष्ट्राध्यक्ष होता. ४ मार्च, इ.स. १८९७ रोजी अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतलेल्या मॅककिन्लीची अध्यक्षपदावर असतानाच १४ सप्टेंबर, इ.स. १९०१ रोजी हत्या झाली. याच्या अध्यक्षीय राजवटीत अमेरिकेने स्पॅनिश-अमेरिकन युद्ध जिंकले.

पेशाने वकील असलेला मॅककिन्ली रिपब्लिकन पक्षाचा सदस्य होता. इ.स. १८७९ ते इ.स. १८९१ या कालखंडात त्याने अमेरिकन प्रतिनिधिगृहात ओहायोचे प्रतिनिधित्व केले. त्यानंतर इ.स. १८९२ ते इ.स. १८९६ या काळात तो ओहायोचा गव्हर्नर होता.

बाह्य दुवे[संपादन]

  • "व्हाइट हाउस संकेतस्थळावरील अधिकृत परिचय" (इंग्लिश भाषेत). Archived from the original on 2012-08-29. 2011-09-27 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  • वरील दुव्याची वेबॅक मशिनवरील आवृत्ती फेब्रुवारी ६, २०१० (वरील दुव्यात त्रुटी जाणवल्याने वेबॅक मशिन वापरुन ही आवृत्ती मिळवलेली आहे.)
  • "विल्यम मॅककिन्ली: अ रिसोर्स गाइड (विल्यम मॅककिन्ली: संसाधनांची मार्गदर्शिका)" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)