Jump to content

पापम्मल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पाप्पम्मल
जन्म १९१४
देवलापुरम, कोईम्बतूर, तामिळनाडू,
टोपणनावे रंगम्मल
वांशिकत्व भारतीय
नागरिकत्व भारतीय
पेशा शेतकरी
प्रसिद्ध कामे सेंद्रिय शेती
राजकीय पक्ष द्रविड मुनेत्र कळघम
पुरस्कार पद्मश्री पुरस्कार


पापम्मल किंवा पाप्पम्मल (जन्म १९१४) ह्या भारतातील तामिळनाडू राज्यातील एक महिला सेंद्रिय शेतकरी आहेत. वयाच्या १०५ व्या वर्षी त्या अजून दररोज आपल्या अडीच एकर जमिनीवर काम करत असतात. त्यांचा असा दावा आहे की त्या शेतात नियमित काम करणाऱ्या सर्वात वयस्कर शेतकरी आहेत.[१][२][३] पापम्मल ह्या कृषी क्षेत्रातील अग्रगण्य असून तामिळनाडू कृषी विद्यापीठाच्या शिक्षण विभागाशी त्या संलग्न आहेत. भारत सरकारने पापम्म्ल याना इस २०२१चा चौथ्या सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मश्री देऊन सन्मानित करण्यात आले.[४][५][६]

वैयक्तिक जीवन[संपादन]

एम. पप्पम्मल उर्फ ​​रंगम्मल यांचा जन्म इ.स. १९१४ मध्ये देवलापुरम गावात वेलम्मल आणि मरुथचला मुदलियार यांच्याकडे झाला. लहान वयातच त्यांच्या आई-वडिलांचे निधन झाले. त्यांचे आणि त्यांच्या दोन बहिणींचे पालनपोषण कोइम्बतूरच्या थेक्कमपट्टी येथे त्यांच्या आजीने केले. पप्पम्मल यांना एक दुकान वारसाहक्काने मिळाले आणि तेथे त्यांनी एक भोजनालय उघडले. या व्यवसायांतून मिळालेल्या नफ्यातून गावात त्यांनी जवळपास १० एकर जमीन विकत घेतली. कालांतराने त्यांच्याकडे यातील फक्त अडिच एक्कर जमीन शिल्लक आहे. त्यांनी आपल्या बहिणीच्या मुलांना देखील वाढवले.[१][७]

पाप्पम्मलचा दिवस पहाटे साडेपाच वाजता सुरू होतो आणि सकाळी सहा वाजता त्या शेतात जातात, जिथे त्या दुपारपर्यंत काम करतात. त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी असा दावा केला आहे की त्यांच्या खाण्याच्या सवयी आणि सक्रिय जीवनशैलीमुळे त्या अजून निरोगी आहेत. त्यांच्या कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, त्यांचे आवडते अन्न मटण बिर्याणी असून त्या जेवणासोबत वेगवेगळ्या भाज्या आणि कच्च्या हिरव्या पालेभाज्या खातात. त्या दररोज आपले गरमागरम जेवण केळीच्या पानावर ग्रहण करतात आणि यासाठी त्या कोणतेही ताट वापरत नाहीत. त्या चहा किंवा कॉफी घेत नाहीत मात्र फक्त गरम पाणी पितात.[१].[८]

राजकीय जीवन[संपादन]

1959 मध्ये त्या थेक्कमपट्टी पंचायतीच्या निवडून आलेल्या माजी वॉर्ड सदस्य होत्या. त्या करमादाई पंचायत युनियनमध्ये नगरसेवक म्हणूनही निवडून आल्या होत्या. त्या द्रविड मुन्नेत्र कळघम (डीएमके)च्या सदस्या आणि एम. करुणानिधी यांच्या मोठ्या चाहत्या आहेत.[१][९]

पुरस्कार[संपादन]

दिनांक ८ ऑगस्ट २०२१ रोजी पाप्पम्मल यांना भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद भारतातील चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार, पद्मश्री पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.[१][३]

संदर्भ[संपादन]

  1. ^ a b c d e Arivanantham, R. (2018-09-12). "At 103, hard work is what keeps her going". The Hindu (इंग्रजी भाषेत). ISSN 0971-751X. 2021-01-27 रोजी पाहिले.
  2. ^ "Rs 2 doc, 105-year-old woman farmer among TN Padma winners". dtNext.in (इंग्रजी भाषेत). 2021-01-26. Archived from the original on 2021-02-06. 2021-01-27 रोजी पाहिले.
  3. ^ a b Derhgawen, Shubhangi (2021-01-27). "Twitter Celebrates 105-Year-Old Farmer Honoured With Padma Shri". TheQuint (इंग्रजी भाषेत). 2021-01-27 रोजी पाहिले.
  4. ^ "Padma Awards 2021: The heroes of Indian agriculture". Mintlounge (इंग्रजी भाषेत). 2021-01-27. 2021-01-27 रोजी पाहिले.
  5. ^ "Organic farming pioneer: 105-year-old woman farmer from Coimbatore awarded Padma Shri". India Today (इंग्रजी भाषेत).
  6. ^ Staff Reporter (2021-01-26). "Ten from T.N. chosen for Padma Shri". The Hindu (इंग्रजी भाषेत). ISSN 0971-751X. 2021-01-27 रोजी पाहिले.
  7. ^ Singh, Ankita (2021-01-27). "Tamil Nadu: 105-Year-Old Woman Farmer From Coimbatore Awarded Padma Shri". The Logical Indian (इंग्रजी भाषेत). 2021-01-27 रोजी पाहिले.
  8. ^ "105-year-old organic farmer from Coimbatore is celebrating her Padma Shri award". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 2021-01-26. 2021-01-27 रोजी पाहिले.
  9. ^ "Meet Padma Shri Rangama, 105-year-old who donned many hats". The New Indian Express. 2021-01-27 रोजी पाहिले.