ऑलिंपिक खेळांचा इतिहास (ग्रीसमधील) ३००० वर्षांचा आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक खेळांची सुरुवात प्रथम १८९६ मधे अथेन्स येथे झाली. ग्रीस, जर्मनी, फ़्रान्स, इंग्लंड ,भारत सह १४ देशांचे खेळाडू या स्पर्धेत सामिल झाले होते. ६ एप्रिल १८९६ रोजी अमेरिकन खेळाडू जेम्स कोन्नोली याने पहिले ऑलिंपिक पदक जिंकले.
ऑलिंपिक वर्तुळाचा गोफ:उंच अशा स्तंभावर एक भलामोठा ध्वज फडफडत असलेला आम्हाला दिसला. ऑलिंपिक सामन्यांचे ते स्वतंत्र निशाण होते. ध्वजावरील पांढऱ्याशुभ्र पार्श्वभूमीवर लाल, पिवळ्या, निळ्या, हिरव्या व काळ्या रंगांची वर्तुळे एकमेकांत गुंफलेली होती. जणू पाच मित्रच हातांत हात घालून आपल्या मैत्रीची साक्ष जगाला देत होते! ही पाच वर्तुळे म्हणजे जगातील पाच खंड आणि त्यांची शुभ्रधवल पार्श्वभूमी म्हणजे विशाल अंतराळ. या ध्वजावर ऑलिंपिकचे ब्रीदवाक्य लिहिलेले आहे- 'सिटियस, ऑल्टियस, फॉर्टियस.' म्हणजे गतिमानता, उच्चता, तेजस्विता. प्रत्येक खेळाडूने जास्तीत जास्त गतिमान होण्याचा प्रयत्न केला पाहिजे; अधिकाधिक उंची गाठण्याची शिकस्त केली पाहिजे आणि बलसंवर्धनासाठी जास्तीत जास्त श्रम केले पाहिजेत, असा संदेश हा ध्वज खेळाडूंना देत असतो.
उन्हाळी ऑलिंपिक स्थानांचा नकाशा. एकदा यजमानपद भुषवलेले देश हिरव्या तर दोन व अधिक वेळा हा मान मिळालेले देश निळ्या रंगाने दर्शवले आहेत.हिवाळी ऑलिंपिक स्थानांचा नकाशा. एकदा यजमानपद भुषवलेले देश हिरव्या तर दोन व अधिक वेळा हा मान मिळालेले देश निळ्या रंगाने दर्शवले आहेत.