मनमोहनसिंग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(मनमोहन सिंग या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search


Broom icon.svg
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन
हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.


Imbox content.png
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. संदर्भ कसे निवडावेत याची माहिती येथे मिळेल तर संदर्भ कसे जोडायचे याची माहिती आपल्याला येथे मिळेल.
मनमोहन सिंग
मनमोहनसिंग


कार्यकाळ
मे १९, इ.स. २००४ – मे २६, इ.स. २०१४
राष्ट्रपती प्रतिभा पाटील

जन्म २६ सप्टेंबर, १९३२ (1932-09-26) (वय: ८६)
गाह, पश्चिम पंजाब, ब्रिटिश भारत
राष्ट्रीयत्व भारत
राजकीय पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
पत्नी गुरुशरण कौर
अपत्ये
धर्म शीख

डॉ.मनमोहन सिंग (मराठी लेखनभेद: मनमोहनसिंग ; पंजाबी: ਮਨਮੋਹਨ ਸਿੰਘ ; रोमन लिपी: Manmohan Singh) (जन्म : गाह-पंजाब, आता पाकिस्तान, २६ सप्टेंबर १९३२) हे २२ मे २००४पासून २६ मे २०१४पर्यंत) भारताचे पंतप्रधान होते. हे १४वे पंतप्रधान होते. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सदस्य असून राज्यसभेत आसामचे प्रतिनिधित्व करतात. यापूर्वी ते इ.स. १९९१ साली पी.व्ही. नरसिंहराव मंत्रिमंडळात केंद्रीय अर्थमंत्री होते. त्या काळात त्यांनी केलेल्या आर्थिक सुधारणा आणि त्यानंतर झालेल्या आर्थिक प्रगतीमुळे त्यांची कार्यक्षम राजकारणी म्हणून प्रतिमा बनली.[ संदर्भ हवा ]

आरंभिक जीवन[संपादन]

मनमोहनसिंगांच्या वडिलांचे नाव गुरुमुख सिंग आणि आईचे नाव अमृत कौर. मनमोहन सिंग हे अर्थशास्त्रात उच्चशिक्षित आहेत. त्यांनी पंजाब विद्यापीठ, केंब्रिज विद्यापीठ आणि ऑक्सफर्ड विद्यापीठ येथून शिक्षण घेतले आहे. संयुक्त राष्ट्रांच्या व्यापार आणि विकास विभागात काम करीत असताना, भारताचे तत्कालीन विदेश व्यापारमंत्री ललित नारायण मिश्रा यांनी मनमोहनसिंगांची आपल्या खात्यात सचिव म्हणून नियुक्ती केली.[ संदर्भ हवा ]

जीवनक्रम[संपादन]

  • सन १९५७ ते १९६५ - चंदीगडमधील पंजाब विश्वविद्यालयात प्राध्यापक.
  • इ.स. १९६९-१९७१ - दिल्ली स्कूल ऑफ इकाॅनॉमिक्स या संस्थेत आंतरराष्ट्रीय व्यापार विषयाचे प्राध्यापक.
  • इ.स. १९७६ - दिल्लीमधील जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयात मानद प्राध्यापक.
  • इ.स. १९८२ से १९८५ भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर.
  • इ.स. १९८५ से १९८७ – [[भारताचा योजना आयोग|भारताचा योजना आयोग]ाचे उपाध्यक्ष.
  • इ.स. १९९० से १९९१ - भारतीय पंतप्रधानाचे आर्थिक सल्लागार.
  • इ.स. १९९१ - नरसिंह राव यांच्या नेतृत्वातील काँग्रेस सरकारमध्ये अर्थमंत्री.
  • इ.स. १९९१ – आसाममधून राज्यसभेचे सदस्य म्हणून निवडले गेले.
  • इ.स. १९९५ – दुसऱ्या वेळी राज्यसभा सदस्य
  • इ.स. १९९६ - दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये मानद प्राध्यापक
  • इ.स. १९९९ - दक्षिण दिल्लीमधून लोकसभा निवडणूक लढले पण त्यात हरले.
  • इ.स. २००१ – तिसऱ्या वेळी राज्यसभा सदस्य आणि विरोधी पक्ष नेता
  • इ.स. २००४ – भारताचे पंतप्रधान

या शिवाय त्यांनी आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि आशियायी विकास बँक यांच्या विकासांत महत्त्वाचे योगदान दिले आहे.[ संदर्भ हवा ]

मनमोहन सिंग यांच्यावर लिहिली गेलेली पुस्तके[संपादन]

  • The Accidental Prime Minister (मूळ लेखक : संजय बारू. याच नावाचा मराठी अनुवाद : लीना सोहोनी, , प्रकाशक मेहता पब्लिकेशन)
  • अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहनसिंग (अविनाश कोल्हे)
  • डॉ. मनमोहनसिंग - एक वादळी पर्व (लेखक : सुजय शास्त्री; ग्रंथाली प्रकाशन)[ संदर्भ हवा ]

चित्रपट[संपादन]

  • दि अॅक्सिडेन्टल प्राईम मिनिस्टर (हिंदी, दिग्दर्शक : विजय गुट्टे)[ संदर्भ हवा ] : या चित्रपटात अनुपम खेर मनमोहनसिंगांची भूमिका करत आहेत. ह्या सिनेमात काँग्रेसवर आणि गांधी घराण्यावर टीका केलेली असल्याने या सिनेमाच्या प्रदर्शनाला काँग्रेस पक्षाने विरोध केला आहे.

काँग्रेसचे युवा नेते सत्यजित तांबे यांनी या सिनेमाविरोधात कोर्टात जाण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे ११ जानेवारी २०१९ रोजी प्रदर्शित होणारा हा सिनेमा कोर्टाच्या कचाट्यात अडकण्याची चिन्हे आहेत.


मागील
अटलबिहारी वाजपेयी
भारतीय पंतप्रधान
मे २२, इ.स. २००४-मे २६, इ.स. २०१४
पुढील
नरेन्द्र मोदी
मागील
नटवर सिंग
भारतीय परराष्ट्रमंत्री
नोव्हेंबर ७, इ.स. २००५- ऑक्टोबर २४, इ.स. २००६
पुढील
प्रणव मुखर्जी
मागील
यशवंत सिन्हा
भारतीय अर्थमंत्री
इ.स. १९९१-इ.स. १९९६
पुढील
जसवंत सिंग
मागील
डॉ. आय.जी. पटेल
रिझर्व बँकेचे गव्हर्नर
जानेवारी १५, इ.स. १९८५-फेब्रुवारी ४, इ.स. १९८५
पुढील
अमिताव घोष