१८ सप्टेंबर
(सप्टेंबर १८ या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation
Jump to search
सप्टेंबर १८ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २६१ वा किंवा लीप वर्षात २६२ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी[संपादन]
सोळावे शतक[संपादन]
- १५०२ - क्रिस्टोफर कोलंबस आपल्या चौथ्या व शेवटच्या सफरीत कोस्टा रिकाला पोचला.
अठरावे शतक[संपादन]
- १७३९ - बेलग्रेडचा तह - बेलग्रेड ऑट्टोमन साम्राज्याच्या हवाली.
एकोणिसावे शतक[संपादन]
- १८५० - अमेरिकेच्या काँग्रेसने फ्युजिटिव्ह स्लेव्ह ऍक्ट हा कायदा लागू केला.
- १८८५ - माँत्रियालमध्ये कांजिण्याची लस घेणे सक्तीचे केल्याने लोकांनी दंगाधोपा सुरू केला.
विसावे शतक[संपादन]
- १९०६ - चक्रीवादळ व त्यानंतर आलेल्या त्सुनामीने हाँगकाँगमध्ये १०,००० बळी घेतले.
- १९१९ - नेदरलँड्समध्ये स्त्रीयांना मतदानाचा हक्क मिळाला.
- १९२२ - हंगेरीला लीग ऑफ नेशन्समध्ये प्रवेश.
- १९३४ - सोवियेत संघाला लीग ऑफ नेशन्समध्ये प्रवेश.
- १९३९ - दुसरे महायुद्ध - पोलंडचे सरकार पळून रोमेनियाला गेले.
- १९४३ - ज्यूंचे शिरकाण - सोबिबोरची कत्तल.
- १९३९ - दुसरे महायुद्ध - ब्रिटिश पाणबुडी एच.एम.एस. ट्रेडविंडने जपानच्या जुन्यो मारु हे जहाज बुडवले. ५,६०० मृत्युमुखी.
- १९४८ - मार्गारेट चेझ स्मिथ अमेरिकेची पहिली स्त्री सेनेटर झाली.
- १९६१ - संयुक्त राष्ट्रांचा सरचिटणीस दाग हॅमरशील्डचा विमान अपघातात मृत्यू.
- १९६२ - र्वांडा, बुरुंडी आणि जमैकाला संयुक्त राष्ट्रांमध्ये प्रवेश.
- १९७३ - पूर्व जर्मनी आणि पश्चिम जर्मनीला संयुक्त राष्ट्रांमध्ये प्रवेश.
- १९७४ - हरिकेन फिफि होन्डुरासच्या किनाऱ्यावर आले. ५,००० ठार.
- १९८१ - फ्रांसमध्ये मृत्युदंड बेकायदा.
- १९९० - लिश्टनस्टाइनला संयुक्त राष्ट्रांमध्ये प्रवेश.
- १९९७ - टेड टर्नरने संयुक्त राष्ट्रांना १ अब्ज अमेरिकन डॉलर दान केले.
- १९९८ - आयकानची स्थापना.
एकविसावे शतक[संपादन]
- २००१ - ट्रेंटन, न्यू जर्सी येथून कोणीतरी अँथ्रॅक्सचे विषाणू असलेली पत्रे पाठवण्यास सुरुवात केली.
- २००७ - पाकिस्तानच्या राष्ट्राध्यक्षपदी निवडून घेतल्यावर जनरल परवेझ मुशर्रफने लश्करप्रमुखपदाचा राजीनामा देण्याचे जाहीर केले.
जन्म[संपादन]
- ५३ - ट्राजान, रोमन सम्राट.
- १७०९ - सॅम्युएल जॉन्सन, इंग्लिश कवी, पत्रकार, समीक्षक.
- १७६५ - पोप ग्रेगरी सोळावा.
- १८७६ - जेम्स स्कलिन, ऑस्ट्रेलियाचा ९वा पंतप्रधान.
- १८९२ - सॅम स्टेपल्स, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १८९५ - जॉन डिफेनबेकर, कॅनडाचा १३वा पंतप्रधान.
- १९३७ - आल्फोन्सो रॉबर्ट्स, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
- १९२३ - ऍन, रोमेनियाची राणी.
- १९४० - ब्रेस मरे, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू.
- १९५८ - विन्स्टन डेव्हिस, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
- १९५८ - डेरेक प्रिंगल, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९७० - डॅरेन गॉफ, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९७१ - लान्स आर्मस्ट्रॉँग, अमेरिकन सायकल शर्यत विश्वविजेता.
मृत्यू[संपादन]
- ९६ - डॉमिशियन, रोमन सम्राट.
- ११८० - लुई सातवा, फ्रांसचा राजा.
- १७८३ - लेओनार्ड ऑयलर, स्विस गणितज्ञ.
- १८७० - चार्ल्स पंधरावा, स्वीडनचा राजा.
- १९७० - जिमी हेंड्रिक्स, अमेरिकन संगीतकार.
- १९९३ - असित सेन, विनोदी अभिनेते व दिग्दर्शक.
- १९९४ - व्हिटास जेरुलायटिस, अमेरिकन टेनिस खेळाडू.
- १९९५ - काका हाथरसी उर्फ प्रभुलाल गर्ग, हिंदी कवी.
- १९९९ - अरुण वासुदेव कर्नाटकी, चित्रपट दिग्दर्शक.
- २००२ - शिवाजी सावंत, मराठी साहित्यिक.
- २००४ - डॉ. भालचंद्र दिनकर फडके, मराठी समीक्षक, साहित्यिक.
प्रतिवार्षिक पालन[संपादन]
- वरिष्ठ नागरिक आदर दिन - जपान.
बाह्य दुवे[संपादन]
- बीबीसी न्यूजवर १८ सप्टेंबर च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
सप्टेंबर १६ - सप्टेंबर १७ - सप्टेंबर १८ - सप्टेंबर १९ - सप्टेंबर २० - सप्टेंबर महिना