Jump to content

लातूर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

लातूर शहर-विकिपीडिया

  ?लातूर
लट्टाटूर, रत्नापुर
महाराष्ट्र • भारत
—  शहर  —
जिल्हाधिकारी कार्यालय
जिल्हाधिकारी कार्यालय
जिल्हाधिकारी कार्यालय
Map

१८° २४′ ००″ N, ७६° ३५′ ००″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ
उंची
११७.७८ चौ. किमी (१६ (महाराष्ट्रात), १२० (भारतात))
• ५१५ मी
हवामान
तापमान
• उन्हाळा
• हिवाळा


• ४१ °C (१०६ °F)
• १३ °C (५५ °F)
जवळचे शहर रेणापुर आणि औसा
विभाग छत्रपती संभाजीनगर
जिल्हा लातूर
लोकसंख्या
घनता
शहर
लिंग गुणोत्तर
साक्षरता
३,८२,९४०भारतीय जनगणना २०११
• २९०/किमी
• १००
९२३.५४ /
७९.०३ %
भाषा मराठी
महापौर विक्रांत विक्रम गोजमगुंडे
आयुक्त अमन मित्तल
स्थापित १६/०८/१९८२
कोड
पिन कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• ४१३५१२
• +०२३८२
• महा २४ (MH 24)
संकेतस्थळ: शहर महानगपालिका लातूर लातूर आणि लातूर शहर

लातूर हे महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्याचे मुख्यालय आहे. २०११ च्या जनगणनेनुसार लातूर शहराची लोकसंख्या ३,८२,९४० इतकी आहे.

इतिहास

[संपादन]

लातूर शहराला राष्ट्रकुटांच्या काळापासूनचा इतिहास आहे. होते. लातूरचे पूर्वीचे नाव लत्तलूर असे होते. राष्ट्रकूटचा पहिला राजा दन्तिदुर्ग हा याच शहरात रहात असे. लातूरचे दुसरे नाव "रत्नापूर" असेही सांगितले जाते.शतकानुशतके सातवाहन,शक, चालुक्य,देवगिरीचे यादव, दिल्लीचे सुलतान , दक्षिण भारताच्या बहामनी शासक,आदिलशाही आणि मुघल मुघल यांच्याद्वारे शासन केले.

हैदराबाद संस्थान भारतात विलीन होईपर्यंत लातूर शहर हैदराबाद संस्थानाच्या अंमलाखाली होते.[] पुढे ते राज्यपुनर्रचनेनंतर मुम्बई राज्यात आणि १९६० मध्ये महाराष्ट्र राज्यात समाविष्ट करण्यात आले. त्याच्या नंतर १६ ऑगस्ट १९८२ साली जिल्हा म्हणून अस्तित्वात आला.

भुगोल

[संपादन]

लातूर समुद्र सपाटीपासुन ६३६ मिटर उंचीवर महाराष्ट्र कर्नाटक राज्य सिमेवर, बालाघाट पठारावर स्थित आहे.लातूरला मांजरा नदीतुन पिण्याचे पाणी मिळते, जिचे पर्यावरणीय विघटन व धुप २० व्या आणि २१ व्या शतकात झाले. त्यामुळे व जल व्यवस्थापन नियोजनाच्या अभावामुळे खूप वेळा दुष्काळ उद्भवला.

अ) तापमान:

लातूरचे तापमान १३°से ते ४१°से (५५ ते १०६°फॅ) दरम्यान असते, पैकी प्रवासासाठी ऑक्टोबर ते फेब्रुवारी हा हिवाळ्याचा काळ उत्तम आहे.आत्तापर्यंत नोन्दवलेले सर्वोच्च तापमान ४५.६°से होते. उत्तर भारतातिल पश्चिम व्यत्ययाच्या पुर्व प्रवाहासोबत थण्ड लाटांमुळे हिवाळ्यात काहीवेळेस क्षेत्र प्रभावित होते, जेव्हा न्युनतम तापमान २° ते ४°से (३६ ते ३९°फॅ) पर्यंत कमी होते.

आ) वर्षा:

जुन ते सप्टेम्बरच्या पावसाळ्यात बहुतांश पाऊस पडतो.पावसात ९ ते ६९३ मिलि प्रति महिना इतकी विविधता आहे. सरासरी वार्षिक पाऊस ७२५ म़ली (२८.५ इंच) पडतो.

इ) नदी, तळे व धरणे

तालुका गोदावरी नदीच्या खोऱ्यात येतो. नगरात बहुतांश पाणी मांजरा नदीतुन येते, जिने २० व २१ व्या शतकात प्रदुषणाचा सामना केला. रेणा, मनार, तावरजा, तिरु व घरणी या इतर प्रमुख नद्या आहेत. सिंचन व पिण्यासाठी या नद्यांवर धरणे बान्धली आहेत. देनरगण, घरणी, मसलगा, सोलवरील साकोळ, तावरजा व तिरु यांचा मोठ्या धरणांत समावेश होतो. मन्याड, लेण्डी व तिरु या उत्तर पठारावरील ३ प्रमुख नद्या आहेत.

लोकसंख्या

[संपादन]

बहुतांश रहिवासी मराठी बोलतात.

लातूर धार्मिक

धर्म टक्केवारी
हिंदू धर्म ७०%
इस्लाम धर्म २४%
बौद्ध धर्म ४.६%
ख्रिश्चन धर्म ०.२%
जैन धर्म ०.८%
इतर ०.४%

इतरमध्ये ०.२% शिख व ०.१% निधर्मींचा समावेश होतो.

लोकसंख्या वाढ

जनगणना लोकसंख्या वाढ/घट
१९३१ २९,००० -
१९७१ ६७,००० -
१९८१ १,०१,००० ५०.७%
१९९१ १,५९,२०० ५७.६%
२००१ २,९९,१७९ ८७.९%
२०११ ६,८३,६६७ ४६.७%

प्रशासन व राजकारण

[संपादन]

अ) स्थानिक प्रशासन

लातूरला पूर्वी नगर परिषद होती, जिची स्थापना १९५२ला झाली. लातूर महानगर पालिका ही स्थानिक नागरी संस्था आहे. ती ५ क्षेत्रात विभागली आहे. ११७.७८ चौरस किमी (४५.४८ चौरस मैल) इतके महानगर पालिका क्षेत्र आहे. २०११ मध्ये राज्य शासनाद्वारे ही महानगर पालिका स्थापली गेली. महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाने ३०/१०/२००६ च्या पत्रात अविकसित लातूर क्षेत्राला अधिसुचित करण्याची व सिडकोला विशेष नियोजन प्राधिकरण म्हणुन नियुक्त करण्याची इच्छा व्यक्त केली. १६,६९६ हेक्टर नगर क्षेत्रासहित २६,५४१ हेक्टर अविकसित क्षेत्रास अधिसुचित करण्याचा प्रस्ताव सिडकोने पाठवला आहे. अधिसुचित क्षेत्रात ४० गावांचा समावेश आहे. प्रकल्पात स्थापत्य विकास व प्रगती कार्यासाठी १००% भुमी हस्तगत न करण्याचे पण न्युनतम भुमी हस्तगत पद्धत स्विकारण्याचे नियोजन आहे. महानगर ७० निर्वाचन क्षेत्रात विभाजित आहे ज्यांना प्रभाग म्हणतात व प्रत्येक प्रभागातिल जनतेद्वारे निर्वाचित नगरसेवक प्रभागाचे प्रतिनिधित्व करतात. महानगर पालिका पिण्याचे पाणी, स्वच्छता, मार्ग, पथदिवे, आरोग्य, प्राथमिक शिक्षण इत्यादी मुलभुत सुविधांसाठी उत्तरदायी आहे. नागरिकांवर लावलेल्या नगर करातुन महानगर पालिका महसुल मिळवते. प्रशासनाचे विविध विभागांतिल इतर अधिकाऱ्यांद्वारे सहाय्यित भारतीय प्रशासन सेवेतिल मुख्य कार्यकारी अधिकारी नेतृत्व करतो.

आ) राज्य व केन्द्र प्रशासन

लातूर लोकसभा क्षेत्रात व शहर आणि ग्रामिण या २ विधानसभा क्षेत्राअन्तर्गत येतो.

इ) प्रसिद्ध राजकारणी

केशवराव सोनवणे लातूर क्षेत्रातील पहिले मन्त्री होते, जे मुख्यमन्त्री यशवन्तराव चव्हाण मन्त्रीमण्डळात व नन्तर वसन्तराव नाईक मन्त्रीमण्डळात १९६२ ते १९६७ दरम्यान सहकार मन्त्री होते. लातूर दिलीपराव देशमुख यांचे जन्मस्थान आहे. विलासराव देशमुख यांचा जन्म बाभळगाव, लातूरला झाला होता. त्यांनी २ वेळेस महाराष्ट्र राज्याचा मुख्यमन्त्री व केन्द्रिय मन्त्री म्हणुन सेवा केली. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहाशी सम्बन्धित घटनेची तपासणी करत असलेले केन्द्रिय तपास आयोगाचे न्यायाधिश ब्रिजगोपाल हरकृष्ण लोया यांची १ डिसेंबर २०१४ रोजी झालेली हत्या राष्ट्रीय राजकारणात वादाचा विषय आहे व ज्याचे प्रेतदहन गातेगावला झाले. विक्रान्त विक्रम गोजमगुण्डे २०१९ला महापौर झाले.

प्रसारमाध्यमे

[संपादन]
 इथे भरपूर प्रमाणात प्रसारमाध्यमे उपलब्ध आहेत.या शहरात सर्वांच्या घरी टीव्ही संच,मोबाईल आणि दूरध्वनी उपलब्ध आहे. येथे दररोजच्या - दररोज वृत्तपत्रे मिळतात.या शहरात सर्व प्रकारच्या प्रसार माध्यमाचे आधुनिकीकरण झालेले आहे. हे शहर आधुनिक जगाशी आंतरजालाने जोडलेले आहे. येथे इलेक्ट्रॉनिक मीडियाचे वर्चस्व गाजत आहे.

स्थानिक वृत्तपत्रे

[संपादन]

धर्म टक्केवारी

[संपादन]
लातूर मधील धर्मांची टक्केवारी
धर्म Percent
हिंदू
  
70%
इस्लाम
  
24%
बुद्ध
  
4.6%
ख्रिश्चन
  
0.2%
जैन
  
0.8%
इत्यादी†
  
0.4%
धर्माचे वितरण
Includes शीख (०.२), इतर धर्म (<0.1%).

भूगोल आणि हवामान

[संपादन]
माहिती हवामान तक्ता - लातूर
जाफेमामेजुजुनोडी
 
 
2.8
 
29
12
 
 
2.1
 
32
14
 
 
3.3
 
36
19
 
 
3.5
 
38
22
 
 
24.4
 
38
25
 
 
114.2
 
34
24
 
 
115.6
 
30
22
 
 
119.6
 
29
21
 
 
121.6
 
30
21
 
 
60.8
 
32
19
 
 
10.7
 
30
15
 
 
6.5
 
28
12
तापमान °C मध्ये पाउस मात्रा mm मध्ये
इंपेरीयल कंव्हर्जन
जाफेमामेजुजुनोडी
 
 
0.1
 
84
54
 
 
0.1
 
90
57
 
 
0.1
 
97
66
 
 
0.1
 
100
72
 
 
1
 
100
77
 
 
4.5
 
93
75
 
 
4.6
 
86
72
 
 
4.7
 
84
70
 
 
4.8
 
86
70
 
 
2.4
 
90
66
 
 
0.4
 
86
59
 
 
0.3
 
82
54
तापमान °F मध्येपाउस मात्रा इंचेस मध्ये

पर्यटन

[संपादन]

धार्मिक

  • सिद्धेश्वर रत्नेश्र्वर मंदिर लातूर

मुख्य नगरापासुन २ किमी अन्तरावर स्थित आहे. हे सम्राट 'ताम्रध्वजा'द्वारे निर्मित व सोलापूरच्या सिद्धरामेश्वर स्वामीला समर्पित आहे, जे की लातूरचे ग्रामदैवत आहे. दरवर्षी इथे १५ दिवसांची जत्रा असते.

  • अष्टविनायक मंदिर, लातूर

हे शिव नगरमध्ये स्थित आहे. १९८९ मध्ये निर्मित हे नवीन मन्दिर त्याच्या सौन्दर्यासाठी प्रसिद्ध आहे, कारण तिथे देवालयाच्या दोन्ही बाजुस उद्यान आहे, तसेच समोर काही कृत्रिम फवारे आहेत. उद्यानात ८ ते ९ फुट उंचीची शिव मुर्ती स्थित आहे.

गोलाई तालुक्याच्या केन्द्रात आहे. नगर रचनाकार फैजुद्दीनने गोलाई चौकाची रचना केली. १९१७ला निर्मित मोठी २ मजली रचना ही गोलाईची मुख्य वास्तु आहे. वर्तुळाकार रचनेच्या केन्द्रात अम्बा देवीचे मन्दिर आहे. या गोलाईस जोडणारे १९ मार्ग आहेत व या मार्गांच्या बाजुस सर्व प्रकारच्या पारम्पारिक स्थानिक दागिने, पादत्राणे ‌व मिरची ते गुळापर्यंत अन्नपदार्थांची मण्डई आहे. अशाप्रकारे, गोलाई तालुक्याचे मुख्य वाणिज्य व व्यापार केन्द्र बनले आहे.

  • विराट हनुमान मंदिर, लातूर

हे परिवार गृह संस्था, औसा मार्ग, लातूर इथे स्थित आहे. देवालयाची रचना इतरांपेक्षा बरीच वेगळी आहे. उत्तम उद्यानाने मन्दिर आच्छादित आहे. मुर्ती २८ फुट उंच व सेंदुरी रंगाची आहे.

  • बुद्ध उद्यान मंदिरात विशाल बुद्ध मुर्ती आहे.


  • सुरत शहावली दर्गा राम गल्ली, पटेल चौकात स्थित आहे, जे की लातूरचा भाग आहे. हा दर्गा १९३९ला मुस्लिम सन्त सैफ उल्लाह शाह सरदारींच्या स्मरणार्थ बान्धला गेला, ज्यांनी इथे समाधी घेतली. इथे जून जुलैमध्ये ५ दिवसांची जत्रा दरवर्षी असते.
  • कालिकादेवी मन्दिर
  • केशवराज मन्दिर
  • गजानन महाराज मन्दिर


  • साई मन्दिर, विशाल नगर


  • स्वामी समर्थ मन्दिर, समर्थ नगर


  • जगदंम्बा माता मन्दिर गंजगोलाई
  • औसा तालुक्यात प्रसिद्ध बालाजी देवस्थान,मल्लिनाथ महाराजांचा मठ ,गोपाळपूर येथील मंदिर,मुक्तेश्वर देवस्थान,भुईकोट किल्ला इ. साठी प्रसिद्ध आहे.

संस्कृती

[संपादन]

लातूर मधील ऐतिहासिक स्थळ आणि एक महत्त्वपूर्ण बाजारपेठ असलेली गंजगोलाई महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे. येथे प्रामुख्याने हिंदू आणि मुस्लिम धर्मियांची संस्कृती अस्तित्वात आहे. येथे राष्ट्र कुटांची संस्कृती त्या काळात प्रसिद्ध होती. या शहराला प्राचीन संस्कृतीचा इतिहास लाभला आहे.

देउळे

[संपादन]

सिद्धेश्वर रत्नेश्वर मंदिर, लातूर हे लातूर पासून २ किमी अंतरावर आहे, सिद्धेश्वर रत्नेश्वर मंदिर हे लातूरचे ग्रामदैवत आहे, हे मंदिर पुराणकाळात राजा ताम्रध्वज यांनी बांधले आहे असे सांगितले जाते.

शिक्षण व संशोधन

[संपादन]

दयानंद कला महाविद्यालय हे लातूरमधील कलाशाखेचे स्वतंत्र महाविद्यालय आहे. या महाविद्यालयास नॅकच्यावतीने २०१४ अ दर्जा मिळालेला आहे.[]


अ) 'लातूर आकृतीबन्ध '

लातूर आकृतिबन्ध हे विशेष प्रशिक्षण व सातत्यपूर्ण शिकवणीचे मिश्रण आहे. विद्यार्थी परिक्षेच्या तयारीसाठी प्रश्नपत्रिका श्रृंखला सोडवतात व शिकवणी सत्रास उपस्थित राहतात. लातूर आकृतिबन्ध ही परिक्षेत अपेक्षित प्रश्नांची उत्तरे पुरवण्यात विद्यार्थ्यांना सहायता करण्यासाठी बनवलेली सातत्यपूर्ण अभ्यासाची यान्त्रिक पद्धत आहे. भारताच्या महाराष्ट्र राज्यातील माध्यमिक, उच्च माध्यमिक व विद्यापिठ शिक्षणासाठी ती प्रमाण बनली. प्रमाणित सामाईक प्रवेश परिक्षेतील महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांच्या यशामुळे राज्याच्या इतर भागांत हे शैक्षणिक तन्त्र स्विकारले जात आहे. भारताच्या अनेक शिक्षण तज्ञांनी या पद्धतीवर टिका केली आहे, जे यास तात्पुरता नफा मिळवण्याचे साधन मानतात, जे त्यांना प्रगत शिकण्यासाठी तयार करत नाही.

लातूर माध्यमिक, उच्च माध्यमिक व विद्यापिठ शिक्षणासाठी केन्द्र म्हणुन विकसित झाले आहे. सातत्यपूर्ण प्रशिक्षणाचा समावेश असलेल्या लातूर आकृतिबन्धासाठी महाराष्ट्रात विख्यात आहे. कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा अभियान्त्रिकी व वैद्यकिय प्रवेश परिक्षेत चांगले प्रदर्शन आहे.

आ) मुलभुत, प्राथमिक, माध्यमिक व उच्च शिक्षण

इथे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाद्वारे संचालित संलग्न १२१ प्राथमिक शाळा व ४६ खासगी शाळा आहेत. या शाळांमध्ये शिकवण्याचे प्राथमिक माध्यम बहुतांशी मराठी आहे. तरी अनेक शाळांमध्ये इंग्रजी व अर्ध इंग्रजी माध्यमसुद्धा दिसतात. लातूर त्याच्या आकृतिबन्धासाठी प्रसिद्ध आहे, ज्याने म.रा.मा.उ.मा.शि.म.च्या परिक्षेत अनेक वर्षांपासुन गुणवन्त दिले आहेत. जिल्हा परिषद व महानगर पालिकेद्वारे सार्वजनिक विद्यालय चालवले जातात व ते म.रा.मा.उ.मा.शि.म. शी संलग्न आहेत.व्यक्ती व शिक्षण संस्थेद्वारे खासगी शाळा संचालित होतात. ते राज्य मण्डळ किंवा राष्ट्रीय शिक्षण मण्डळ जसे की के.मा.शि.म. किंवा भारतीय माध्यमिक शिक्षण परिषदेशी संलग्न असतात. महात्मा बस्वेश्वेर द्वारे संचालीत देशिकेन्द्र विद्यालय प्रथम क्रमांकावर आहे इंग्रजी माध्यमातील शाळांमध्ये श्री बंकटलाल लाहोटी इंग्लिश स्कूल (CBSE) ही सर्वात जुन्या शाळांपैकी एक आहे.

इ) विद्यापिठ शिक्षण

मागील काही वर्षांपासुन, लातूर उच्च शिक्षणाचे केन्द्र म्हणुन उदयास आले आहे. पदवी व पदव्युत्तर शिक्षण देणाऱ्या अनेक संस्था इथे आहेत. बहुतांश प्रस्थापित व्या‌वसायिक पदवी महाविद्यालय लातूर नगरात स्थित आहेत, अलिकडे उपनगरीय क्षेत्रातही बरेच उभारले आहेत. उज्वल निकालाने मानांकित असल्याने, राज्याच्या विविध भागांतुन अनेक विद्यार्थ्यांना लातूर आकर्षित करते. महाविद्यालयांमुळे मराठवाड्यात शिक्षण केन्द्र म्हणुन प्रख्यात आहे. बरेच विद्यार्थी शेजारील जिल्ह्यांतील आहेत. बहुतांश महाविद्यालय स्वा.रा.ति.म. विद्यापिठ नान्देडशी संलग्न आहेत. १९८३ला स्थापलेले बिडवे महाविद्यालय मराठवाड्यातील सर्वात जुन्या महाविद्यालयांपैकी एक आहे. १९८८ला समाजसेवक विश्वनाथ कराड यांनी 'महाराष्ट्र वैद्यकिय विज्ञान व संशोधन संस्था लातूर'ची स्थापना केली. २००८ मध्ये आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण संस्थेची स्थापना झाली.

ई) व्यावसायिक शिक्षण

लातूर हे भारतीय सनदी लेखापाल संस्थेच्या पश्चिम भारत क्षेत्रिय परिषदेचे माहिती तन्त्रज्ञान प्रशिक्षण प्रयोगशाळा, अभ्यासिका व ग्रन्थालयासहित परिक्षा केन्द्र आहे.

तालुक्यातिल शिक्षण संस्था

१) स्वा.रा.ति.म. विद्यापिठ उपकेन्द्र, पेेठ, लातूर

२) राजर्षी शाहू महाविद्यालय, लातूर

३) दयानंद महाविद्यालय, लातूर

४) महात्मा बस्वेश्वर महाविद्यालय, लातूर

५) कै.व्यंकटराव देशमुख महाविद्यालय, बाभलगांव,लातूर

६) त्रिपुर महाविद्यालय, लातूर

७) काॅक्सिट महाविद्यालय, लातूर

८) सुशिलादेवी देशमुख महाविद्यालय, लातूर

९) राजमाता जिजामाता महाविद्यालय, लातूर

१०) जयक्रांती महाविद्यालय,लातूर

11) कमला नेहरू कनिष्ठ महाविद्यालय लातूर

वैद्यकिय

१) विलासराव देशमुख शासकिय महाविद्यालय, लातूर

२) मांजरा आयुर्वेदिक महाविद्यालय, लातूर

३) वसन्तराव काळे होमिओपॅथी महाविद्यालय, लातूर

४) यशवन्तराव चव्हाण महाविद्यालय, लातूर

५) शासकिय रुग्णसेवक महाविद्यालय, बाभळगाव, लातूर

अभियान्त्रिकी

१) एम.एस. बिडवे महाविद्यालय, वसवाडी, लातूर

कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स, लातूर हे लातूर शहरातील एक महाविद्यालय असून येथे बायोटेक्नॉलॉजी आणि संगणक शास्त्रातील पदवी चा अभ्यासक्रम शिकवला जातो. हे महाविद्यालय अंबाजोगाई रोडला आहे.


तन्त्रनिकेतन

१) पुरणमल लाहोटी शासकिय तन्त्रनिकेतन, लातूर

२) वि.दे.फा. तन्त्रनिकेतन, लातूर

३) सन्दिपानी तन्त्रनिकेतन, कोळपा, लातूर

४) विवेकानन्द तन्त्रनिकेतन, लातूर

५) मुक्तेश्वर तन्त्रनिकेतन, बाभळगाव, लातूर

शाळा

अ) महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ

१) सरस्वती विद्यालय, लातूर

२) देशिकेन्द्र विद्यालय, लातूर

३) केशवराज विद्यालय, लातूर

४) शिवाजी विद्यालय, लातूर

५) यशवन्त विद्यालय, लातूर

६) राजस्थान विद्यालय, लातूर

७) बस्वनप्पा वाले विद्यालय, लातूर

८) श्रीमानयोगी विद्यालय, लातूर

९) लाल बहादुर शास्त्री विद्यालय, लातूर

१०) कृपासदन विद्यालय, लातूर

ब) केन्द्रिय माध्यमिक शिक्षण मण्डळ

१) सन्त तुकाराम, लातूर

२)श्री बंकटलाल लाहोटी इंग्लिश स्कूल लातूर ३) पोदार, लातूर

व्यापार व उद्योग

[संपादन]

पतसंस्था

लातूर शहरात अनेक राष्ट्रीय, खाजगी तसेच सहकारी बँका आहेत. त्यातील काही प्रमुख बँका

  • स्टेट बँक ऑफ हैद्राबाद
  • स्टेट बँक ऑफ इण्डिया
  • बँक ऑफ महाराष्ट्र
  • लातूर शहरी बँक
  • लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक
  • ॲक्सिस बँक

हैद्राबादच्या निजाम काळात लातूर प्रमुख व्यापार केन्द्र बनले. ही कृषी आधारित अर्थव्यवस्था व औद्योगिक केन्द्रसुद्धा आहे. लातूर मराठवाड्याचे उदयोन्मुख केन्द्र बनले आहे. लातूर पूर्ण भारतात कडधान्य व विशेषतः तुर दाळीसाठी प्रसिद्ध आहे. लातूर हे उडद, मुग, हरबरा व तुरसाठी प्रमुख व्यापार केन्द्र आहे. इथे मांजरा व विकास हे साखर कारखाने आहेत. तसेच हे तेलबिया मुख्यतः सुर्यफुल व सोयाबिन, करडई, कुलुप, ब्रास, दुध चुर्ण व सुत व्यापारासाठी प्रसिद्ध आहे. तालुका ऊस, तेलबिया, सोयाबिन, द्राक्ष व आम्बा यांचे प्रमुख उत्पादन केन्द्र आहे. स्थानिक आम्ब्यांसह आम्ब्याची प्रजात केशर आम्बा म्हणुन विकसित झालेली आहे. तेलबिया लातूर भागाचे प्रमुख उत्पादन आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी केशवराव सोनवणेंनी डालडा कारखाना स्थापन केला जो सहकारी तत्त्वावर स्थापलेला आशियातील पहिला कारखाना आहे.

१९९० पर्यंत लातूर तालुका औद्योगिक मागास राहिले. १९६० मध्ये मराठवाडा भाग महाराष्ट्रात समाविष्ट झाला. मागास क्षेत्रास पुढे नेत, मराठवाडा क्षेत्राची औद्योगिक प्रगती सुरू झाली. सहकार मन्त्री केशवराव सोनवणेंच्या कार्यकाळात लातूरला पहिले औद्योगिक क्षेत्र मिळाले. तेव्हाच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामण्डळाने भुमी हस्तगत करण्याची व औद्योगिक क्षेत्र स्थापन करून वाढवण्याची सुरुवात केली. शेती प्रक्रिया, खाद्य तेल, जैव तन्त्रज्ञान, टिकाऊ वस्तु, प्लास्टिक व ॲल्युमिनिअम प्रक्रियेतील अनेक कम्पन्यांचे निर्माण प्रकल्प लातूरात आहेत, पण बहुतांश हे लहान व मध्यम प्रमाणाचे आहेत.

भारताच्या सर्वात मोठे सोयाबिनचे व्यापार केन्द्र लातूर आहे. या नगरास महाराष्ट्राचा साखर पट्टा म्हटलं जाते. तालुक्यात २ साखर कारखाने आहेत, जे त्यास भारताच्या सर्वाधिक साखर उत्पादक तालुक्यांपैकी एक बनवतात. इथे तेलबिया, विक्रेय वस्तु व फळ मण्डईसुद्धा आहे.

लातूर उच्च दर्जाच्या द्राक्षासाठी विख्यात आहे व अनेक खासगी शित साठवण सुविधेची सोय करतो. अतिरिक्त औद्योगिक क्षेत्रात अत्यन्त नवे २ वर्ग किमीमध्ये ( ३०० एकर ) पसरलेले लातूर अन्न उद्यान निर्माणाधिन आहे. दक्षिण भारताकडील परिवहनासाठी लातूर हे प्रमुख केन्द्र आहे.

लातूर साखर पट्टा

लातूर भाग भारताचा साखर पट्टा म्हणुन प्रसिद्ध आहे. तालुक्यात २ साखर कारखाने आहेत. लातूरचे बहुतांश कारखाने सहकारी तत्त्वावर कार्य करतात. सहकारी राजकीय नेते केशवराव सोनवणेंमुळे लातूरला "भारताचा साखर पट्टा" ही पदवी मिळाली, जे लातूर, उस्मानाबाद व महाराष्ट्रात इतर ठिकाणी अनेक सहकारी संस्था स्थापण्यात अग्रणी होते.

लातूरचे औद्योगिक क्षेत्र

१) लातूर औद्योगिक क्षेत्र अतिरिक्त भाग १

२) लातूर अतिरिक्त भाग २

३) लातूर सहकारी औद्योगिक क्षेत्र


४) उदयगिरी सहकारी औद्योगिक क्षेत्र

लातूरातील विशेष औद्योगिक क्षेत्र व निर्यात क्षेत्र

१)लातूर अन्न उद्यान

२)लातूर माहिती तन्त्रज्ञान उद्यान

३)लातूर एकात्मिक कापड उद्यान

४)मुम्बई रेयॉन फॅशन लातूर

वाणिज्य व औद्योगिक संघटना

१)लातूर वाणिज्य संघटना

२)निर्माता संघटना लातूर

३)अभियन्ता व गृहशिल्पी संघटना लातूर

४)विकसक संघटना लातूर

५)संगणक व माध्यम संघटना लातूर

६)भारतीय सनदी लेखापाल संस्थेच्या पश्चिम भारत क्षेत्रिय परिषदेची शाखा

परिवहन

[संपादन]

अ) मार्ग

महाराष्ट्र व इतर राज्यांच्या विविध प्रमुख नगरांशी लातूर जोडलेले आहे. मार्ग जोडणी उत्तम आहे व मुम्बई, पुणे, नागपूर, नांदेड, सातारा, कोल्हापुर, सांगली व औरंगाबादशी जोडणारे मार्ग चार मार्गिका महामार्गात परीवर्तित होत आहेत. राष्ट्रीय महामार्ग ३६१ लातूरातुन जातो.

१)तुळजापुर-औसा-लातूर-अहमदपुर-नांदेड-यवतमाळ-वर्धा-नागपूर राष्ट्रीय महामार्ग ३६१

२) मण्ठा-देवगाव फाटा-शेलु-पाथरी-परळी वैद्यनाथ-अम्बाजोगाई-रेणापुर-लातूर ३६१

३)बार्शी-येडशी-ढोकी-मुरुड-लातूर-रेणापुर-नळेगाव-दिघोळ-उदगिर-देगलुर-अदमपुर-खतगाव-सग्रोळी-निजामाबाद-मेतपल्ली-मंचेरल-चिन्नुर-सिरोंच-विजापुर-जगदलपुर-कोटपद-बोरगम

४)नांदेड-कंधार-जळकोट-उदगिर-बिदर-लातूर-निटुर-निलंगा-औराद-जहिराबाद

आ) अन्तर्नगरीय

मुख्यालयाचे वाहन मार्ग ९६% गावांना जोडतात. प्रथम रेल्वे व नन्तर विविध शासन विभागासह, हैद्राबाद राज्याद्वारे १९३२ला प्रवासी परिवहन सेवांच्या राष्ट्रीयीकरणाची योजना सुरू झाली, जी सार्वजनिक मार्ग परिवहन क्षेत्रातील अग्रणी होती. भारतीय राज्यांच्या पुनर्रचनेनन्तर व १ जुलै १९६१ला मराठवाडा राज्य परिवहनाचा व मुम्बई राज्य परिवहन महामण्डळाचा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामण्डळात विलय झाला. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामण्डळ व इतर काही खासगी संचालक राज्याच्या सर्व भागात व गावांना वाहन सेवा पुरवतात. महाराष्ट्र व इतर राज्यांच्या सर्व प्रमुख नगरांना जोडणारे प्रस्थापित जाळे खासगी वाहनांकडे आहे.

इ) स्थानिक

"लातूर महानगरीय परिवहन" ही खासगी वाहन सेवा आहे, जी नगराच्या सर्व भागांना व दुरवरील औद्योगिक उपनगरांना जोडते. लातूर महानगरीय परि‌वहन स्थानिक वाहने दुर्गम भागांसह नगरात धावतात व नगराचे विविध भाग व उपनगरांना जोडतात.

ई) वायु

तालुक्याच्या वायव्येस १२ किमी अन्तरावर, चिंचोली राववाडीमध्ये,लातूरात विमानतळ आहे. विमान इन्धन, दिशादर्शनासह रात्रीचे अवतरण, वाहनतळ, विमानतळ अग्निशामक व संरक्षक सेवांचा विमानतळ सुविधेत समावेश होतो. उत्तम सुविधांनी युक्त इमारतीत अति महत्त्वाचे व्यक्ती कक्ष, प्रस्थान व आगमन कक्ष, निवासी कक्ष, प्रतिक्षा क्षेत्र व उपहारगृह आहे. सार्वजनिक कार्य विभागाद्वारे १९९१ला ‌विमानतळ निर्मित झाले व पुन्हा म.औ.वि.म.ला हस्तान्तरित झाले. ₹ १४ कोटी खर्चुन त्याची सुधारणा केली व रिलायंस विमानतळ विकसकाकडुन ९९ वर्ष कन्त्राटावर चालवले जात आहे. विमानतळाहुन सध्या नियोजित वायु सेवा नाही, पण महिन्यात १४ ते १६ विमान उड्डाणे दिसतात.

उ) रेल्वे

भारतीय भुभाग रेल्वेच्या दक्षिण पश्चिम भागावरील लातूरपासुन मिरजपर्यंत वायव्येस लातूर मिरज रेल्वे ३९१ मैल (६२९ किमी) धावते व १९२९ ते १९३१ला बान्धलेले आहे. लातूरातील सर्व रेल्वे या रुन्द आहेत. या मध्य रेल्वेत येतात. जेव्हा बार्शी मार्गाचे अरुन्दपासुन रुन्दमध्ये रूपान्तर झाले, तेव्हा लातूर स्थानक पुन्हा बान्धले गेले. सप्टेम्बर २००७ मध्ये लातूर ते उस्मानाबाद व ऑक्टोबर २००८ मध्ये उस्मानाबाद ते कुर्डुवाडीत मार्गाचे रूपान्तर झाले. लातूर आता कुर्डुवाडी मार्गी रेल्वेने थेट जोडलेला आहे. उस्मानाबादात सुरू झालेल्या रेल्वेद्वारे हे हैद्राबादशी जोडलेले आहे. ऑक्टोबर २००८ मधिल कुर्डुवाडी मार्गावरील रेल्वेच्या आगमनाने, लातूर, लातूर मार्ग, परभणी व औरंगाबादचे पुर्वीचे वाहन स्थगित झाले. तालुक्यात ७५ किमी लाम्बीचा रेल्वे मार्ग आहे. लातूर कुर्डुवाडी मिरज हा अरुन्द मार्ग होता. २००२ मध्ये कुर्डुवाडी पण्ढरपुर भाग रुन्द झाला. सप्टेम्बर २००७ मध्ये लातूर उस्मानाबाद भागाचे रुन्दिकरण झाले. (उस्मानाबाद अरुन्द मार्गावर नव्हते व नवीन रुन्द मार्ग उस्मानाबादहुन जाण्यासाठी मार्ग बदलला. ऑक्टोबर २००८ मध्ये उस्मानाबाद कुर्डुवाडी भाग वापरायोग्य बनला.) पण्ढरपुर मिरज भागसुद्धा पूर्वी अरुन्द होता व प्राथमिकतेने रुन्दिकरण चालु आहे. हा महत्त्वाचा मार्ग आहे. रेल्वेच्या सहाय्याने ते कोकण बाजारपेठ गाठतील व येथील अर्थव्यवस्था सुधरेल.

मध्य रेल्वे विभागाच्या सोलापूर मण्डलाच्या लातूर मिरज मार्गावर लातूर स्थानक (संकेताक्षर: एल यु आर) स्थित आहे. लातूर मार्गावरील विकाराबाद-लातूर मार्ग-परळी मार्गावर सुरू झालेली मनमाड-काचेगुड रुन्द रेल्वे मार्ग ही लातूरच्या वाहतुकीची प्रमुख धमणी आहे. हा औरंगाबाद व हैद्राबाद दरम्यान मध्यस्थीचे कार्य करतो. लातूर हे बंगळुर, मुम्बई, पुणे, नागपूर, मनमाड, औरंगाबाद, नांदेड, परभणी, परळी वैद्यनाथ, उस्मानाबाद, मुदखेड, आदिलाबाद, बासर, निजामाबाद, नाशिक व काचेगुड या नगरांशी जोडलेले आहे. शहरात लातूर, हरंगुळ व औसा मार्ग ही ३ स्थानके आहेत.

चतुःसिमा

पुर्व- चाकुर

पश्चिम-हरंगुळ गाव

उत्तर- रेणापुर

दक्षिण- औसा

सुविधा

[संपादन]

उद्याने

[संपादन]
  • विलासराव देशमुख उद्यान
  • बाबासाहेब आम्बेडकर उद्यान

प्रांगणे

[संपादन]
  • इदगाह प्रांगण, मुख्य मार्ग
  • जिल्हा क्रीडा संकुल, औसा मार्ग
  • नगर प्रांगण, महानगर पालिका

नाट्यगृहे

[संपादन]
  • दगडोजीराव देशमुख नाट्यगृह, गुळ मण्डई
  • दयानन्द नाट्यगृह, बार्शी मार्ग

हे सुद्धा पहा

[संपादन]

लातूर जिल्हा लातूर तालुका

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ "लातूर शहर". ३१ जुलै २०१४ रोजी पाहिले.
  2. ^ "About College - Dayanand College of Arts, Latur". daclatur.org (इंग्रजी भाषेत). 2018-03-17 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

[संपादन]