विकिपीडिया:दिनविशेष/ऑक्टोबर
- ३३१ - ग्वागामेलाची लढाई - अलेक्झांडर द ग्रेटने दरायस तिसऱ्याला हरवले.
- १८९१ - स्टॅनफोर्ड विद्यापीठाची स्थापना.
- १९५८ - नासाने आपले कार्य सुरू केले. (मुख्यालय चित्रित)
जन्म:
- १८८१ - विल्यम बोईंग, अमेरिकन विमानअभियंता.
- १८९६ - लियाकत अली खान, पाकिस्तानचा पहिला पंतप्रधान.
- १९१९ - ग.दि. माडगूळकर, मराठी कवी.
मृत्यू
- ९५९ - एड्वी, इंग्लंडचा राजा.
- १४०४ - पोप बॉनिफेस नववा.
- १९४२ - ॲंट्स पीप, एस्टोनियाचा पंतप्रधान.
मागील दिनविशेष: सप्टेंबर ३० - सप्टेंबर २९ - सप्टेंबर २८
- १९२५ - जॉन लोगी बेअर्डने (चित्रित) पहिल्या दूरदर्शन संचाचे प्रात्यक्षिक दाखवले.
- १९६७ - थर्गूड मार्शल अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाचा पहिला श्यामवर्णीय न्यायाधीश झाला.
जन्म:
- १८६९ - महात्मा गांधी.
- १९०४ - लाल बहादूर शास्त्री, भारतीय पंतप्रधान.
- १९७१ - कौशल इनामदार, भारतीय संगीतकार
मृत्यू
- १८०३ - सॅम्युएल ऍडम्स, अमेरिकन क्रांतिकारी.
- १९७५ - कुमारस्वामी कामराज, तमिळनाडूचे मुख्यमंत्री.
- २००६ - पॉल हॅलमॉस, अमेरिकन गणितज्ञ.
मागील दिनविशेष: ऑक्टोबर १ - सप्टेंबर ३० - सप्टेंबर २९
- १८६३ - अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकनने दरवर्षीच्या नोव्हेंबरमधील चौथा गुरुवार हा थॅंक्सगिविंग दिन म्हणून पाळण्याचा आदेश दिला.
- १९४२ - जर्मनीतील पीनेमुंडे येथील तळावरून सर्वप्रथम व्ही-२ ए-४ (प्रतिकृती चित्रित) क्षेपणास्त्राचे प्रक्षेपण झाले ज्याने ८४.५ कि.मी अंतर गाठले.
- १९९० - पूर्व जर्मनी व पश्चिम जर्मनीचे एकत्रीकरण.
जन्म
- १८६२ - जॉनी ब्रिग्स, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९७३ - नीव्ह कॅम्पबेल, केनेडीयन अभिनेत्री.
मृत्यू
- १५६८ - व्हाल्व्हाची एलिझाबेथ.
- १५९६ - फ्लोरें क्रेस्टियें, फ्रेंच लेखक.
- १९२९ - गुस्ताव स्ट्रेसमान, जर्मनीचा चान्सेलर.
मागील दिनविशेष: ऑक्टोबर २ - ऑक्टोबर १ - सप्टेंबर ३०
- १९२७ - गुत्झॉन बॉर्ग्लमने माउंट रशमोरचे (चित्रित) काम सुरू केले.
- १९४० - ब्रेनर पास येथे एडॉल्फ हिटलर व बेनितो मुसोलिनीची भेट.
- १९६५ - पोप पॉल सहावा अमेरिकेत पाउल ठेवणारा पहिला पोप ठरला.
जन्म
- १६२६ - रिचर्ड क्रॉमवेल, इंग्लंडचा शासक.
- १८२२ - रदरफोर्ड बी. हेस, अमेरिकेचा एकोणिसावा राष्ट्राध्यक्ष.
- १९१४ - म. वा. धोंड, मराठी समीक्षक.
मृत्यू
- १९०४ - कार्ल बायर, ऑस्ट्रियन रसायनशास्त्रज्ञ
- १९२१ - केशवराव भोसले, मराठी गायक.
- १९४७ - मॅक्स प्लॅंक, जर्मन भौतिकशास्त्रज्ञ.
मागील दिनविशेष: ऑक्टोबर ३ - ऑक्टोबर २ - ऑक्टोबर १
- १८६४ - कोलकात्यावर आलेल्या चक्रीवादळात ६०,००० मृत्युमुखी.
- १९६२ - इयान फ्लेमिंग, यांच्या कादंबरीवर आधारित जेम्स बाँड चित्रपट मालिकेतील पहिला चित्रपट डॉ. नो ब्रिटनमध्ये प्रदर्शित झाला.
- १९०५ - राईट बंधूंच्या राइट फ्लायर III (चित्रित) ने ३९ मिनिटांत २४ मैलांचे नवीन विश्वविक्रमी उड्डाण केले.
जन्म
- १८२९ - चेस्टर ए. आर्थर, अमेरिकेचा २१वा राष्ट्राध्यक्ष.
- १८९० - किशोरीलाल घनश्यामलाल मशरुवाला, हिंदी पत्रकार, संपादक.
- १९७५ - केट विन्स्लेट, अमेरिकन अभिनेत्री.
मृत्यू
- १९९१ - रामनाथ गोएंका, भारतीय वृत्तपत्रसंचालक.
- २००१ - थॉमस वॉटरफील्ड, ब्रिटिश-भारतीय साहित्यिक.
- २०११ - स्टीव्ह जॉब्स, अमेरिकन उद्योगपती, ॲपल कम्प्युटर्सचे सहसंस्थापक
मागील दिनविशेष: ऑक्टोबर ४ - ऑक्टोबर ३ - ऑक्टोबर २
- १९०८ - ऑस्ट्रिया-हंगेरीच्या दुहेरी राजतंत्राने ओस्मानी साम्राज्यच्या ताब्यातील बॉस्निया आणि हर्झगोव्हेना बळकावले.
- १९८१ - इजिप्तच्या राष्ट्राध्यक्ष अन्वर अल सादातची (चित्रित) हत्या.
जन्म:
- १९१४ - थॉर हायरडाल, नॉर्वेजियन मानववंशशास्त्रज्ञ व शोधक.
- १९३० - हफेझ अल-असाद, सिरीयाचा राष्ट्राध्यक्ष.
मृत्यू:
- १६६१ - गुरू हर राय, सातवे शिख गुरू.
- १८९२ - आल्फ्रेड लॉर्ड टेनिसन, इंग्लिश कवी.
- १९७९ - दत्तो वामन पोतदार, मराठी इतिहाससंशोधक, लेखक.
मागील दिनविशेष: ऑक्टोबर ५ - ऑक्टोबर ४ - ऑक्टोबर ३
- १९३३ - पाच फ्रेंच एरलाइन्सच्या विलीनीकरणानंतर एर फ्रान्सचे उद्घाटन झाले.
- २००३ - विशेष निवडणुकांद्वारे कॅलिफोर्नियातील जनतेने राज्यपाल ग्रे डेव्हिसची हकालपट्टी केली व आर्नोल्ड श्वार्झनेगरला राज्यपालपदी नेमले.
- २००४ - कंबोडियाच्या राजा नोरोदोम सिहानूकने (चित्रित) राज्यत्याग केला.
जन्म:
- १८८५ - नील्स बोर, डॅनिश भौतिकशास्त्रज्ञ.
- १९०० - हाइनरिक हिमलर, नाझी अधिकारी.
- १९०७ - प्रागजी डोसा, गुजराती नाटककार, लेखक.
मृत्यू
- १७०८ - गुरू गोबिंद सिंघ, शीख गुरू.
- १७९२ - जॉर्ज मेसन, अमेरिकन मुत्सद्दी.
- १९१९ - आल्फ्रेड डीकिन, ऑस्ट्रेलियाचा दुसरा पंतप्रधान.
मागील दिनविशेष: ऑक्टोबर ६ - ऑक्टोबर ५ - ऑक्टोबर ४
- १८९५ - जपानच्या सैन्याने कोरियाच्या शेवटच्या सम्राज्ञी मिनचा (चित्रित) खून केला.
- १९३२ - भारतीय वायुसेनेची स्थापना.
- १९६७ - बोलिव्हियात शे ग्वेव्हाराला अटक.
जन्म
- १८५० - हेन्री लुई ले शॅटेलिये, फ्रेंच रसायनशास्त्रज्ञ.
- १८९१ - शंकर वासुदेव किर्लोस्कर, मराठी लेखक, संपादक, व्यंगचित्रकार.
- १९१८ - जेन्स क्रिस्चियन स्कू, डेन्मार्कचा रसायनशास्त्रज्ञ.
मृत्यू
- १९६७ - क्लेमेंट ऍटली, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान.
- १९९२ - विली ब्रॅंड्ट, नोबेल शांतता पुरस्कार विजेता जर्मनीचा चान्सेलर.
- २०११ - डेनिस रिची, C आज्ञावली परिभाषेचा जनक
मागील दिनविशेष: ऑक्टोबर ७ - ऑक्टोबर ६ - ऑक्टोबर ५
- १४४६ - कोरियामध्ये हांगुल वर्णमाला प्रकाशित झाली.
- १६०४ - केपलरचा अतिनवतारा (चित्रित) हा आकाशगंगेमध्ये पाहण्यात आला, जो सर्वात अलीकडील अतिनवतारा आहे.
- २००६ - उत्तर कोरियाने परमाणु बॉम्बची पहिली चाचणी घेतली.
जन्म
- १८७३ - चार्ल्स वॉल्ग्रीन, अमेरिकन उद्योगपती.
- १९४६ - तान्सु सिलर, तुर्कस्तानचा पंतप्रधान.
- १९७५ - महेन्द्र नागामूटू, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
मृत्यू
- १०४७ - पोप क्लेमेंट दुसरा.
- १९८७ - गुरू गोपीनाथ, भारतीय नर्तक.
- १९९५ - अलेक डग्लस-होम, फ्रांसचा पंतप्रधान.
मागील दिनविशेष: ऑक्टोबर ८ - ऑक्टोबर ७ - ऑक्टोबर ६
- १८७१ - अंदाजे ९ चौरस किमी क्षेत्र व्यापून दोन दिवस चालणारी शिकागोची आग आटोक्यात आली.
- १९१३ - पनामा कालव्यावर (नकाशा चित्रित) मोठे बांधकाम पूर्ण झाले.
- १९७० - युनायटेड किंग्डमपासून फिजीला स्वातंत्र्य मिळाले.
जन्म:
- १८३० - इसाबेला दुसरी, स्पेनची राणी.
- १९०२ - आर.के. नारायण, भारतीय लेखक
- १९५४ - रेखा, भारतीय चित्रपट अभिनेत्री
मृत्यू:
- ८२७ - पोप व्हॅलेन्टाइन
- १९६४ - गुरुदत्त, भारतीय अभिनेता, दिग्दर्शक, निर्माते
- २००० - सिरिमावो भंडारनायके, श्रीलंकेची पंतप्रधान.
मागील दिनविशेष: ऑक्टोबर ९ - ऑक्टोबर ८ - ऑक्टोबर ७
- १८५२ - ऑस्ट्रेलियातील सर्वात जुनी युनिव्हर्सिटी ऑफ सिडनी (चित्रित) चे उद्घाटन.
- १८९० - डॉटर्स ऑफ द अमेरिकन रिव्होल्यूशन संस्थेची वॉशिंग्टन डी.सी. येथे स्थापना
- १९६८ - नासाने अपोलो ७ हे अपोलो मोहीमेंतर्गत मानवाला अंतराळात नेणारे पहिले यान प्रक्षेपित केले.
जन्म:
- १९०२ - जयप्रकाश नारायण, भारतीय राजकारणी
- १९१६ - नानाजी देशमुख, भारतीय सामाजिक कार्यकर्ते
- १९४२ - अमिताभ बच्चन, भारतीय अभिनेता
मृत्यू:
- १३०३ - पोप बॉनिफेस आठवा
- १३४७ - लुई चौथा, पवित्र रोमन सम्राट
- १८८९ - जेम्स प्रेस्कॉट जूल, इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ
मागील दिनविशेष: ऑक्टोबर १० - ऑक्टोबर ९ - ऑक्टोबर ८
- १४९२ - ख्रिस्तोफर कोलंबस हा अमेरिकेजवळच्या बहामास द्वीपसमूहात पोचला.
- १९०१ - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष थियोडोर रुझवेल्टने राष्ट्राध्यक्षीय निवासस्थानाचे नाव "एक्झिक्यूटिव्ह मॅन्शन" बदलून व्हाईट हाऊस (चित्रित) केले.
- १९८४ - प्रोव्हिजनल आयरिश रिपब्लिकन आर्मी या दहशतवादी संघटनेने युनायटेड किंग्डमच्या पंतप्रधान मार्गारेट थॅचर व तिच्या मंत्रीमंडळावर बॉम्बहल्ला केला ज्यात थॅचर बचावली.
जन्म:
- १५३७ - एडवर्ड सहावा, इंग्लंड, ग्रेट ब्रिटनचा राजा
- १९३५ - शिवराज पाटील, भारतीय राजकारणी
- १९६८ - ह्यू जॅकमन, ऑस्ट्रेलियन अभिनेता
मृत्यू:
- ६३८ - पोप ऑनरियस पहिला
- ६४२ - पोप जॉन चौथा
- १९६७ - राम मनोहर लोहिया, भारतीय राजकारणी
मागील दिनविशेष: ऑक्टोबर ११ - ऑक्टोबर १० - ऑक्टोबर ९
- १९२३ - अंकारा (चित्रित) तुर्की देशाची राजधानी बनली.
- १९८३ - अमेरिटेक मोबाईल कम्युनिकेशन्स (आता एटीअँडटी) यांनी अमरिकेतील शिकागो शहरात मोबाईल नेटवर्क सुरु केले.
- २०१३ - दतिया, मध्य प्रदेश येथील रतनगढ माता मंदिरात चेंगराचेंगरी झाली ज्यात ११५ ठार आणि ११० हून अधिक जखमी झाले.
जन्म:
- १९११ - अशोक कुमार, भारतीय अभिनेता
- १९४८ - नुसरात फतेह आली खान, पाकिस्तानी गायक
मृत्यू:
- १९११ - भगिनी निवेदिता, आयरिश-भारतीय सामाजिक कार्यकर्ती
- १९३८ - इ. सी. सिगार, अमेरिकन व्यंगचित्रकार, पॉपाय कार्टून चा निर्माता
- १९८७ - किशोर कुमार, भारतीय गायक, अभिनेता, दिग्दर्शक
मागील दिनविशेष: ऑक्टोबर १२ - ऑक्टोबर ११ - ऑक्टोबर १०
- १८८४ - जॉर्ज ईस्टमनने छायाचित्र छापायच्या कागदाचा पेटंट घेतला.
- १९१२ - मिलवॉकी, विस्कॉन्सिनमध्ये निवडणूकीसाठी भाषण देणार्या थियोडोर रूझवेल्टवर खूनी हल्ला. गोळी लागून रक्तस्राव होत असतानाही रूझवेल्टने आपले भाषण पूर्ण केले.
- १९५६ - डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांचा आपल्या सुमारे ३,८०,००० अनुयायांसह दीक्षाभूमी, नागपूर येथे बौद्ध धर्मात प्रवेश (चित्रित). (धम्मचक्र प्रवर्तन दिन)
जन्म
- १६८७ - रॉबर्ट सिम्सन, स्कॉटिश गणितज्ञ.
- १९३१ - निखिल बॅनरजी, भारतीय शास्त्रीय संगीतकार.
- १९३९ - राल्फ लॉरेन, अमेरिकन फॅशन डिझायनर
मृत्यू
- १९६० - अब्राम इयॉफ, रशियन भौतिकशास्त्रज्ञ.
- १९७७ - बिंग क्रॉस्बी, अमेरिकन गायक व अभिनेता
- १९९९ - जुलियस न्यरेरे, टांझानियाचा राष्ट्राध्यक्ष.
मागील दिनविशेष: ऑक्टोबर १३ - ऑक्टोबर १२ - ऑक्टोबर ११
- १९३२ - टाटा एरलाइन्सच्या (नंतरचे एअर इंडिया) विमानाचे कराची-मुंबई-मद्रास असे पहिले उड्डाण झाले.
- १९३९ - न्यू यॉर्क म्युनिसिपल विमानतळाचे (नंतरचे लग्वार्डिया विमानतळ, चित्रित) उद्घाटन.
जन्म:
- १६०८ - टॉरिसेली, हवाभारमापकाचाचा इटालियन संशोधक.
- १९३१ - डॉ. ए.पी. जे. अब्दुल कलाम,भारताचे भूतपूर्व राष्ट्रपती
- १९५७ - मीरा नायर, भारतीय-अमेरिकन अभिनेत्री, दिग्दर्शक आणि निर्माती
मृत्यू:
- ८९८ - लॅम्बर्ट, पवित्र रोमन सम्राट
- १९१८ - साई बाबा (शिर्डी)
- १९६१ - सूर्यकांत त्रिपाठी निराला, हिंदी साहित्यिक
मागील दिनविशेष: ऑक्टोबर १४ - ऑक्टोबर १३ - ऑक्टोबर १२
- जागतिक बधिरीकरण दिन - जागतिक प्रतिवार्षिक दिनपालन
- १९०५ - लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी करण्याचा हुकुम सोडला
- १९२३ - वॉल्ट डिझ्नीने आपला भाऊ रॉय डिझ्नी बरोबर द वॉल्ट डिझ्नी कंपनीची स्थापना केली
- १९५१ - पाकिस्तानच्या पहिल्या पंतप्रधान लियाकत अली खानची (चित्रित) रावळपिंडी मध्ये हत्या.
जन्म
- १८५४ - ऑस्कर वाइल्ड, आयरिश लेखक
- १८९० - अनंत हरी गद्रे, मराठी समाजसुधारक
- १९४८ - हेमामालिनी, हिंदी चित्रपट अभिनेत्री
- १९५९ - अजय सरपोतदार, मराठी चित्रपटनिर्माते, दिग्दर्शक
मृत्यू:
मागील दिनविशेष: ऑक्टोबर १५ - ऑक्टोबर १४ - ऑक्टोबर १३
- १६६२ - इंग्लंडचा राजा चार्ल्स दुसऱ्याने आप्ल्या ताब्यातील डंकर्क शहर फ्रांसला विकले.
- १९३३ - अल्बर्ट आइनस्टाइन नाझी जर्मनीतून पळून अमेरिकेत आला.
- १९५६ - जगातील पहिले अणुउर्जा केंद्र एलिझाबेथ दुसरीने इंग्लंडच्या कुंब्रिया प्रांतातील सेलाफील्ड येथे सुरू केले (चित्रित).
जन्म:
- १८१७ - सर सय्यद अहमद खान, भारतीय शिक्षणतज्ञ आणि समाजसुधारक.
- १९७० - अनिल कुंबळे, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- १९७२ - एमिनेम, अमेरिकन रॅप गायक.
मृत्यू:
- १८८२ - दादोबा पांडुरंग तर्खडकर, इंग्रजी-मराठी व्याकरणकार आणि धर्मसुधारक.
- १८८७ - गुस्ताव कर्चॉफ, जर्मन भौतिकशास्त्रज्ञ.
- १९६७ - हेन्री पु यी, शेवटचा चिनी सम्राट.
मागील दिनविशेष: ऑक्टोबर १६ - ऑक्टोबर १५ - ऑक्टोबर १४
- १९०६ - महर्षी विठ्ठल रामजी शिंदे (चित्रित) यांनी अस्पृश्यते विरुद्ध मुंबईत डिप्रेस्ड क्लास मिशनची स्थापना केली
- १९२२ - ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन(बीबीसी)ची अधिकृतरीत्या स्थापना
- १९६७ - परग्रहाचे (शुक्र) वातावरण तपासणारे पहिले यान- रशियन अंतराळयान व्हेनेरा-४ बनले
जन्म
- १९५० - ओम पुरी, भारतीय अभिनेता
- १९५६ - मार्टिना नवरातिलोव्हा, अमेरिकन टेनिस खेळाडू
- १९८० - रितींदरसिंग सोधी, भारतीय क्रिकेट खेळाडू
मृत्यू
- १८७१ - चार्ल्स बॅबेज, इंग्लिश गणितज्ञ व संशोधक
- १९३१ - थॉमस अल्वा एडिसन, अमेरिकन संशोधक
- २००५ - वीरप्पन, भारतीय चंदनचोर व तस्कर
मागील दिनविशेष: ऑक्टोबर १७ - ऑक्टोबर १६ - ऑक्टोबर १५
- १२१६ - इंग्लंडच्या राजा जॉनच्या मृत्युपश्चात त्याचा नऊ वर्षांचा मुलगा हेन्री राजेपदी
- १७८१ - यॉर्कटाउन, व्हर्जिनिया येथे लॉर्ड कॉर्नवॉलिसच्या वतीने त्याची तलवार जॉर्ज वॉशिंग्टनच्या हवाली करून ब्रिटिश सैन्याने अमेरिकेसमोर शरणागती पत्करली (चित्रित)
- १८१३ - लीपझीगच्या लढाईत नेपोलियन बोनापार्टचा सडकून पराभव
जन्म:
- १८७१ - डॉ. वॉल्टर कॅनन, वैद्यकीय चिकित्सेसाठी क्ष किरणांचा सर्वप्रथम उपयोग करणारा
- १९०२ - दिवाकर कृष्ण तथा दिवाकर कृष्ण केळकर, मराठी कथाकार
- १९२० - पांडुरंगशास्त्री आठवले, स्वाध्याय परिवाराचे संस्थापक
मृत्यू:
- १९३७ - अर्नेस्ट रुदरफोर्ड, न्यू झीलंडमधील भौतिकशास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिकविजेते
- २००६ - श्रीविद्या, दाक्षिणात्य भारतीय अभिनेत्री
- २०११ - कक्कानादन, मल्याळम लेखल
मागील दिनविशेष: ऑक्टोबर १८ - ऑक्टोबर १७ - ऑक्टोबर १६
जन्म:
- १९६३ - नवज्योतसिंग सिद्धू - भारतीय क्रिकेट खेळाडू
- १९७८ - वीरेंद्र सेहवाग - भारतीय क्रिकेट खेळाडू
मृत्यू:
- १९७४ - मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर, गायक-नट
मागील दिनविशेष: ऑक्टोबर १९ - ऑक्टोबर १८ - ऑक्टोबर १७
- १९४३ - नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या नेतृत्वात आझाद हिंद सेनेचे (शिक्का चित्रित) प्रामुख्याने भारताचे पहिले स्वतंत्र सरकार स्थापन केले.
- १९५९ - अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष ड्वाइट डी. आयझेनहॉवरने वटहुकुम काढून वर्नर फोन ब्रॉन व त्याच्या सहकाऱ्यांना अमेरिकन सैन्याच्या आधिपत्याखालून काढून घेउन नासामध्ये काम करण्यास फर्मावले.
- १९८३ - निर्वात जागेतून १/२९,९७,९२,४५८ सेकंदात प्रकाशाने पार पाडलेल्या अंतर ही मीटरची व्याख्या ठरवली गेली.
जन्म:
- १८८७ - कृष्ण सिंग, बिहारचे पहिले मुख्यमंत्री
- १९२३ - सद्गुरु श्री वामनराव पै, जीवन विद्या मिशनचे संस्थापक
- १९३१ - शम्मी कपूर, अभिनेता
मृत्यू
- १८३५ - मुत्थुस्वामी दीक्षित, कवी आणि संगीतकार
- २०१२ - यश चोप्रा, चित्रपट निर्मिती व दिग्दर्शक
मागील दिनविशेष: ऑक्टोबर २० - ऑक्टोबर १९ - ऑक्टोबर १८
- १९५३ - लाओसला फ्रांसपासून स्वातंत्र्य
- १९६० - मालीला फ्रांसपासून स्वातंत्र्य
- २००८ - भारताच्या चांद्रयान १ या चंद्राभोवती प्रदक्षिणा घालणार्या उपग्रहाचे प्रक्षेपण (चित्रित)
जन्म
- १९०० - अशफाक उल्ला खान, भारतीय क्रांतीकारी
- १६८८ - नादिर शाह, पर्शियाचा सम्राट
- १९७८ - ओवैस शाह, इंग्लिश क्रिकेट खेळाडू
मृत्यू
- १९३३ - विठ्ठ्लभाई पटेल, हिंदुस्थानच्या केंद्रीय कायदेमंडळाचे पहिले भारतीय अध्यक्ष
- १९७८ - ना.सी. फडके, मराठी कादंबरीकार
मागील दिनविशेष: ऑक्टोबर २१ - ऑक्टोबर २० - ऑक्टोबर १९
जन्म:
मृत्यू:
ऑक्टोबर २२ - ऑक्टोबर २१ - ऑक्टोबर २०
ऑक्टोबर २४: झांबियाचा स्वातंत्र्यदिन (झेंडा चित्रित)
- १८५७ - शेफील्ड एफ.सी. या जगातील सर्वप्रथम फुटबॉल क्लबची स्थापना.
- १९१७ - ऑक्टोबर क्रांतीची सुरुवात.
- १९४५ - संयुक्त राष्ट्रांची स्थापना.
जन्म
- १९१४ - कॅप्टन लक्ष्मी, आझाद हिंद सेनेत राणी लक्ष्मीबाई रेजिमेंटच्या कर्नल
- १९२१ - आर.के. लक्ष्मण, भारतीय व्यंगचित्रकार
मृत्यू
- १९९१ - इस्मत चुगताई, उर्दू लेखिका
- २०१७ - गिरिजा देवी, हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत गायिका
मागील दिनविशेष: ऑक्टोबर २३ - ऑक्टोबर २२ - ऑक्टोबर २१
- २००१ - मायक्रोसॉफ्टने विन्डोज एक्स.पी. ही संगणकप्रणाली प्रकाशित केली.
- २००७ - एरबस ए-३८०चे प्रथम प्रवासी उड्डाण.
ऑक्टोबर २४ - ऑक्टोबर २३ - ऑक्टोबर २२
- १९३६ - हूव्हर धरण मधील पहीला जलविद्युत जनित्र कार्यरत झाला
- १९४७ - जम्मू आणि काश्मीर चे राजा हरी सिंग यांनी आपल्या राज्याची भारतीय गणराज्यात विलनीकरणास् मान्यता दिली
- २००१ - अमेरिकेने पॅट्रीयट ॲक्ट पारित केला
- २००० - कोट दि'आयव्होरमध्ये उठाव होउन सरकार गडगडले
जन्म:
- १९४७ - हिलरी क्लिंटन, अमेरिकन राजकारणी
- १९७० - रवीना टंडन, भारतीय अभिनेत्री
- १९७१ - रॉनी इरानी, इंग्लिश क्रिकेट खेळाडू
- १९८५ - असिन तोट्टुंकल, दक्षिण भारतीय अभिनेत्री
मृत्यू:
ऑक्टोबर २५ - ऑक्टोबर २४ - ऑक्टोबर २३
- १९९१ - तुर्कमेनिस्तानला रशियापासून स्वातंत्र्य.
ऑक्टोबर २६ - ऑक्टोबर २५ - ऑक्टोबर २४
ऑक्टोबर २८:
ठळक घटना आणि घडामोडी
- ३०६ - मॅक्झेन्टियस रोमन सम्राटपदी
- १८८६ - अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष ग्रोव्हर क्लीव्हलँडने स्टॅच्यू ऑफ लिबर्टी राष्ट्रार्पण केला
- १९४० - दुसरे महायुद्ध - इटलीने ग्रीसवर हल्ला केला
- स्लोव्हेकियाचा स्मृती दिन
- ग्रीसचा नकार दिन
जन्म
- १९५५ - बिल गेट्स, अमेरिकन उद्योगपती
- १९५६ - महमूद अहमदिनेजाद, इराणचा राष्ट्राध्यक्ष
- १९५८ - अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
- १९६३ - रॉब बेली, इंग्लिश क्रिकेट खेळाडू
- १९६७ - जुलिया रॉबर्ट्स, अमेरिकन अभिनेत्री
मृत्यू
ऑक्टोबर २७ - ऑक्टोबर २६ - ऑक्टोबर २५
ऑक्टोबर २९:
ठळक घटना आणि घडामोडी
- १९२२ - बेनितो मुसोलिनी इटलीच्या पंतप्रधानपदी
- १९२९ - ब्लॅक ट्युसडे - न्यू यॉर्क शेर बाजारातील रोख्यांचे भाव कोसळले. जागतिक महामंदीची ही नांदी मानली जाते
- १९५८ - महर्षी धोंडो केशव कर्वे यांना राष्ट्रपती डॉ. राजेन्द्र प्रसाद यांच्या हस्ते भारतरत्न पुरस्कार
- तुर्कस्तानचा प्रजासत्ताक दिन
जन्म
मृत्यू
- १९११ - जोसेफ पुलित्झर, वृत्तपत्र क्षेत्रात दिल्या जाणाऱ्या पुलित्झर पारितोषिकाचे प्रवर्तक
ऑक्टोबर २८ - ऑक्टोबर २७ - ऑक्टोबर २६
ठळक घटना आणि घडामोडी
- १९२२ - बेनितो मुसोलिनी इटलीच्या पंतप्रधानपदी
- १९२५ - जॉन लोगी बेर्डने दूरचित्रवाणी प्रसारण यंत्र तयार केले
जन्म
- १२१८ - चुक्यो, जपानी सम्राट
- १७३५ - जॉन ऍडम्स, अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष
- १९०९ - डॉ.होमी भाभा, भारतीय शास्त्रज्ञ
- १९४९ - प्रमोद महाजन, भारतीय जनतापक्षाचे नेते
- १९६० - डियेगो माराडोना, आर्जेन्टिनाचा फुटबॉल खेळाडू
- १९६२ - कोर्टनी वॉल्श, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू
मृत्यू
- १९२८ - लाला लजपतराय, भारतीय स्वातंत्र्यसेनानी
- १९७४ - बेगम अख्तर, गझल गायिका 'मलिका-ए गझल'
- २०११ - अरविंद मफतलाल, भारतीय उद्योजक
ऑक्टोबर २९ - ऑक्टोबर २८ - ऑक्टोबर २७
ठळक घटना व घडामोडी
- १८६४ - नेव्हाडा अमेरिकेचे ३६वे राज्य झाले
- १८७६ - भारतात आलेल्या महाभयानक चक्रीवादळात २,००,००० पेक्षा अधिक व्यक्ती ठार
- १८८० - बळवंत पांडुरंग किर्लोस्कर यांच्या संगीत शाकुंतलचा पुणे येथे पहिला प्रयोग
- १९४१ - माउंट रशमोर या स्मारकाचे बांधकाम पूर्ण
- १९८४ - भारतीय पंतप्रधान इंदिरा गांधी यांची त्यांच्याच अंगरक्षकांकडून हत्या
- १९९९ - कोणाचीही मदत न घेता एकट्याने शीडबोटीतून पृथ्वीप्रदक्षिणा करून ११ महिन्यांनी जेसी मार्टिन मेलबोर्नला परतला
जन्म
- १८७५ - सरदार वल्लभभाई पटेल, भारतीय स्वातंत्र्यसैनिक, उप-पंतप्रधान
- १८९५ - सी. के. नायडू, भारतीय क्रिकेट खेळाडू
मृत्यू
- १९७५ - सचिन देव बर्मन संगीतकार
- १९८४ - इंदिरा गांधी, भारतीय पंतप्रधान
ऑक्टोबर ३० - ऑक्टोबर २९ - ऑक्टोबर २८