व्हेनिस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

व्हेनिस हे इटलीतील एक प्रमुख शहर आहे. या शहराचा जगातील प्राचीन शहरांमध्ये समावेश होतो. या शहराचे वैशिष्ट्य म्हणजे हे शहर पूर्णपणे समुद्रावर उभे आहे. या शहरात रस्त्यांच्या ऐवजी कालवे आहेत व rand Canal येथील दळणवळण बोटींमधून चालते. कमीत कमी १६०० वर्षांचा इतिहास या शहराला आहे. ४थ्या शतकात अटिला या हूण आक्रमकांपासून वाचण्यासाठी उत्तर इटली मधील नागरिकांनी पलायन केले व आज माहिती असलेल्या व्हेनिस या शहराच्या जागेत येउन वसले व पाहाता पाहाता युरोपमधील एक प्रबळ लोकशाही राज्य बनले. या व्हेनिसच्या राज्याने व्यापार व नौदलाच्या जोरावर युरोपात मोठा दबदबा निर्माण केला होता. आज व्हेनिस हे इटली या देशाचा भाग आहे व कोणत्याही प्रकारचा व्यापारी व नौदलीय धाक राहिलेला नाही परंतु या शहराने जगाला अमूल्य असा वास्तूशास्त्र, कला, साहित्य यांचा ठेवा दिला आहे. व्हेनिस हे पॅरिस खालोखाल जगातील सर्वाधिक भेट देणारे पर्यटनस्थळ आहे.

शहर[संपादन]

वाहतूक[संपादन]

विमानतळ[संपादन]

व्हेनिस मार्को पोलो विमानतळ येथील मुख्य विमानतळ आहे तर व्हेनिस त्रेव्हिसो विमानतळ हा लहान विमानतळ मुख्यत्वे किफायती विमानकंपन्या वापरतात. दोन्ही विमानतळांवरून आंतरराष्ट्रीय उड्डाणे होतात.

इतिहास[संपादन]

प्रमुख वास्तू[संपादन]

बाह्य दुवे यांची माहिती[संपादन]

संदर्भ व नोंदी[संपादन]