हिलरी डफ

हिलरी डफ (सप्टेंबर २८, इ.स. १९८७) ही अमेरिकेची चित्रपट अभिनेत्री व गायिका-गीतकार आहे. लिझी मॅग्वायर या डिज्नी चॅनलवरील कार्यक्रमात असलेल्या प्रमुख भमिकेच्या माध्यमातून ती प्रसिद्धिच्या झोतात आली. तिच्या व्यावसायिक दृष्ट्या यशस्वी सिनेमांत चीपर बाय द डझन (२००३ चित्रपट), लिझी मॅग्वायर मुव्ही (२००३) आणि अ सिंड्रेला स्टोरी (२००४) यांचा समावेश होतो.