फिरोज गांधी
Appearance
फिरोज जहांगीर गांधी ( सप्टेंबर १२, १९२० - सप्टेंबर ८, १९६०) हे भारतीय स्वातंत्र्य सैनिक, पत्रकार व राजकारणी आणि एक प्रखर भ्रष्टाचारविरोधक होते. फिरोज गांधी हे दिल्लीतील नॅशनल हॅराल्ड व लखनौतील नवजीवन या दैनिकांचे प्रकाशक होते. ते राज्यसभेचे सदस्य होते आणि त्यांनी सभागृहात नेहरूंच्या राजकारणाचा आणि राज्यकारभाराचा सतत विरोध केला.
फिरोज गांधी हे भारताचे पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे पती आणि संजय आणि राजीव गांधी यांचे पिता होते.