Jump to content

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मराठवाड़ा मुक्ति संग्राम दिन
शहीद स्मारक, परभणी
महत्त्व १७ सप्टेंबर १९४८ रोजी मराठवाडा भारताचा एक भाग बनला
उत्सव साजरा
  • मराठवाड्यात तिरंगा फडकावला जातो.
  • मराठवाड्याशी संबंधित सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे अयोजन केले जाते
  • राजगोपालचारी उद्यान परभणी येथे सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे अयोजन केले जाते
दिनांक १७ सप्टेंबर
वारंवारता दर वर्षी
यांच्याशी निगडीत मराठवाडा

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन हा महाराष्ट्रातील एक राजकीय उत्सव आहे. हा सण दरवर्षी १७ सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. या दिवशी १९४८ मध्ये मराठवाड्यातील निजामाची सत्ता संपली आणि ती भारताचा एक भाग बनली.

इतिहास[संपादन]

१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला, पण त्यावेळी संपूर्ण देश विविध संस्थानांमध्ये विखुरलेला होता. त्यावेळच्या ५६५ पैकी ५६२ संस्थांनांनी स्वतंत्र भारतात सामाविष्ट होण्याची संमती दर्शविली आणि तशी कार्यवाही केली. मात्र हैदराबाद संस्थान, जम्मू आणि काश्मीर आणि जुनागड संस्थान ही तीन संस्थाने स्वतंत्र भारतात सामाविष्ट झाली नव्हती.

हैदराबाद संस्थानावर निजाम मीर उस्मान अली खान यांचे राज्य होते. हैदराबाद संस्थानावर तब्बल सहा पिढ्यांपासून निझाम वंशाचे राज्य होते.[१] त्यांच्या निजामांच्या राज्यातून मुक्त होऊन भारतीय संघराज्यात सामाविष्ट होण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण हैदराबाद संस्थानात मुक्ती संग्राम चालू झाला होता.

हैदराबाद संस्थानची त्यावेळची लोकसंख्या १ कोटी ६० लाख होती. यात तेलंगणा, मराठवाडा आणि कर्नाटकचा काही भाग येत होता. मुक्ती संग्राम सुरू झाल्यावर निजामाचा सेनापती कासीम रझवी याने मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (लघुरूप एम आय एम) या संघटनेच्या माध्यमातून रझाकार नावाने मुस्लिम स्वयंसेवकांची भरती केली आणि त्यांच्या साह्याने जनतेवर अमर्याद अत्त्याचार चालू केले.[२][३][४][५]

कासीम रझवी

याचे नेतृत्व स्वामी रामानंद तीर्थ, दिंगबरराव बिंदू, गोविंदभाई श्रॉफ, रविनारायण रेड्डी, देवीसिंग चौहान, भाऊसाहेब वैशंपायन, शंकरसिंग नाईक, विजयेंद्ग काबरा, बाबासाहेब परांजपे या आणि इतर अनेक नेत्यांकडे होते. मराठवाडयाच्या गावागावात हा संग्राम लढला गेला. यात जीवाची काळजी न करता अनेक स्वातंत्र्यवीर पुढे आले. मराठवाडयात निजामांच्या पंतप्रधानास थांबवण्यासाठी पूल उडवून देणारे काशीनाथ कुलकर्णी, मुक्ती संग्राम लढ्यातील स्वयंसेवकांना शस्त्र बनवून पुरवणारे उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम चे गणपतराव क्षीरसागर सुतार ,मराठवाडयाची राणी लक्ष्मीबाई म्हणून विख्यात झालेल्या बदनापूर तालुक्यातील धोपटश्र्वर गावच्या दगडाबाई शेळके, रोहिल्यांना जेरीस आणणारे बीडचे विठ्ठलराव काटकर, बर्दापूर पोलीस ठाणे उडवून देणारे लातूरचे हरिश्चंद्गजी जाधव,लातूर येथेल बोरी या ठिकाणाहून निजामाचा बराच कारभार चालायचा भारतीय सैनिकांनी मराठवाड्यावर धावा बोलताच धोंडिबा शंकर सिरसाट यांनी अजूबाजूची निजामांच्या ठाण्यावर हल्ला चढवला व निजामी सैन्याना खदडुन हद्दपार केले सर करणारे उस्मानाबाद जिल्हयातील होटी गावचे जनार्दन होर्टीकर गुरजी तसेच परभणीत रझाकारांना हुसकावून लावणारे सूर्यभान पवार, विनायकराव चारठाणकर, विश्र्वनाथराव कातनेश्र्वरकर, पालम तालुक्यातील गुळखंड गावचे सुपुत्र मारोतराव पौळ , पाथरी येथील देवरावजी नामदेवराव कांबळे, नांदेड येथील देवरावजी कवळे, जीवनराव बोधनकर आदींच्या रूपाने मराठवाड्याच्या कानाकोपज्यात स्वातंत्र्य संग्राम तेजस्वीपणे लढला गेला.

या मुक्ती संग्रामात श्रीधर वर्तक, जानकीलालजी राठी, शंकरराव जाधव, जालन्याचे जनार्दन मामा, किशनसिंग राजपूत,गोविंदराव पानसरे, बहिर्जी बापटीकर, राजाभाऊ वाकड,विश्र्वनाथ भिसे,जयंतराव पाटील आदींसारख्यांनी आपल्या जीवाची तमा न बाळगता काम केले. या सर्व हुतात्म्यांनी आणि मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्य सैनिकांनी केलेल्या संग्रामाचे मोल काढणे शक्य नाही. यासीन जूबेर हैद्राबादी मंत्री याने मुक्तीसेनेने ताब्यात घेतलेली परत घेण्याची प्रतिज्ञा केली त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालूक्यातील जातेगाव माळावर निजामाच्या सैन्याला पुढे सरकु दिले नाहीत यामध्ये मानसिंग राजपुत, लक्ष्मण आवचार, रामलाल राजपूत, व रामचंद्र धंदेवार हे आघाडीवर होते यामध्ये रामचंद्र धंदेवार यांना बाळगिर मठ सरला येथे बंदुकीच्या गोळीने वेध घेतल्याने हुतात्म झाले त्यावेळी गोदामाय दुथडी भरून वाहत होती. रामचंद्र याना सिरसागर नावाच्या मर्दाने शहीदास आपल्या पाठीवरून पैलतीरी आणून भर पावसात खड्डा केला व त्यांची विधी पूर्ण केली.

निझाम शासनाचे हे अत्त्याचार एवढे अमर्याद होते की हैदराबाद मुक्तिसंग्रातील काँग्रेस कार्यकर्यांच्या शस्त्रे हाती घेऊ देण्याच्या विनंतीस स्वतः महात्मा गांधींनी सुद्धा संमती दिली.[६]. शेवटी भारताचे तात्काळीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी निझाम शासनाच्या विरोधात पोलीस कार्यवाहीची घोषणा केली. 11 सप्टेंबर १९४८ रोजी ऑपरेशन पोलो अंतर्गत मेजर जनरल जे.एन चौधरीच्या नेतृत्वाखाली पाच दिशेने निझाम संस्थानावर कारवाई चालू झाली. मुख्य सैन्य सोलापूरकडून शिरल्या. पहाटे ४ वाजता ऑपरेशन सुरू झाल्यावर २ तासांत नळदुर्ग व सायंकाळपर्यंत तुळजापूर, परभणी ते मणिगढ, कनेरगाव, विजयवाड्याकडील बोनाकल ताब्यात घेतले. चाळीसगावकडून आलेल्या तुकडीने कन्नड, दौलताबाद तर बुलढाण्याकडेच्या तुकडीने जालना शहर ताब्यात घेतले. दुसरीकडे वारंगळ, बीदर विमानतळावर भारतीय सैनिकांनी हल्ले केले. १५ सप्टेंबर रोजी औरंगाबाद सर करून सैन्य पुढे निघाल्या. भारतीय सैन्यापुढे रझाकार फार वेळ टिकू शकले नाहीत. निजामी सैन्य माघार घ्यायला लागले आणि कासीम राजवीला अटक झाली. शेवटी १७ सप्टेंबर १९४८ रोजी हैदराबादचे सैन्यप्रमुख जन अल इद्गीस यांनी शरणांगती स्वीकारली आणि निझाम पराभव मानले आणि हैदराबाद संस्थान भारतात विलीन झाले आणि हैदराबाद संस्थानात तिरंगा फडकला.

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ Srinath, Raghavan (2010). War and peace in modern India. Houndmills, Basingstoke, Hampshire: Palgrave Macmillan. p. 75. ISBN 9780230242159. OCLC 664322508.[permanent dead link]
  2. ^ Moraes, Frank, Jawaharlal Nehru, Mumbai: Jaico. 2007, p.390
  3. ^ Rao, P.R., History and Culture of Andhra Pradesh: From the Earliest Times to 1991, New Delhi: Sterling Publishers, 2012. p. 284
  4. ^ Remembering a legend, The Hindu, 22 August 2008; Aniket Alam, A one-man crusade, it was and still is, The Hindu, 6 January 2003. बहुसंख्यांक हिंदू समाजावरील वाढत्या अत्याचारामुळे तेथील सामान्य जनतेचे जंगलात किंवा भारतातील आसपासच्या गावात स्थलांतर सुरू झाले.
  5. ^ Kate, Marathwada under the Nizams 1987, पान. 84.
  6. ^ "मराठवाडा (हैदराबाद) मुक्तीसंग्रामाचा दैदिप्यमान लढा..." 2021-05-11 रोजी मूळ पानापासून संग्रहित. २२ मे २०२१ रोजी पाहिले.