चंद्रपूर किल्ला

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.


किल्ले चंद्रपूर
नाव किल्ले चंद्रपूर
उंची फूट
प्रकार भूदुर्ग
चढाईची श्रेणी सोपी
ठिकाण चंद्रपूर, महाराष्ट्र
जवळचे गाव चंद्रपूर
डोंगररांग
सध्याची अवस्था व्यवस्थित
स्थापना {{{स्थापना}}}


भौगोलिक स्थान[संपादन]

चंद्रपूर हे जिल्ह्याचे ठिकाण आहे. नागपूरच्या दक्षिणेला चंद्रपूर आहे. गौड राजांची राजधानी असलेले चंद्रपूर हे गाव पूर्वी किल्ल्याच्या आत होते. लोकसंख्येच्या विस्तारामुळे चंद्रपूरचा किल्ला आता मध्यवस्तीमध्ये आलेला आहे.

इतिहास[संपादन]

चंद्रपूरच्या किल्ल्याचा पाया खांडक्या बल्लाळशहा या गौड राजाने घातला. त्याने चंद्रपूर येथे राजधानी वसवली. चंद्रपूरचा किल्ला वसवण्यामागे एक लोककथाही या भागात प्रचलित आहे. ही बहुचर्चित कथा या किल्ल्याच्याही बाबतीत सांगितली जाते. खांडक्या बल्लाळशाहच्या पदरी तेल ठाकूर नावाचा एक वास्तुशास्त्रज्ञ होता. त्याला इ.स. १४७२ मध्ये येथे किल्ला बांधायला सांगितले. तेल ठाकूराने पहाणीकरुन साडेसात मैलाच्या परिघाची आखणी केली आणि पायाभरणी केली.

खांडक्या बल्लाळशहाच्या मृत्युनंतर त्याचा मुलगा हीरशहा गादीवर आला. त्यानेही परकोटाच्या चार वेशी उभारल्या. हत्तीवर आरुढ असलेला सिंह हे त्यांच्या शौर्याचे प्रतिक होते. हे प्रतिक त्यांनी राजचिन्ह म्हणून स्विकारले. ते चिन्ह वेशीच्या चारही बाजूंना कोरुन घेतले. मात्र या चिन्हांमधील सिंहाचा आकार हत्तीच्या दुप्पट तरी मोठा दाखवलेला आहे.

पाहण्यासारखे[संपादन]

चार दिशांना चार बलदंड दरवाजांबरोबर चार उपदिशांना लहान दरवाजे करण्यात आले. यांना खिडक्या म्हणतात. पुढे धुंड्या रामशहा (१५९७ ते १६२२) याच्या कारकिर्दीमधे तटबंदीचे काम पूर्ण झाले. त्यावेळी मोठा दानधर्म करण्यात आला. या तटाला तेव्हा सव्वा कोटी रुपये खर्च आल्याची नोंद आहे. तटबंदीची उंची १५ ते २० फुटांची असून परिघ साडेसात मैल आहे. याचे दक्षिणोत्तर अंतर पावणे दोन मैल असून पूर्वपश्चिम अंतर सव्वा मैल आहे. पूर्व व दक्षिणेकडे झटपट नदी असून पश्चिमेला इरई नदी तटाजवळून वहाते.

चंद्रपूरच्या किल्ल्याला जटपूरा, अचलेश्वर, बिनबा आणि पठाणपुरा असे दरवाजे असून यातील पठाणपुरा दरवाजा अतिशय देखणा आहे. तसेच उपदरवाजे म्हणजे खिडक्यांनाही नावे आहेत ती अशी बगड, हनुमान, विठोबा, चोर आणि मसण. याशिवाय किल्ल्याला पूर्वी बालेकिल्ला होता. तो हीरशहाने बांधला. त्याचा वापर सध्या तुरुंग म्हणून करतात. इ.स. १८१८ मधे इंग्रज कॅप्टन स्कॉट याने बालेकिल्ला जिंकला तेव्हा त्याला १० लाख रुपयांची लुट येथे मिळाली होती.

याशिवाय अचलेश्वर मंदिर, महाकाली मंदिर, गंगासिंगाची समाधी तसेच रामाळा तलाव, रामबाग, कॅ. कोरहॅमचे थडगे इत्यादी वास्तु पहाण्यासारख्या आहेत. अचलेश्वर मंदिराजवळ असलेली राजा बीरशहाची समाधी अतिशय देखणी आहे.

गडावरील राहायची सोय[संपादन]

गडावरील खाण्याची सोय[संपादन]

गडावरील पाण्याची सोय[संपादन]

गडावर जाण्याच्या वाटा[संपादन]

मार्ग[संपादन]

चंद्रपूरचा किल्ला हा चंद्रपूर शहरामध्येच असल्याने चंद्रपूरला आलात कि झाले. चंद्रपूर हे विदर्भाच्या दक्षिणेला वसलेले शहर आहे. येथे रेल्वे स्टेशन व बस स्थानक आहे. वर्धा, नागपूर, यवतमाळ येथून सातत्याने बस चालतात. रेल्वेने पोचायचे असल्यास नागपूर किंवा वर्धा येथे उतरून दुसरी गाडी पकडावी लागते. मुंबई, पुणे, औरंगाबाद, जळगाव ई. कडून येण्यासाठी रेल्वे फायदेशीर आहे. सोलापूर, नांदेड कडून येण्यासाठी बसचा प्रवास ठीक आहे. चंद्रपूर हे नागपूर विभागातील दुसरे मोठे शहर आहे. त्यामुळे बस आणि रेल्वेची चांगली उपलब्धता आहे.

जाण्यासाठी लागणारा वेळ[संपादन]

किल्ला हा शहराच्या मध्यभागी आहे. बस स्थानक व रेल्वे स्टेशन पासून अंदाजे अर्धा किलोमीटर वर किल्ल्याचा जतपुरा गेट लागतो.

संदर्भ[संपादन]

हे सुद्धा पहा[संपादन]