रामसेज किल्ला

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
रामसेज किल्ला
नाव रामसेज किल्ला
उंची
प्रकार
चढाईची श्रेणी अत्यंत अवघड
ठिकाण नाशिक जिल्हा, महाराष्ट्र, भारत
जवळचे गाव
डोंगररांग कळसुबाई
सध्याची अवस्था
स्थापना {{{स्थापना}}}

रामसेज किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक ऐतिहासिक किल्ला आहे. हा पुण्याहून २९० कि.मी. पुणे - नाशिक - हरसू - थानपाडा - खैरपाली या मार्गावर आहे.

इतिहास[संपादन]

मुघलांविरुद्ध तब्बल पाच वर्षं या किल्ल्याने टिकाव धरला होता. एकेक किल्ला असा पाच वर्षं लढवण्याच्या क्षमतेतच स्वराज्याचं सामर्थ्य दडले होते.

गडावरील ठिकाणे[संपादन]

गडावर जाण्याच्या वाटा[संपादन]

नाशिक पेठ रस्त्यावरच्या जकात नाक्‍यापुढे आशेवाडी गाव आहे.आशेवाडीत मारुतीचे प्रशस्त मंदिर आहे. या मंदिराच्या शेजारून छोटेखानी रामसेज किल्ल्यावर चढाई करता येते. आशेवाडीच्या दिशेला दिसणारा रामसेजचा बुधला डावीकडे ठेवत पुढे गेल्यावर रामसेज किल्ल्यावर चढणाऱ्या पायऱ्या लागतात. या पायऱ्यांनी वर चढून आल्यावर गडावर प्रवेश करण्यापूर्वी थंडगार पाण्याची टाकी आहे. रामसेज गडमाथ्यावर कोरडी पाण्याची टाकी, पडक्‍या जोत्याचे अवशेष आहेत. माथ्यावर सुस्थितीत असलेलं मंदिर आहे. त्यात वा रामाच्या मंदिरात राहण्याची सोय होऊ शकते. आशेवाडीकडला बुधला व त्याजवळच ध्वजस्तंभ ही गडफेरीत करण्याची इतर ठिकाणे आहेत. रामसेजवरून समोर प्रशस्त भोरगड किल्ला दिसतो. संरक्षण यंत्रणांची रडार सिस्टिम असल्याने भोरगडावर मात्र आपल्याला प्रवेश नाही.रामसेजवरून पुन्हा नासिककडे येताना म्हसरूळनजीक जैन चांभारलेणी आहेत. वेळ असल्यास ती जरूर पाहून घ्यावीत. म्हसरूळकडून एक रस्ता थेट वाघेऱ्यापर्यंत जातो. तेथे वाघेरा किल्ला बघू शकतो

मुक्काम[संपादन]

एका दिवसात रामसेज किल्ला, वाघेरा किल्ला, आणि खैराई किल्ला हे तिन्ही किल्ले पाहून मुक्कामाला त्र्यंबकेश्‍वर वा अंजनेरी गाठता येते.

छायाचित्रे[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

संदर्भ[संपादन]

हे सुद्धा पहा[संपादन]