अहिंसा एक्सप्रेस
अहिंसा एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची एक प्रवासी सेवा आहे. भारतीय रेल्वेची पुणे जंक्शन ते अहमदाबाद जंक्शन या दरम्यान साप्ताहिक धावणारी ट्रेन आहे. या रेल्वेचा डाउन ट्रेन क्रं. ११०९६ आहे आणि अप क्रं. ११०९५ आहे. अहिंसा म्हणजे शांततेचा मार्ग !ही गाडी पुणे ते अहमदाबाद स्थानकांदरम्यान आठवड्यातून एकदा धावते. मध्य रेल्वेद्वारे चालवल्या जाणाऱ्या अहिंसा एक्सप्रेसला पुणे ते अहमदाबाद दरम्यानचे ६३५ किमी अंतर पार करायला सुमारे १२ तास लागतात.
बोगी
[संपादन]सहसा या गाडीला १ वातानुकुलित प्रथम श्रेणी, १ दोन स्तरीय बिछायती असलेला वातानुकूलित, २ त्रिस्तरीय बिछायते असलेले वातानुकूलित, १० शयन यान, ४ सामान्य अनारक्षित व १ खानपान व्यवस्थेचे डबे असतात. भारतीय रेल्वे स्वतः च्या अधिकारात प्रवाश्यांची मागणी आणि गरजे प्रमाणे बोगी वाढवते.[१]
सेवा
[संपादन]ही क्र.११०९६ ट्रेन पुणे ते अहमदाबाद या रेल्वे स्थानक दरम्यानचे ६३५ कि.मी. अंतर तासी सरासरी ५१.४९ कि.मी. वेगाने १२ तास व २० मिनिटात पार करते आणि क्र.११०९५ ही परतीचा प्रवास ११ तास ५५ मिनिटात पार करते. या ट्रेनचा वेग तासी ५५ कि.मी. पेक्षा कमी असल्याने प्रवासी भाड्यात सेवा कर लागत नाही.
तपशील
[संपादन]पुणे ते अहमदाबाद दरम्यानचा संपूर्ण रेल्वेमार्ग विद्युत इंजिन असल्यामुळे कल्याण शेडमधील WCAM 2/2P ह्या प्रकारचे इंजिन संपूर्ण मार्गावर वापरले जाते.
वेळापत्रक
[संपादन]गाडी क्रमांक | मार्ग | प्रस्थान | आगमन | कधी |
---|---|---|---|---|
११०९६ | पुणे – अहमदाबाद | १९:५० | ०७:४५ | बुध |
११०९५[२] | अहमदाबाद– पुणे | १६:४५ | ०४:४५ | गुरु |
मार्ग
[संपादन]ही ट्रेन पुणे स्टेशन, कल्याण जंक्शन, भिवंडी रोड, वसई रोड, डहाणू रोड, वापी, वल्साड, नवसारी, सूरत, भरूच जंक्शन, वडोदरा जंक्शन, आनंद जंक्शन, नदीयाड जंक्शन, अहमदाबाद जंक्शन या दरम्यान धावते.[३]
स्थानक संकेत | स्थानक नाव |
---|---|
PUNE | पुणे |
SVJR | शिवाजीनगर |
LNL | लोणावळा |
KJT | कर्जत |
KYN | कल्याण |
BIRD | भिवंडी रोड |
BSR | वसई रोड |
DRD | डहाणू रोड |
VAPI | वापी |
BL | वलसाड |
NVS | नवसारी |
ST | सुरत |
BH | भरुच |
BRC | वडोदरा |
ANND | आणंद |
ND | नडियाद |
ADI | अहमदाबाद |
बाह्य दुवे
[संपादन]संदर्भ
[संपादन]- ^ "अहिंसा एक्सप्रेस बोगी" (इंग्लिश भाषेत). ०९-०१-१६ रोजी पाहिले.
|अॅक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link) - ^ "अहिंसा एक्सप्रेस वेळापत्रक" (इंग्लिश भाषेत). 2015-10-17 रोजी मूळ पान पासून संग्रहित. ०९-०१-१६ रोजी पाहिले.
|अॅक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link) - ^ "अहिंसा एक्सप्रेस मार्ग" (इंग्लिश भाषेत). ०९-०१-१६ रोजी पाहिले.
|अॅक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)