Jump to content

इंद्रायणी एक्सप्रेस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
इंद्रायणी एक्सप्रेस
पुणे रेल्वे स्थानकात उभी असलेली इंद्रायणी एक्सप्रेस
माहिती
सेवा प्रकार मेल-एक्सप्रेस
प्रदेश महाराष्ट्र, भारत
शेवटची धाव अद्याप सुरू
चालक कंपनी मध्य रेल्वे, भारतीय रेल्वेचा विभाग
मार्ग
सुरुवात छत्रपती शिवाजी टर्मिनस
थांबे ५/६
शेवट पुणे
अप क्रमांक २२१०६
निघायची वेळ (छत्रपती शिवाजी टर्मिनस) ०५:४०
पोचायची वेळ (पुणे) ०९:०५
डाउन क्रमांक २२१०५
निघायची वेळ (पुणे) १८:३५
पोचायची वेळ (छत्रपती शिवाजी टर्मिनस) २२:००
अंतर १९२ किमी
साधारण प्रवासवेळ ३ तास २० मिनिट
वारंवारिता रोज
प्रवासीसेवा
प्रवासवर्ग वातानुकुलित खुर्चीयान, २
अपंगांसाठीची सोय नाही
बसण्याची सोय विमानाप्रमाणे सहा आसनांची रांग (वाखु)
१२ आसनांचा कंपार्टमेंट
झोपण्याची सोय नाही
खानपान फेरीवाले कंत्राटी विक्रेते
सामान ठेवण्याची सोय प्रवासी कंपार्टमेंटमध्येच
इतर सुविधा पासधारक डबे
तांत्रिक माहिती
डबे, इंजिने, इ.

डब्ल्यु.डी.एम-३डी इंजिन
अधिक २ डब्ल्यु.सी.जी.-२ इंजिन (कर्जत ते लोणावळा) २ एस.एल.आर डबे
२ वातानुकुलित खुर्चीयान

६ दुसरा वर्ग (३ पासधारकांसाठी आरक्षित)
गेज ब्रॉडगेज
विद्युतीकरण पूर्ण मार्ग

२२१०५ डाऊन व २२१०६ अप क्रमांकाची इंद्रायणी एक्सप्रेस ही भारतीय मध्य रेल्वेची मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस आणि पुणे दरम्यान धावणारी एक वेगवान आगगाडी आहे. दररोज धावणाऱ्या या गाडीला पुण्याजवळून वाहणाऱ्या ‘इंद्रायणी’ नदीचे नाव दिले आहे.

सुरुवातीस हीच गाडी मुंबई - पुणे दरम्यान १०२१ क्रमांकाची गाडी व पुणे - मुंबई दरम्यान १०२२ क्रमांकाची गाडी म्हणून धावत असे. तीच गाडी आता नव्या क्रमांकाने धावते.

सध्या इंद्रायणी एक्सप्रेसला वातानुकूलित खुर्ची यानाचे २, सर्वसाधारण द्वितीय वर्गाचे ८, पासधारकांसाठी आरक्षित असलेले सर्वसाधारण द्वितीय वर्गाचे २ व अनारक्षित असलेले सर्वसाधारण वर्गाचे ५ डबे जोडलेले आहेत. प्रवाशांच्या मागणीनुसार भारतीय रेल्वेला डब्यांची संख्या कमी / जास्त करण्याचे अधिकार आहेत.

सेवा

[संपादन]

२७ एप्रिल १९८८ रोजी प्रथम इंद्रायणी एक्स्रपेस सुरू करण्यात आली आणि मुंबई – पुणे दरम्यान धावणाऱ्या सहा गाड्यांपैकी ही एक गाडी आहे. इतर पाच गाड्या – १२१२७/२८ मुंबई-पुणे इंटरसिटी एक्सप्रेस, ११००७/०८ डेक्कन एक्सप्रेस, ११००९/१० सिंहगड एक्सप्रेस, १२१२५/२६ प्रगती एक्सप्रेस आणि १२१२३/२४ डेक्कन क्वीन.

२२१०५ व २२१०६ क्रमांकांची इंद्रायणी एक्सप्रेस मुंबई – पुणे व पुणे-मुंबई हे १९२ किलोमीटरचे अंतर ३ तास २५ मिनिटांत (वेग - ५५.६० किमी/तास) पार करते.

इंद्रायणी एक्सप्रेस - २२१०६ - द्वितीय श्रेणी वर्गाचा डबा
इंद्रायणी एक्सप्रेस - २२१०६ - वातानुकूलित खुर्ची वर्गाचा डबा

शक्तीचा वापर

[संपादन]

या मार्गावरील सर्व गाड्या विजेवर चालत असला तरीही इंद्रायणीला डब्लयूडीएम थ्रीडी (3D) हे डिझेल इंजिन जोडलेले असते. कर्जत ते लोणावळा या घाटमार्गाच्या चढावावर गाडीला २ डब्ल्यू.सी.जी.-२ हे अधिकचे इंजिन लावतात.

वेळापत्रक

[संपादन]

मुंबई-पुणे दरम्यान धावणारी इंद्रायणी एक्सप्रेस ही दिवसातली पहिली आणि परतीसाठीची शेवटची गाडी आहे. २२१०५ ही गाडी दररोज भारतीय प्रमाणवेळेनुसार मुंबई मधून ५.४० वाजता निघून पुण्याला ९.०५ला पोहोचते. परतताना २२१०६ ही गाडी पुण्यावरून १८.३५ला निघून मुंबईला २२.००ला पोहोचते.[]

स्थानक संकेतांक स्थानकाचे नांव

२२१०५ - मुंबई छ.शि.ट. ते पुणे (1)[]

अंतर
(कि.मी.)
दिवस

२२१०६ - पुणे ते मुंबई छ.शि.ट.(2)[]

अंतर
(कि.मी.)
दिवस
आगमन गंतव्य आगमन गंतव्य
सीएसटीएम मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस सुरुवात ०५:४० २२ :०० गंतव्य १९२
डीआर दादर ०५:५१ ०५:५३ २१ :३३ २१ :३५ १८३
टीएनए ठाणे ०६:१४ ०६:१६ ३३ २१:०८ २१:१० १५९
केवायएन कल्याण ०६:३५ ०६:३७ ५४ २०:५० २०:५२ १३९
केजेटी कर्जत ०७:१५ ०७:१७ १०० २०:०८ २०:१० ९२
एलएनएल लोणावळा ०८:०० ०८:०२ १२८ १९:२३ १९:२५ ६४
एसव्हीजेआर शिवाजीनगर ०८:५० ०८:५२ १८९ थांबा नाही थांबा नाही xxx
पुणे पुणे जंक्शन ०९:०५ गंतव्य १९२ सुरुवात १८:३५

धावत्या गाडीतील दुर्घटना

[संपादन]

१ डिसेंबर १९९४ च्या रात्री कर्जत आणि लोणावळालोणावळयाच्या दरम्यान भोर घाट उतरताना ठाकूरवाडी केबीनजवळ आग लागल्यामुळे इंद्रायणी एक्सप्रेसचे ब्रेक निकामी झाले. अशा परिस्थितीत घाटामधून ही गाडी १०० कि.मी/तासापेक्षा जास्त वेगाने धावत धावत शेवटी सपाट जागी थांबली होती. या दुर्घटनेमागचे निश्चित कारण अद्यापपर्यंत समजू शकलेले नाही.[]

संदर्भ व नोंदी

[संपादन]
  1. ^ "इंद्रायणी एक्सप्रेस - २२१०६".
  2. ^ "इंद्रायणी एक्सप्रेस - २२१०५[[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख]][[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे लेख ]][[[Wikipedia:Link rot|मृत दुवा]]]". URL–wikilink conflict (सहाय्य)
  3. ^ "इंद्रायणी एक्सप्रेस - २२१०६". 2013-12-14 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2013-11-13 रोजी पाहिले.
  4. ^ "आय आर एफ सी ए मेलिंग सूची संग्रहण" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)