मनमाड जंक्शन रेल्वे स्थानक
मनमाड जंक्शन दक्षिण मध्य रेल्वे स्थानक | |
---|---|
फलक | |
स्थानक तपशील | |
पत्ता | मनमाड, महाराष्ट्र - ४२३१०४ |
गुणक | 20°14′59″N 74°26′18″E / 20.24972°N 74.43833°E |
मार्ग |
हावडा−नागपूर−मुंबई रेल्वेमार्ग मनमाड−सिकंदराबाद रेल्वेमार्ग |
जोडमार्ग | मनमाड-दौंड |
फलाट | ६ |
इतर माहिती | |
उद्घाटन | १८६६ |
विद्युतीकरण | १९६८ |
संकेत | MMR |
मालकी | रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे |
विभाग | दक्षिण मध्य रेल्वे |
स्थान | |
|
मनमाड रेल्वे स्थानक उत्तर महाराष्ट्रातील रेल्वे स्थानक आहे. हे स्थानक मध्य रेल्वेच्या मनमाड-सिकंदराबाद मार्गावरील एक महत्त्वाचे स्थानक असून अनेक लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्या येथे थांबतात.
हे स्थानक दक्षिण मध्य रेल्वेच्या मुंबई-नागपूर-हावडा मार्गावरील एक महत्त्वाचे स्थानक असून लांब पल्ल्याच्या जवळजवळ सगळ्या रेल्वेगाड्या येथे थांबतात. येथून दौंडकडे आणि पूर्णाकडे जाणारे लोहमार्गही आहेत. वसई-दिवा लोहमार्ग तयार होईपर्यंत पश्चिम व उत्तर भारतातून दक्षिणेकडे जाणाऱ्या अनेक रेल्वेगाड्या भुसावळ-मनमाड-दौंडमार्गे जात असत. मनमाड-इंदूर हा नवा रेल्वेमार्ग बांधून पूर्ण झाल्यानंतर अनेक लांब पल्ल्याच्या गाड्यांचे अंतर कमी होईल.
इतिहास
[संपादन]भारतातील पहिला रेल्वेमार्ग १९५३मध्ये कार्यान्वित झाल्यानंतर हा मार्ग कोलकात्याकडे झपाट्याने वाढविण्यात आला. १८५४ च्या मे महिन्यात कल्याण, १८६० मध्ये भुसावळ तर १८६७मध्ये हा मार्ग नागपूर रेल्वे स्थानकला जाउन पोचला.[१][२] मनमाड रेल्वे स्थानक १८६६मध्ये बांधून कार्यान्वित झाले. सुमारे शंभर वर्षांनंतर १९६८साली या स्थानकातील मार्गाचे विद्युतीकरण झाले.[३]
येथे सुरुवात/शेवट होणाऱ्या गाड्या
[संपादन]गाडी क्र. | गाडी नाव | गंतव्यस्थान |
---|---|---|
१२१०९ / १२११० | पंचवटी एक्सप्रेस | मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस |
०७७७७ / ०७७७८ | मनमाड हुजुर साहिब नांदेड डेमू हुजुर साहिब नांदेड मनमाड डेमू | हुजुर साहिब नांदेड |
१७०६३ / १७०६४ | अजिंठा एक्सप्रेस | सिकंदराबाद |
१७६८७ / १७६८८ | मराठवाडा एक्सप्रेस | धर्माबाद |
संदर्भ
[संपादन]- ^ Chronology of railways in India, Part 2 (1832 - 1865). "IR History: Early Days – I". २०१२-११-२० रोजी पाहिले.
- ^ "Historical Milestones". Central Railway. 2013-03-24 रोजी पाहिले.
- ^ "विद्युतीकरण इतिहास" (इंग्लिश भाषेत). २०१३-०३-१८ रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)