Jump to content

सिंहगड एक्सप्रेस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

११००९/१० सिंहगड एक्‍स्प्रेस ही महाराष्ट्र राज्याच्या पुणेमुंबई शहरांदरम्यान भारतीय रेल्वेतर्फे चालविण्यात येणारी रेल्वे आहे. या गाडीची पहिली फेरी मंगळवार दिनांक १ मार्च १९५५ रोजी झाली. ही गाडी सकाळी पुण्यातून निघते व संध्याकाळी मुंबईतून परतते. पुण्यामध्ये असलेल्या ऐतिहासिक सिंहगड किल्ल्यावरून या गाडीला सिंहगड एक्सप्रेस असे नाव देण्यात आले.

ही भारतातील पहिली दुमजली रेल्वेगाडी होती.

प्राथमिक माहिती

[संपादन]
  • मार्ग क्र. : ११००९ - मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पुणे जंक्शन, ११०१० - पुणे जंक्शन ते मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस
  • एकूण प्रवास : १८९.५ किलोमीटर
  • वारंवारता : दररोज
  • डबे : १६ (८ अनारक्षित यान, ५ खुर्ची यान, १ वातुनुकुलित खुर्ची यान, १ दिव्यांग यान व १ जनरेटर यान)

मार्ग

[संपादन]
  • ११००९ - मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पुणे जंक्शन
स्टेशन क्र. स्टेशन कोड स्टेशन नाव आगमन दिवस निर्गमन दिवस किलोमीटर विभाग राज्य/केंद्रशासित प्रदेश
CSMT मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस उगम स्थानक पहिला १७:५० पहिला ० (सुरुवात) मध्य रेल्वे महाराष्ट्र
DR दादर (मध्य) १८:०२ १८:०४
TNA ठाणे १८:२८ १८:३० ३३.३
KYN कल्याण जंक्शन १८:४७ १८:५० ५१.५
KJT कर्जत जंक्शन १९:२८ १९:३० ९८
LNL लोणावळा २०:१८ २०:२० १२५.८
CCH चिंचवड २०:५४ २०:५५ १७३.१
PMP पिंपरी २०:५९ २१:०० १७५.४
KK खडकी २१:०९ २१:१० १८३.५
१० SVJR शिवाजीनगर २१:२४ २१:२५ १८७.१
११ PUNE पुणे जंक्शन २१:५० अंतिम स्थानक १८९.५
  • ११०१० - पुणे जंक्शन ते मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस

पुण्याहून मुंबईला जाताना या गाडीला ठाणे स्थानकावर थांबा नाही

स्टेशन क्र. स्टेशन कोड स्टेशन नाव आगमन दिवस निर्गमन दिवस किलोमीटर विभाग राज्य/केंद्रशासित प्रदेश
PUNE पुणे जंक्शन उगम स्थानक पहिला ०६:०५ पहिला ० (सुरुवात) मध्य रेल्वे महाराष्ट्र
SVJR शिवाजीनगर ०६:११ ०६:१३ २.४
KK खडकी ०६:१९ ०६:२०
PMP पिंपरी ०६:२९ ०६:३० १४.१
CCH चिंचवड ०६:३४ ०६:३५ १६.४
LNL लोणावळा ०७:१३ ०७:१५ ६३.७
KJT कर्जत जंक्शन ०८:०१ ०८:०३ ९१.५
KYN कल्याण जंक्शन ०८:४६ ०८:४८ १३८
DR दादर (मध्य) ०९:३३ ०९:३५ १८०.५
१० CSMT मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ०९:५५ अंतिम स्थानक १८९.५