Jump to content

डेक्कन ओडिसी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

डेक्कन ओडिसी ही महाराष्ट्रातील पर्यटनविकासाकरता भारतीय रेल्वेमहाराष्ट्र राज्य पर्यटन विकास मंडळ, महाराष्ट्र शासन यांनी कार्यान्वित केलेली आलिशान रेल्वे आहे. पॅलेस ऑन व्हील्सच्या धर्तीवर आधारलेली ही रेल्वेगाडी जानेवारी २००४ मध्ये सुरू झाली.

मार्ग[संपादन]

मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस येथून सुरू होणाऱ्या डेक्कन ओडिसीच्या २४०० कि.मी. अंतर कापणाऱ्या ८ दिवसांच्या प्रवासात रत्‍नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा, कोल्हापूर, पुणे, औरंगाबाद, अजिंठा-वेरूळ, जळगाव, नाशिक व परत मुंबई अशी पर्यटनस्थळे समाविष्ट आहेत.

सोयी-सुविधा[संपादन]

महाराष्ट्रातील पर्यटनस्थळे पाहताना पर्यटकांना महाराष्ट्राच्या वैभवशाली परंपरेला साजेसा राजेशाही प्रवास अनुभवता यावा याकरता डेक्कन ओडिसीमध्ये इंटरकॉम, म्युझिक सिस्टम, उंची फर्निचर, पलंग, वातानुकूलन यंत्रना असलेले ११ डिलक्स डबे व २ लक्झरी डबे आहेत. आलिशान रेल्वेगाडीपेक्षाही ही गाडी 'चाकावरचे पंचतारांकित हॉटेल' वाटावे यादृष्टीने गाडीमध्ये दोन शाही रेस्टॉरेंट, बार, सॉना, जिम्नॅशियम, कॉन्फरन्स रूम अश्या सुविधादेखील आहेत.

बाह्य दुवे[संपादन]