Jump to content

पुणे−सिकंदराबाद शताब्दी एक्सप्रेस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(पुणे सिकंदराबाद शताब्दी एक्सप्रेस या पानावरून पुनर्निर्देशित)
पुणे सिकंदराबाद शताब्दी एक्सप्रेस

पुणे सिकंदराबाद शताब्दी एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची एक जलद प्रवासी सेवा आहे. शताब्दी एक्सप्रेस ह्या भारतामधील सर्वात वेगाने प्रवास करणाऱ्या व संपूर्ण वातानुकूलित गाड्यांपैकी एक असलेली ही रेल्वे पुणे ते हैदराबाद शहरांदरम्यान आठवड्यातून सहा दिवस धावते. मध्य रेल्वेमार्गे धावणाऱ्या पुणे सिकंदराबाद शताब्दी एक्सप्रेसला पुणे रेल्वे स्थानक ते सिकंदराबाद रेल्वे स्थानक दरम्यानचे ५९७ किमी अंतर पार करायला ८ तास व ३० मिनिटे लागतात.

डब्यांची रचना

[संपादन]

इतर शताब्दी एक्सप्रेस गाड्यांप्रमाणे पुणे सिकंदराबाद शताब्दी एक्सप्रेसमध्ये फक्त आसनाची सोय असून शयनयान सेवा उपलब्ध केली जात नाही. साधारणपणे ८ वातानुकुलीत चेअर कार व १ एक्झेक्युटिव्ह कार ह्या गाडीमध्ये असते. पुणे हैदराबाद मार्गाचे विद्युतीकरण झाले आहे. ह्या गाडीची वाहतूक इलेक्ट्रिक इंजिन वापरून केली जाते.

तपशील

[संपादन]

वेळापत्रक

[संपादन]
गाडी क्रमांक मार्ग प्रस्थान आगमन कधी
१२२०५ पुणे – सिकंदराबाद ०५:५० १४:२० मंगळखेरीज रोज
१२२०६ सिकंदराबाद – पुणे १४:४५ २३:१० मंगळखेरीज रोज

मार्ग

[संपादन]
क्रम स्थानक संकेत स्थानक नाव अंतर (किमी)
PUNE पुणे रेल्वे स्थानक
SUR सोलापूर २६४
GR गुलबर्गा ३७७
WADI वाडी ४१४
TDU तांडूर ४८४
VKB विकाराबाद ५२५
BMT बेगमपेट ५९३
SC सिकंदराबाद ५९७

बाह्य दुवे

[संपादन]