जम्मू तावी रेल्वे स्थानक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जम्मू तावी रेल्वे स्थानक

जम्मू तावी रेल्वे स्थानक हे भारताच्या जम्मू आणि काश्मीर राज्यातील जम्मू ह्या शहरामधील एक महत्त्वाचे रेल्वे स्थानक आहे. उत्तर रेल्वेच्या फिरोजपूर विभागाच्या अखत्यारीत येणारे जम्मू तावी हे राज्यामधील सर्वात मोठे स्थानक असून येथून दिल्ली व दिल्लीच्या दक्षिणेकडील अनेक मोठ्या शहरांसाठी गाड्या सुटतात. जम्मू तावी ते कन्याकुमारी दरम्यान ३,७११ किमी अंतर धावणारी हिमसागर एक्सप्रेस ही भारतामधील सर्वात लांब पल्ल्याची रेल्वेगाडी आहे.

काश्मीर रेल्वे चालू झाल्यानंतर जम्मू तावी स्थानकाचे महत्त्व वाढले आहे. श्रीनगर मार्गे बारामुल्ला ते जम्मू ह्या मार्गावरील जम्मू तावी हे अखेरचे स्थानक असेल.

महत्त्वाच्या गाड्या[संपादन]

हेही पहा[संपादन]