Jump to content

केतकी माटेगावकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(केतकी माटेगांवकर या पानावरून पुनर्निर्देशित)
केतकी माटेगावकर
केतकी माटेगावकर
जन्म केतकी पराग माटेगांवकर
२२ फेब्रुवारी, १९९४ (1994-02-22) (वय: ३०)
नागपूर
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय व गायन
भाषा मराठी
प्रमुख नाटके अवघा रंग एकचि झाला
प्रमुख चित्रपट शाळा, काकस्पर्श, शाळा,शाळा
प्रमुख टीव्ही कार्यक्रम सा रे ग म प:लिटील चॅम्प्स
वडील पराग माटेगांवकर
आई सुवर्णा माटेगावंकर

केतकी माटेगांवकर या एक मराठी अभिनेत्री व गायिका आहेत. वयाच्या चौथ्या वर्षी त्यांच्या गाण्यांचा पहिला आल्बम निघाला. केतकी यांची आई सुवर्णा माटेगावकर या प्रख्यात गायिका आहेत तसेच केतकीचे वडील उत्तम हर्मोनियम वादक आहेत यामुळे घरातुनच संगीताचे संस्कार तिच्यावर झाले.

प्रसिद्धीच्या झोतात

[संपादन]

केतकी माटेगावकर आईबरोबर अनेक कार्यक्रमातून गाणे सादर करत असे, 'सा रे ग म प लिटिल चॅम्प्स' या झी मराठी वरील कार्यक्रमातील गीतगायनामुळे प्रसिद्धी केतकीला जगभर प्रसिद्धी मिळाली. आजारपणामुळे तिला स्पर्धेतुन बाहेर पडावे लागले, दरम्यान केतकीने २०१२ मध्ये मिलिंद बोकील यांच्या कादंबरीवर आधारित शाळा या मराठी चित्रपटामार्फत अभिनय क्षेत्रात पदार्पण केले, मुळातच ही कादंबरी अतिशय गाजलेली असल्याने त्यावरील या चित्रपटास देखील प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभला. शालेय जीवन, पहिलं प्रेम अशा अनेक गोष्टींचं चित्रण या चित्रपटात आपल्याला पाहायला मिळते.

या चित्रपटानंतर केतकीने "आरोही… गोष्ट तिघांची" या कौटुंबिक सामाजिक चित्रपटात "मृणाल कुलकर्णी" व "किरण करमरकर" या कलाकारांसमवेत रुपेरी पडद्यावर झळकली. यानंतर प्रतिकुल परिस्थितीतून शाळकरी मुलीपासून ते कलेक्टर झालेल्या तरुणीच्या प्रवासाची कथा सांगणारा तानी हा चित्रपट केला, यानंतर महेश मांजरेकर यांच्या काकस्पर्श या चित्रपटात केतकीने प्रिया बापट हिच्या लहानपणीची भूमिका रंगवली, केतकी माटेगावकर यांना त्यांच्या काकस्पर्श या मराठी चित्रपटातील भूमिकेबद्दल, मराठी इंटरनॅशनल फिल्म अँड थिएटरचा २०१२ सालचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे.

२०१४ मध्ये आलेला रवी जाधव दिग्दर्शित टाईमपास केतकीचा सर्वात हिट चित्रपट ठरला आहे. यात तिच्या सोबत आहे प्रथमेश परब हा नवोदित कलाकार होता. किशोरवयातील प्रेम यावर प्रकाश टाकणारा हा चित्रपट होता. तसेच नंतरच्या काळात फुन्त्रू या मराठी चित्रपटात देखील ती दिसली.

नाटक

[संपादन]

अवघा रंग एकचि झाला या मीना नेरुरकर लिखित नाटकात केतकीने महत्त्वाची भूमिका साकारली आहे. हे एक संगीत नाटक असुन शास्त्रीय संगीतावर आधारित काही गाणी यात केतकीने सादर केली आहेत.

संगीत दिग्दर्शन

[संपादन]

केतकी माटगावकर यांनी संगीत दिग्दर्शन करायला सुरुवात केल्यावर ‘हरिदर्शनाची ओढ’ या अभंगाला चाल दिली आहे. सुरेश वाडकर यांनी तो गायला आहे.

चित्रपट कारकीर्द

[संपादन]
वर्ष चित्रपट पात्र
२०१२ शाळा शिरोडकर
२०१२ आरोही आरोही
२०१२ काकस्पर्श लहान उमा
२०१३ तानी तानी
२०१४ टाईमपास प्राजक्ता
२०१५ टाईमपास २ लहान प्राजक्ता
२०१५ काकस्पर्श (तमिळ) उमा
२०१५ काकस्पर्श (हिंदी) उमा
२०१६ फुंतरू अनया/फुंतरू

चित्रपट (गायिका)

[संपादन]
गीताचे बोल संगीतकार भाषा चित्रपट
"फिर से चमके टिम टिम तारे " आनंद कुऱ्हेकर हिंदी दशावतार (चित्रपट )
"सुन जरा" अग्नी बैंड हिंदी शाळा
"मनात येते माह्या" प्रवीण कुमार मराठी तानी
"अजुनही सांजवेळी" प्रवीण कुमार मराठी रंगकर्मी
"मला वेड लागले प्रेमाचे " चिनार - महेश मराठी टाईमपास
"तारा तारा" हृषीकेश, सौरभ, जसराज मराठी भातुकली
"माझे तुझे" अविनाश - विश्वजीत मराठी इश्क वाला लव्ह
"सुन्या सुन्या " चिनार - महेश मराठी टाईमपास २
"कसा जीव गुंतला" हृषीकेश, सौरभ, जसराज मराठी फुंतरू
"प्रियकरा" हृषीकेश, सौरभ, जसराज मराठी वाय झेड (चित्रपट)
"ओली ती माती " नेहा राजपाल मराठी फोटोकॉपि (चित्रपट)

अल्बम (गायिका)

[संपादन]
  • अडम तडम (बाल-गीत)
  • अबबबबं (बाल-गीत)
  • आम्ही कोळ्याची पोर हाय (बाल-गीत)
  • उठा उठा चिऊताई (बाल-गीत)
  • एकदा काय झाले (बाल-गीत)
  • एका माकडानं काढलं दुकान (बाल-गीत)
  • एका माणसाची दाढी (बाल-गीत)
  • काल लोटला (आल्बम - केतकी)
  • कोकिळ म्हणतो काय करावे (बाल-गीत)
  • चंद्र माझ्या ओंजळीत (आल्बम - केतकी)
  • झुक झुक गाडी (बाल-गीत)
  • जादू व्हावी एकदा तरी (बाल-गीत)
  • जो जो रे अनसूया तनया (अंगाई गीत)
  • टप टप पडती (बाल-गीत)
  • नादावलं पाखरू (आल्बम - केतकी)
  • पाखरा पाखरा येऊन जा
  • पुन्हा एकदा (आल्बम - केतकी)
  • बेडूक शाळेमध्ये गेला (बाल-गीत)
  • भास हा (आल्बम - केतकी)
  • मनमोहना (आल्बम - केतकी)
  • मनूताई आली (बाल-गीत)
  • माझ्या मना (आल्बम - केतकी)
  • या मोठ्यांना काही (बाल-गीत)
  • सांगना आई (बाल-गीत)
  • सुट्टी एके सुट्टी (बाल-गीत)
  • स्वप्नात पाहिली राणीची बाग (बाल-गीत)

संदर्भ

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]