आर्या समीर आंबेकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(आर्या आंबेकर या पानावरून पुनर्निर्देशित)
आर्या आंबेकर
आयुष्य
जन्म जून १६, १९९४
जन्म स्थान नागपूर, महाराष्ट्र, भारत
व्यक्तिगत माहिती
धर्म हिंदू
नागरिकत्व Flag of India.svg भारतीय
मूळ_गाव पुणे
देश भारत
भाषा मराठी
पारिवारिक माहिती
आई श्रुती आंबेकर
वडील समीर आंबेकर
संगीत साधना
गुरू श्रुती आंबेकर
गायन प्रकार सुगम संगीत
संगीत कारकीर्द
पेशा पार्श्वगायन
कारकिर्दीचा काळ २००८ - व पुढे
गौरव
पुरस्कार बिग मराठी रायाजिंग स्टार ॲवॉर्ड
(इंग्लिश: Big Marathi Rising Star Award)


आर्या आंबेकर (जून १६, १९९४ - हयात) ही मराठी गायिका व अभिनेत्री आहे. झी मराठी वाहिनीच्या सारेगमप लिटिल चॅम्प्स या संगीत विषयक स्पर्धात्मक कार्यक्रमात ती एक स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती.[१]

ओळख[संपादन]

आर्याचा जन्म नागपूरमध्ये समीर आणि श्रुती आंबेकर या मराठी दांपत्याच्या घरी झाला. आर्याचे वडील समीर हे डॉक्टर असून आई श्रुती गायिका आहे. आर्या आपल्या आईकडून गायनाचे शिक्षण घेत आहे.

आर्याची आजीसुद्धा एक शास्त्रीय गायिका आहे. तिने आर्या जेमतेम २ वर्षाची असतानाच तिचे गायनातले कौशल्य ओळखले. आर्या साडेपाच वर्षाची असताना तिने आपल्या आईकडे शास्त्रीय गायनाचे धडे गिरवण्यास सुरुवात केली. वयाच्या सहाव्या वर्षी तिने संगीताची पहिली परीक्षा दिली.

तिसरीत असताना आर्याने आंतरशालेय गायनाच्या स्पर्धेत भाग घेतला आणि आपल्या शाळेला पहिले पारितोषिक मिळवून दिले. आर्याने आतापर्यंत अनेक मराठी / हिंदी भाषा अल्बम्स तसेच काही मराठी चित्रपटांसाठी व नाटकांसाठी गाणी गायली आहेत. गायनासोबतच आर्या अभिनेत्री म्हणून देखील लोकांसमोर आली, २०१७ च्या सुरवातीस प्रदर्शित झालेल्या 'ती सध्या काय करते' या चित्रपटातून तिने अभिनय कारकीर्दीस सुरवात केली. यामध्ये तिने गायलेले हृदयात वाजे समथिंग हे गाणे प्रसिद्ध आहे.

मराठी चित्रपटांत अभिनय[संपादन]

सांगीतिक कारकीर्द[संपादन]

सा रे ग म प लिटिल चॅम्प्स[संपादन]

सा रे ग म प लिटिल चॅम्प्स हा एक संगीत विषयक स्पर्धात्मक कार्यक्रम, झी मराठी या दूरदर्शन वाहिनीवर जुलै २००८ ते फेब्रुवारी २००९ या कालावधीत प्रसारित झाला. या कार्यक्रमासाठी वय वर्ष ८ ते १४ मधील मुलांच्या चाचण्या घेण्यात आल्या. आर्या सर्वोत्कृष्ट ५० स्पर्धकांमध्ये निवडली गेली, आणि सा रे ग म प लिटिल चॅम्प्स या कार्यक्रमाची एक स्पर्धक झाली.

आर्याने आपल्या सुमधुर आवाज आणि सांगीतिक कौशल्याच्या जोरावर अंतिम फेरीत व नंतर महाअंतिम फेरीत धडक मारली. अंतिम फेरीत १२ स्पर्धकांची निवड झाली तर महाअंतिम फेरीत ५ स्पर्धकांची निवड केली होती.

आर्याने या कार्यक्रमांमध्ये अनेक उत्तमोत्तम गाणी सादर केली. तिच्या पान खाये सैंया हमारो या गाण्याला परीक्षकांकडून वरचा नी पर्यंत (२०० %) गुण मिळाले. हा विक्रम सा रे ग म प च्या त्या आधीच्या ८ पर्वात अबाधित होता. हिंदी सिनेसृष्टीतील नामवंत गायक हरिहरन हे त्या भागाचे परीक्षक होते.

आर्याला अनेकदा परफॉर्मर ऑफ द वीक (Performer of the week) घोषित करण्यात आले.

आर्याला आवाजाची दैवी देणगी लाभली आहे. त्याला आपल्या रियाजाची जोड देत आर्याने संगीत क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे. संगीत क्षेत्रातील अनेक नामवंत कलाकारांनी आर्याच्या आवाजाची व तिच्या गान कौशल्याची भरभरून प्रशंसा केली आहे. शास्त्रीय संगीत असो वा नाट्यगीते, भावगीते असो वा भक्तिगीते, मराठी चित्रपट संगीत असो वा हिंदी गाणी, इतकेच नव्हे तर, लावणी, लोक-गीते या सर्व शैलीतील गाणी आर्या तितक्याच ताकदीने गाते.

आर्याला या कार्यक्रमादरम्यान माणिक वर्मा शिष्यवृत्ती देण्यात आली. ही शिष्यवृत्ती आर्याला दोन वर्षांसाठी प्रदान करण्यात आली होती.

गीतसंग्रह[संपादन]

 • गर्जती सह्याद्रीचे कडे
 • जय हरी विठ्ठल
 • मराठी अभिमानगीत संगीत दिग्दर्शक: कौशल इनामदार [२][३]
 • आठवा स्वर संगीत दिग्दर्शक: वर्ष भावे [४][५][६][७][८][९]
 • मला म्हणत्यात आर्या आंबेकर
 • खाऊचा गाव संगीत दिग्दर्शक: यशवंत देव[१०][११]
 • हम और तुम - हिंदी गाण्यांचा गीतसंग्रह, संगीत दिग्दर्शक: खलिल अभ्यंकर
 • आनंदवन आले घरी - बाबा आमटे
 • मझ्या मातीचे गान - कुसुमाग्रज प्रतिष्ठान
 • दिवा लागू दे रे देवा - पहिला सोलो अल्बम, संगीत दिग्दर्शक: सलील कुलकर्णी [१२]

मराठी चित्रपटांसाठी पार्श्वगायन[संपादन]

 • लेटस्‌ गो बॅक[१३]
 • बालगंधर्व[१४]
  • कळी या चित्रपटाच्या निमित्ताने श्रीनिवास खळे यांनी १५ वर्षांनी संगीत दिग्दर्शक म्हणून काम केले.[१५] याच चित्रपटासाठी पार्श्वगायन करणारी आर्या आंबेकर, श्रीनिवास खळे यांच्याकडे गाणारी शंभरावी गायिका ठरली.[१६]
 • रमा माधव - हमांमा रे पोरा या गाण्याची पार्श्वगायिका [१७] [१८]
 • योद्धा
 • संत कैकडी महाराज - संगीतकार: नरेंद्र भिडे
 • गोष्ट तिच्या प्रेमाची[१९]
 • रेडी मिक्स - संगीतकार: अविनाश विश्वजीत [२०]

पुरस्कार[संपादन]

 • २००८ - माणिक वर्मा शिष्यवृत्ती
 • २००९ - उप-विजेती, झी मराठी सा.रे.ग.म.प. लिटिल चॅम्प्स
 • २०१० - हरिभाऊ साने पुरस्कार [२१]
 • २०१० - पुण्यरत्न युवा गौरव पुरस्कार[२२] [२३][२४][२५]
 • २०११ - बिग मराठी रायाजिंग स्टार ॲवॉर्ड (संगीत)
 • २०१२ - यंग अचिवर्स ॲवॉर्ड - विसलींग वूड्स ईंटरनॅशनल [२६]
 • २०१२ - डॉ. वसंतराव देशपांडे पुरस्कार
 • २०१४ - आर्या पुरस्कार
 • २०१५ - डॉ. उषा (अत्रे) वाघ पुरस्कार[२७]

संदर्भ[संपादन]

 1. आय.बी.एन. लोकमत मधील बातमी
 2. मराठी अस्मिता
 3. अभिमानगीत - बातमी
 4. आठवा स्वर
 5. यूट्यूब वरची 'आठवा' स्वरची झलक
 6. यूट्यूब वरची 'स्टार माझा' वर कार्यक्रमाची माहिती
 7. आठवा स्वर, लोकसत्ता
 8. आठवा स्वर, सकाळ
 9. 'आठवा स्वर' ची संपूर्ण माहिती[मृत दुवा]
 10. सकाळ वृत्तपत्रात गीतसंग्रहाची माहिती
 11. ‘खाऊचा गाव’ अल्बमचे प्रकाशन
 12. दिवा लागू दे रे देवा गीतसंग्रहाची माहिती
 13. इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्रात प्रकाशनाची माहिती
 14. सारेगम संकेतस्थळावर गीतसंग्रहाची माहिती
 15. लोकसत्ता वरील कळी या चित्रपटाची बातमी
 16. महाराष्ट्र टाईम्स वरील माहिती
 17. रमा माधव म्युझिक लाँच.
 18. टाइम्स ऑफ इंडिया वृत्तपत्रातील रमा माधवच्या संगीताचे परिक्षण.
 19. गोष्ट तिच्या प्रेमाची बद्दल माहिती
 20. रेडी मिक्स चित्रपटाची माहिती
 21. हरिभाऊ साने पुरस्कार, सकाळ वृत्तपत्रातील बातमी
 22. पुण्यरत्न युवा गौरव पुरस्कार, लोकसत्ता वृत्तपत्रातील बातमी - १
 23. पुण्यरत्न युवा गौरव पुरस्कार, लोकसत्ता वृत्तपत्रातील बातमी - २
 24. पुण्यरत्न युवा गौरव पुरस्कार, सकाळ वृत्तपत्रातील बातमी
 25. पुण्यरत्न युवा गौरव पुरस्कार, ईंडीयन एक्सप्रेस वृत्तपत्रातील बातमी
 26. यंग अचिवर्स ॲवॉर्ड - सकाळ टईम्स मधील बातमी
 27. संगीत शिकण्यासाठी प्रत्येक क्षण शिष्य बनून राहावे.


[१]

 1. http://www.cinekatta.in/blogs/post/tisaaddhyakaikarte/