प्रत्येक केंद्रावर ९० जणींची प्राथमिक फेरीसाठी निवड करण्यात आली. त्या ९० जणींमध्ये स्पर्धा घेऊन विजेतीची पुढील फेरीसाठी निवड करण्यात येत असून तिचा १ लाख २५ हजार रुपयांची पैठणी देऊन सन्मान केला जात असे. अशा १० केंद्रांच्या विजेत्या १० जणींमध्ये अंतिम स्पर्धा होऊन जी महाविजेती ठरेल तिला ११ लाखांची पैठणी देऊन सन्मानित केला जाणार आहे.