स्वप्नील जोशी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
स्वप्नील जोशी
स्वप्नील जोशी
जन्म स्वप्नील जोशी
१८ ऑक्टोबर, इ.स. १९७७
मुंबई, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्व मराठी, भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषा मराठी
प्रमुख चित्रपट चेकमेट (चित्रपट), टार्गेट, मुंबई-पुणे-मुंबई
पत्नी अपर्णा
(इ.स. २००५ - इ.स. २००९ घटस्फोटित)
  • लीना

स्वप्नील जोशी (१८ ऑक्टोबर, इ.स. १९७७; मुंबई, महाराष्ट्र - हयात) हा मराठी चित्रपट-अभिनेता आहे. याने हिंदीमराठी चित्रपट व दूरचित्रवाणी मालिकांमधून अभिनय केला आहे. विनोदी अभिनेता म्हणून त्याची विशेष ख्याती आहे.

इ.स. १९९३ साली श्री कृष्ण या हिंदी भाषेतील पौराणिक मालिकेत कुमारवयातील कृष्णाची भूमिका साकारून त्याने अभिनयाची कारकीर्द आरंभली. चेकमेट या इ.स. २००८ सालातील मराठी चित्रपटाद्वारे त्याने चित्रपटमाध्यमात पहिल्यांदा प्रमुख भूमिका बजावली. 'टार्गेट' नावाच्या सिनेमातही त्याने काम केले आहे. 'मुंबई-पुणे-मुंबई' नंतर मुक्ता बर्वे बरोबर एका लग्नाची दुसरी गोष्ट नावाच्या अत्यंत लोकप्रिय मालिकेत त्याने 'घन:श्याम' उर्फ 'घना'ची भूमिका बजावली. दरम्यान 'मुक्ता बर्वे' (त्याच मालिकेत 'राधा' ची भूमिका करणारी प्रसिद्ध अभिनेत्री) बरोबर त्याची जोडी सर्वच प्रेक्षकांना आवडली. सध्याच्या (सुहास शिरवळकरांच्या कादंबरीवर आधारित) 'दुनियादारी' नावाच्या नुकत्याच काही दिवसांत प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटात त्याने 'श्रेयस तलवलकर' ची भूमिका केलेली आहे.'जिंदगी, जिंदगी' नावाचे गीत देखील गायले आहे.

वैयक्तिक जीवन[संपादन]

१८ ऑक्टोबर १९७७ रोजी मुंबईत त्यांचा जन्म झाला. त्यांनी आपले शिक्षण ब्य्राम्जी जीजीभोय या पारशी मनुष्य सेवाभावी संस्था मधून केले.आणि नंतर चे पूर्ण शिक्षण सिदेन्हाम कॉलेज, चर्चगेट वाणिज्य या विषयातून पूर्ण केले.स्वप्निल ने २००५ मध्ये एका दंतवैद्य (डेंटिस्ट) अपर्णा बरोबर लग्न केले. त्यांचा प्रेमविवाह होता पण २००९ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला.१६ डिसेंबर २०११ मध्ये औरंगाबादमधील ताज हॉटेल मध्ये लीना अराध्य बरोबर त्याचे लग्न झाले.ती सूद्धा व्यवसायाने दंतवैद्य (डेंटिस्ट) आहे.

कारकीर्द[संपादन]

वयाच्या नव्या वर्षी, स्वप्नील जोशी यांनी रामानंद सागर यांच्या काल्पनिक कार्यक्रम उत्तर रामायण यात तरुण कुश भूमिका साकारली ,तिथून त्यांनी त्यांची अभिनय कारकीर्द सुरू केली.

बाह्य दुवे[संपादन]Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

चित्रपट-कारकीर्द वर्ष (इ.स.) चित्रपट भाषा भूमिका टिप्पणी इ.स. २००५ पक् पक् पकाक मराठी इ.स. २००९ सुंबरान मराठी विरू हाय काय नाय काय मराठी सदाशिव ढापणे इ.स. २०११ गुलदस्ता मराठी शाळा मराठी नरूमामा इ.स. २०१२ मॅटर मराठी बाब्या तुकाराम मराठी तुकाराम कुटुंब मराठी नामदेव इ.स. २०१३ दुनियादारी मराठी इ.स. २०१४ प्रेमासाठी कॉमिन्ग सूऊन मराठी कोलते पाटील इ.स. २०१५ बाजी मराठी काकण मराठी इ.स. २०१६ पोश्टर गर्ल मराठी उप सरपंच (भारतराव झेंडे ) व्हेंटिलेटर मराठी प्रसन्न कामेरकर इ.स. २०१७ बघतोस काय मुजरा कर मराठी नानासाहेब देशमुख