सातव्या मुलीची सातवी मुलगी
Appearance
सातव्या मुलीची सातवी मुलगी | |
---|---|
दिग्दर्शक | जयंत पवार |
क्रियेटीव दिग्दर्शक | वैभव चिंचाळकर |
निर्माता | विद्याधर पाठारे |
निर्मिती संस्था | आयरिस प्रोडक्शन |
सूत्रधार | मनीष दळवी |
कलाकार | खाली पहा |
शीर्षकगीत | मंदार चोळकर |
अंतिम संगीत | संकेत पाटील |
संगीतकार | तुषार देवल |
देश | भारत |
भाषा | मराठी |
एपिसोड संख्या | ७४८ |
निर्मिती माहिती | |
कार्यकारी निर्माता | संदेश शाह |
संकलन | रुपेश सुर्वे |
कॅमेरा | सचिन पाटेकर |
प्रसारणाची वेळ | सोमवार ते शनिवार रात्री १०.३० वाजता |
प्रसारण माहिती | |
वाहिनी | झी मराठी |
प्रथम प्रसारण | १२ सप्टेंबर २०२२ – २१ डिसेंबर २०२४ |
अधिक माहिती |
सातव्या मुलीची सातवी मुलगी ही झी मराठीवर प्रसारित होणारी मालिका आहे. या मालिकेची मूळ कथा झी बांग्लावरील त्रिनयनी या बंगाली मालिकेवर आधारित आहे.
कलाकार
[संपादन]- अजिंक्य ननावरे - अद्वैत शेखर राजाध्यक्ष
- तितीक्षा तावडे - नेत्रा कुलकर्णी / नेत्रा अद्वैत राजाध्यक्ष
- ऐश्वर्या नारकर - रुपाली अनिल म्हात्रे / रुपाली शेखर राजाध्यक्ष / मैथिली सेनगुप्ता
- श्वेता मेहेंदळे - इंद्राणी पद्माकर राजाध्यक्ष
- राहुल मेहेंदळे - शेखर पद्माकर राजाध्यक्ष
- मुग्धा गोडबोले-रानडे - ममता शेखर राजाध्यक्ष
- विवेक जोशी - पद्माकर राजाध्यक्ष
- चैतन्य चंद्रात्रे - तरुण पद्माकर
- रजनी वेलणकर - पद्मजा पद्माकर राजाध्यक्ष (पद्मा)
- जान्हवी किल्लेकर - तरुण पद्मजा
- अभिजीत केळकर - केदार पद्माकर राजाध्यक्ष
- अमृता रावराणे - केतकी केदार राजाध्यक्ष
- अनिरुद्ध देवधर - तन्मय शेखर राजाध्यक्ष
- प्रशांत केणी - तेजस शेखर राजाध्यक्ष
- एकता डांगर - फाल्गुनी तेजस राजाध्यक्ष
- साक्षी परांजपे - मंगला कुलकर्णी
- प्रणिता आचरेकर - हेमा कुलकर्णी
- जयंत घाटे - भालचंद्र कुलकर्णी (भालबा)
- विनेश निन्नुरकर - तरुण भालबा
- सुरुची अडारकर - अस्तिका जठार
- अमृता बने - मनोरमा कुलकर्णी
- अजिंक्य जोशी - अधोक्षज (बंटी)
- किरण राजपूत - रेखा महाजन
- अश्विनी मुकादम - ललिता महाजन
- अतुल महाजन - प्रभाकर घैसास
- राजन ताम्हाणे - दिवाडकर
- सई कल्याणकर - मेघना
विशेष भाग
[संपादन]- जे घडणार आहे तेच ती बोलणार! (१२ सप्टेंबर २०२२)
- नेत्रा मैत्रिणीसाठी जीवाची बाजी लावणार. (१३ सप्टेंबर २०२२)
- गावकरी नेत्राला गावाबाहेर काढणार. (१६ सप्टेंबर २०२२)
- नेत्राचं घर तिच्यासाठी परकं होणार. (१९ सप्टेंबर २०२२)
- बेघर झालेल्या नेत्राला देवीआई मार्ग दाखवणार. (२३ सप्टेंबर २०२२)
- अनोळखी गावात नेत्राला मिळणार का मायेची सावली? (२६ सप्टेंबर २०२२)
- नेत्राला अपघाताचा संकेत दिसणार. (३० सप्टेंबर २०२२)
- नेत्रामुळे अद्वैतला जीवदान मिळेल का? (३ ऑक्टोबर २०२२)
- रुपालीचा खरा चेहरा ओळखू शकेल का नेत्रा? (५ ऑक्टोबर २०२२)
- रुपाली नेत्राला जीवघेण्या संकटात टाकणार. (७ ऑक्टोबर २०२२)
- नेत्राचं घरात असणं राजाध्यक्ष कुटुंबासाठी वरदान ठरणार. (९ ऑक्टोबर २०२२)
- आजी नेत्राला घराबाहेर काढायचा आग्रह धरणार. (११ ऑक्टोबर २०२२)
- नेत्राला घराबाहेर काढण्यासाठी रुपाली कंबर कसणार. (१३ ऑक्टोबर २०२२)
- नेत्रा तिच्या दिव्यशक्तीने रुपालीच्या भूतकाळातील घटना पाहणार. (१७ ऑक्टोबर २०२२)
- नेत्रा आणि रुपाली एकमेकींच्या भूतकाळात शिरणार. (१९ ऑक्टोबर २०२२)
- नेत्राला संकेतामध्ये दिसणार मृत्यूच्या सावलीत असणारा लहान मुलगा. (२० ऑक्टोबर २०२२)
- संकेतामध्ये दिसलेला लहान मुलगा कोण हे नेत्राला कळणार का? (२१ ऑक्टोबर २०२२)
- रुपाली अद्वैतला विश्वासात घेऊन नेत्राला घराबाहेर काढणार का? (२५ ऑक्टोबर २०२२)
- नेत्राला गच्चीवरून ढकलण्याचा प्रयत्न करणारी व्यक्ती नेमकी कोण? (२८ ऑक्टोबर २०२२)
- रुपालीचं सगळं कारस्थान नेत्रा उघडकीस आणणार का? (४ नोव्हेंबर २०२२)
- नेत्रा रुपालीच्या जाळ्यातून आजोबांना वाचवू शकेल का? (७ नोव्हेंबर २०२२)
- अद्वैत नेत्राकडे पाहत हरवून जाणार. (९ नोव्हेंबर २०२२)
- नेत्रावर खोटे आरोप लावले जाणार. (११ नोव्हेंबर २०२२)
- नेत्रा आणि अद्वैत कायमचे एकमेकांपासून दूर जाणार. (१५ नोव्हेंबर २०२२)
- नेत्रा आपल्या गावात परत येणार. (१७ नोव्हेंबर २०२२)
- अद्वैतपासून दूर असूनसुद्धा नेत्रा त्याचं रक्षण करणार. (१९ नोव्हेंबर २०२२)
- नेत्राची खरी ओळख राजाध्यक्ष कुटुंबाला कळणार. (२२ नोव्हेंबर २०२२)
- रुपालीच्या नाकावर टिच्चून नेत्रा परत येणार. (२७ नोव्हेंबर २०२२)
- नेत्राला पाहून रुपालीला ममताचा भास होणार. (२९ नोव्हेंबर २०२२)
- नेत्रा शेखरला रुपालीच्या कारस्थानाविषयी सांगणार. (२ डिसेंबर २०२२)
- नेत्रा रुपालीच्या विरोधात ठामपणे उभी राहणार. (५ डिसेंबर २०२२)
- रुपालीचं नेत्राच्या विरोधातील कारस्थान तिच्यावरच उलटणार. (७ डिसेंबर २०२२)
- रुपालीने शेखरला आपल्या जाळ्यात कसं ओढलं हे नेत्राला संकेतामध्ये दिसणार. (११ डिसेंबर २०२२)
- अद्वैत-नेत्राच्या नात्याची नव्या वर्षात नवी सुरुवात होणार. (१४ डिसेंबर २०२२)
- नेत्राला दिसणाऱ्या संकेतांना खोटं पाडण्यासाठी रुपाली नवी खेळी खेळणार. (१७ डिसेंबर २०२२)
- नेत्राला राजाध्यक्ष कुटुंबाशी असलेल्या नात्याचं रहस्य कळणार का? (२१ डिसेंबर २०२२)
- नेत्राला संकेत दिसतात हे अद्वैतला कळणार का? (२४ डिसेंबर २०२२)
- घरी परत आलेल्या नेत्राला पाहून रुपालीचा जळफळाट होणार. (२८ डिसेंबर २०२२)
- नेत्राला हरवण्यासाठी रुपाली त्रिनयना देवीच्या रहस्यापर्यंत पोहोचू शकेल का? (३१ डिसेंबर २०२२)
- त्रिनयना देवीच्या मंदिरातील कालपेटीत सापडलेल्या कालग्रंथात कोणतं रहस्य असेल? (४ जानेवारी २०२३)
- अद्वैत गावकऱ्यांच्या विरोधाला न जुमानता नेत्राला वावोशीमध्ये घेऊन येणार. (८ जानेवारी २०२३)
- नेत्रामुळे राजाध्यक्ष कुटुंबाला त्रिनयना देवीचं महात्म्य कळणार. (१० जानेवारी २०२३)
- ममता अद्वैतला काय सांगू पाहतेय, हे नेत्राला समजेल का? (१४ जानेवारी २०२३)
- कालग्रंथात लिहिलेलं रहस्य समजून घेण्यासाठी रुपाली कुणाची मदत घेणार? (१७ जानेवारी २०२३)
- ममताचं आईपण अनुभवणं अपुरं राहिल्याचं नेत्राला कळणार. (२० जानेवारी २०२३)
- एका खेळण्याशी जोडलेली अद्वैतची लहानपणीची आठवण नेत्राला समजणार. (२४ जानेवारी २०२३)
- ममताबद्दलचा अद्वैतचा राग घालवू शकेल का नेत्रा? (२६ जानेवारी २०२३)
- अद्वैतच्या मनातील ममताबद्दलचा गैरसमज दूर करण्यासाठी नेत्रा पुढाकार घेणार. (३० जानेवारी २०२३)
- नेत्राला संकेतामध्ये दिसलेल्या ओळीचा अर्थ कळेल का? (२ फेब्रुवारी २०२३)
- नेत्राचा देवीआईवरील विश्वास डगमगणार का? (६ फेब्रुवारी २०२३)
- नेत्रा अद्वैतकडे कोणतं वचन मागणार? (९ फेब्रुवारी २०२३)
- त्रिनयना देवीच्या रहस्याचं कोडं सोडवू शकेल का नेत्रा? (१२ फेब्रुवारी २०२३)
- रुपाली, अनिल आणि बंटीमध्ये ग्रंथ मिळवण्यासाठी चढाओढ लागणार. (१८ फेब्रुवारी २०२३)
- रुपालीला ममताच्या रूपात नेत्रा दिसणार. (२१ फेब्रुवारी २०२३)
- रुपालीमुळे अनिल जीवघेण्या संकटात ओढला जाणार. (२५ फेब्रुवारी २०२३)
- नेत्रा तेजसला रुपालीच्या विरोधात उभं करणार. (१ मार्च २०२३)
- अद्वैत-नेत्रा राजाध्यक्ष कुटुंबाला सावरण्यासाठी एकमेकांची साथ देणार. (८ मार्च २०२३)
- अनिलच्या मृत्यूमुळे रुपालीची सगळी कारस्थानं उघडकीस येणार. (१५ मार्च २०२३)
- रुपालीचं सत्य उघडकीस आणणं की अद्वैतसोबतचं नातं, नेत्रा कोणाची निवड करणार? (१७ मार्च २०२३)
- रुपालीमुळे अद्वैत आणि नेत्राच्या नात्यात दुरावा येणार का? (१९ मार्च २०२३)
- रागावलेल्या अद्वैतचा विश्वास जिंकू शकेल का नेत्रा? (२५ मार्च २०२३)
- शेखर रुपालीला घराबाहेर काढणार.
(१ एप्रिल २०२३) - त्रिनयना देवीचं वरदान असलेल्या नेत्रा आणि इंद्राणीची भेट होणार का?
(८ एप्रिल २०२३) - नेत्राला त्रिनयना देवीचं वरदान आहे हे कळल्यावर इंद्राणी कोणता निर्णय घेणार? (१६ एप्रिल २०२३)
- नेत्राला पहिल्यांदा पाहिल्यावर इंद्राणीला आश्चर्याचा धक्का बसणार. (२२ एप्रिल २०२३)
- नेत्राला असलेल्या वरदानाची इंद्राणीला भीती वाटणार.
(२९ एप्रिल २०२३) - इंद्राणीचा खोटेपणा नेत्राच्या नजरेत येणार का? (२ मे २०२३)
- इंद्राणी आणि रुपालीने रचलेलं कारस्थान नेत्रा उधळून लावणार का? (६ मे २०२३)
- इंद्राणीकडून त्रिनयना देवीचा ग्रंथ मिळवण्यात नेत्राला यश मिळणार का?
(१३ मे २०२३) - रुपाली आणि इंद्राणीची नवी खेळी ओळखू शकेल का नेत्रा? (२० मे २०२३)
- इंद्राणी आणि बंटीमामा गायब होण्यामागचं कारण नेत्राला कळेल का? (२७ मे २०२३)
- नेत्राला असलेलं वरदान पुन्हा तिच्यासाठी शाप ठरणार का? (३ जून २०२३)
- राजाध्यक्ष कुटुंबाला वाचवण्यासाठी नेत्राला कोणत्या अग्निदिव्यातून जावं लागणार? (१० जून २०२३)
- ग्रंथ शोधण्यासाठी नेत्रा कोणता मार्ग निवडणार? (१७ जून २०२३)
- आपल्या जीवाला धोका असल्याचं नेत्राला संकेतामध्ये दिसणार. (२५ जून २०२३)
- नेत्रा धोका पत्करून इंद्राणीच्या घरात शिरणार. (१ जुलै २०२३)
- अद्वैत नेत्राचं वागणं समजून घेऊ शकेल का? (११ जुलै २०२३)
- अद्वैतचं ऐकून नेत्रा खरंच वावोशीला निघून जाणार का? (१५ जुलै २०२३)
- नेत्रा ग्रंथ हवं असल्याचं खरं कारण अद्वैतला सांगेल का? (२४ जुलै २०२३)
- नेत्रा चलाखीने इंद्राणी आणि रुपालीचा डाव उधळून लावणार. (३० जुलै २०२३)
- त्रिनयना देवीच्या प्रकट दिनादिवशी वाईट घडू नये म्हणून भालबा नेत्राला सावध करतील का? (६ ऑगस्ट २०२३)
- अद्वैत आणि नेत्रा या दोन निर्मळ जिवांची ताटातूट होणार का? (१४ ऑगस्ट २०२३)
- अद्वैतमुळे नेत्राच्या जिवावरचं संकट टळणार. (२० ऑगस्ट २०२३)
- अद्वैत नेत्रासोबत राहता यावं म्हणून वर्क फ्रॉम होम करणार. (२६ ऑगस्ट २०२३)
- कुणीतरी ग्रंथ जमिनीत पुरत असल्याचा नेत्राला संकेत दिसणार. (२ सप्टेंबर २०२३)
- नेत्राच्या बाबतीत वाईट स्वप्न पडलं म्हणून अद्वैत अस्वस्थ होणार. (९ सप्टेंबर २०२३)
- अद्वैत नेत्राबरोबर वावोशीला जाण्यासाठी हट्ट धरणार. (१६ सप्टेंबर २०२३)
- अद्वैत-नेत्राचं काळजीतून फुलणारं नातं नवं वळण घेणार. (३० सप्टेंबर २०२३)
- अद्वैतबरोबर वावोशीला जाताना नेत्राला प्रेमाचा संकेत दिसणार. (४ ऑक्टोबर २०२३)
- अद्वैत आणि नेत्राच्या लग्नाविषयी शेखरच्या मनात विचारचक्र सुरू होणार. (७ ऑक्टोबर २०२३)
- अद्वैतला नेत्राविषयी वाटणाऱ्या आपुलकीचं प्रेमात रुपांतर होणार का? (१२ ऑक्टोबर २०२३)
- अद्वैत आणि नेत्राच्या लग्नाविषयी शेखर कोणता निर्णय घेणार? (१८ ऑक्टोबर २०२३)
- वेड लागलेला बंटी रुपालीवर हल्ला करणार. (२१ ऑक्टोबर २०२३)
- अद्वैतच्या सुखासाठी शेखरचं मत ऐकून नेत्रा विचारात गुरफटणार. (२६ ऑक्टोबर २०२३)
- शेखर आणि नेत्रा मिळून अद्वैतच्या सुखासाठी काय निर्णय घेणार? (३१ ऑक्टोबर २०२३)
- शेखर घरच्यांची सोबत घेऊन रुपालीचा डाव उधळून लावणार. (३ नोव्हेंबर २०२३)
- नेत्रा अद्वैतबद्दलच्या तिच्या भावना मनापासून व्यक्त करणार. (११ नोव्हेंबर २०२३)
- शेखर अद्वैत-नेत्राच्या सुखासाठी रुपालीचा डाव मोडून काढणार. (१४ नोव्हेंबर २०२३)
- अद्वैत नेत्रासमोर त्याच्या भावना व्यक्त करणार. (१८ नोव्हेंबर २०२३)
- नेत्राला दिसलेल्या प्रेमाच्या संकेताविषयी अद्वैतला कळणार का? (२६ नोव्हेंबर २०२३)
- अद्वैत-नेत्राच्या लग्नाच्या आनंदाला कुणाची दृष्ट लागणार? (२ डिसेंबर २०२३)
- शेखर अद्वैत-नेत्राच्या लग्नामागचं जीवघेणं सत्य नेत्राला सांगू शकेल का? (५ डिसेंबर २०२३)
- नेत्रा ममताच्या फोटोसमोर तिच्या भावना व्यक्त करणार. (९ डिसेंबर २०२३)
- नेत्राला दिसलेला प्रेमाचा संकेत खरा ठरणार आणि रुपाली ढसाढसा रडणार. (१२ डिसेंबर २०२३)
- शेखरला लग्नपत्रिका वाचताना पाहून अद्वैत-नेत्रा भावूक होणार. (१६ डिसेंबर २०२३)
- नेत्रासाठी भालबांनी पाहिलेलं स्वप्न शेखरला अस्वस्थ करणार. (१९ डिसेंबर २०२३)
- अद्वैत-नेत्राचं खास प्रिवेडिंग फोटोशूट होणार. (२४ डिसेंबर २०२३)
- शेखर नेत्राला लग्नाचं सत्य सांगू शकेल का? (२६ डिसेंबर २०२३)
- त्रिनयना देवी नेत्राच्या निर्धाराची परीक्षा घेणार. (३० डिसेंबर २०२३)
- नेत्राला अद्वैतवरील तिचं प्रेम व्यक्त करता येणार का? (२ जानेवारी २०२४)
- नेत्राचा त्याग पाहून शेखरला अश्रू अनावर होणार. (६ जानेवारी २०२४)
- अद्वैत-नेत्राचं लग्न होण्यासाठी राजाध्यक्ष कुटुंब एकत्र येईल का? (१३ जानेवारी २०२४)
- अद्वैत-नेत्राचं लग्न त्रिनयना देवीच्या मंदिरात होण्यासाठी मोहीम आखली जाणार. (१६ जानेवारी २०२४)
- अद्वैत-नेत्राच्या लग्नाविषयी वावोशीतील लोकांना कळू नये म्हणून काय करणार राजाध्यक्ष कुटुंब? (१८ जानेवारी २०२४)
- अद्वैत-नेत्राच्या लग्नाच्या दिवशी गावकऱ्यांना मंदिरात येण्यापासून रोखण्यासाठी काय करणार राजाध्यक्ष कुटुंब? (२१ जानेवारी २०२४)
- सुखी संसाराचं स्वप्न पाहणाऱ्या अद्वैतला पाहून नेत्रा भावूक होणार. (२३ जानेवारी २०२४)
- माझा अंत झाला तर तुमचाही अंत होईल, असं नेत्रा रुपालीला ठामपणे सांगणार. (२७ जानेवारी २०२४)
- नेत्राच्या हातावर अद्वैतच्या नावाची मेंदी लागणार, विघ्न येणार पण लग्न लागणार. (३१ जानेवारी २०२४)
- त्रिनयना देवीच्या अटी पूर्ण करून अद्वैत-नेत्रा मंदिरात पोहोचणार का? (२ फेब्रुवारी २०२४)
- नेत्रा त्रिनयना देवीआईला सौभाग्यासाठी साकडं घालणार. (६ फेब्रुवारी २०२४)
- अद्वैतचा मृत्यूयोग टळणार, पण नेत्राचा गृहप्रवेश सुरळीत पार पडेल का? (९ फेब्रुवारी २०२४)
- अद्वैत-नेत्राला आशीर्वाद देताना ममता काय बोलणार? (१६ फेब्रुवारी २०२४)
- लग्नानंतर नेत्राच्या जीवाला असलेला धोका टळणार का? (२० फेब्रुवारी २०२४)
- त्रिनयना देवीचं वरदान असल्याने विवाहयोग नसतो, याचा नेत्रावर कोणता परिणाम होईल? (२३ फेब्रुवारी २०२४)
- सत्यनारायण पूजेला असं काय घडणार की सारे आश्चर्यचकित होणार? (२५ फेब्रुवारी २०२४)
- नेत्राचा निर्धार पाहून इंद्राणीला आश्चर्य वाटणार. (२९ फेब्रुवारी २०२४)
- अद्वैत नेत्राला आयुष्यभर सोबत राहीन असं वचन देणार. (४ मार्च २०२४)
- आपल्या जिवावर संकट येईल अशी भीती नेत्राच्या मनातून जाईल का? (१० मार्च २०२४)
- नेत्राला तिचं आणि अद्वैतचं नातं तुटणार असा संकेत दिसणार. (२० मार्च २०२४)
- नेत्राचा जीव वाचवण्यासाठी अद्वैत काय करणार? (२७ मार्च २०२४)
- नेत्राला संकेतामध्ये ग्रंथ बाहेर काढणारी व्यक्ती दिसणार. (३ एप्रिल २०२४)
- त्रिनयना देवीच्या ग्रंथाचं सापडणं एका नव्या रहस्याला जन्म देणार. (९ एप्रिल २०२४)
- मनोरमाच्या रहस्याचं कोडं सोडवण्यासाठी नेत्रा आणि इंद्राणी एकत्र येतील का? (१३ एप्रिल २०२४)
- संकेतांमध्ये दिसलेल्या घटनांचं चक्रव्यूह कसं भेदणार नेत्रा? (१६ एप्रिल २०२४)
- इंद्राणीने गुन्हा कबूल केल्यावर काय करणार नेत्रा? (१९ एप्रिल २०२४)
- नेत्राचा मृत्यूयोग टाळण्याची जबाबदारी त्रिनयना देवी इंद्राणीला देणार. (२१ एप्रिल २०२४)
- नेत्राला जिवानिशी मारण्यासाठी रुपाली जबरदस्त खेळी खेळणार. (२३ एप्रिल २०२४)
- नेत्रा आणि इंद्राणी एकत्र येणार, पंचपीटिका रहस्याचा जन्म होणार. (२७ एप्रिल २०२४)
- इंद्राणी आणि नेत्रा मिळून त्रिनयना देवीचा ग्रंथ पुन्हा वाचणार. (४ मे २०२४)
- नेत्रा आणि इंद्राणीला कळू शकेल का पंचपीटिका रहस्याचं कोडं? (८ मे २०२४)
- नेत्रा-इंद्राणी पंचपीटिका रहस्याच्या शोधात वावोशीला जाणार. (११ मे २०२४)
- पंचपीटिका रहस्याचा शोध घेताना सापडलेली पहिली पेटी नेत्रा घरी घेऊन येणार. (१३ मे २०२४)
- पंचपीटिका रहस्यातील पहिल्या पेटीत कोणतं कोडं असेल? (१६ मे २०२४)
- पंचपीटिका रहस्यातील पहिल्या पेटीचं कोडं नेत्रा-इंद्राणी सोडवू शकतील का? (२३ मे २०२४)
- पंचपीटिका रहस्यात सापडलेली पहिली पेटी कुणाची हे नेत्रा-इंद्राणीला कळणार का? (८ जून २०२४)
- पंचपीटिका रहस्यातील पहिली पेटी चोरीला जाणार. (२२ जून २०२४)
- पंचपीटिका रहस्यातील दुसऱ्या पेटीची जागा नेत्राला संकेतामध्ये दिसणार. (२९ जून २०२४)
- दुसऱ्या पेटीचा शोध घेणं नेत्राच्या जीवावर बेतणार का? (१० जुलै २०२४)
- नेत्राच्या कामात अडथळा आणणाऱ्या रुपालीला त्रिनयना देवी शिक्षा करणार. (२४ जुलै २०२४)
- पंचपीटिका रहस्याच्या तिसऱ्या पेटीतील कोडं अद्वैत-नेत्राच्या नात्यात दुरावा निर्माण करेल का? (७ ऑगस्ट २०२४)
- अद्वैत विरोचक असल्याचा अद्वैत-नेत्राच्या नात्यावर काय परिणाम होईल? (१४ ऑगस्ट २०२४)
- रुपालीचा खोटेपणा अद्वैतला कळणार का? (१७ ऑगस्ट २०२४)
- रुपालीमधील विरोचकाशी सामना नेत्रा कसा करणार? (२० ऑगस्ट २०२४)
- रुपालीमधील विरोचकाला रोखण्यासाठी अद्वैत नेत्राची साथ देईल का? (२२ ऑगस्ट २०२४)
- अस्तिकाला नागरुपात आणण्यासाठी एक अनोखे महानाट्य घडणार. (२७ ऑगस्ट २०२४)
- विरोचकाची नवी खेळी ओळखू शकेल का नेत्रा? (१६ सप्टेंबर २०२४)
- आभाळाएवढ्या संकटातही नेत्राची त्रिनयना देवीवरील श्रद्धा पाहून रुपाली बिथरणार. (२७ सप्टेंबर २०२४)
- अद्वैत-नेत्राच्या आयुष्यात प्रेमाचे हळवे दिवस पुन्हा येतील का? (४ ऑक्टोबर २०२४)
- नेत्रा विरोचकाचा वध करणार. (८ ऑक्टोबर २०२४)
- रुपालीला आरशावर लिहिलेल्या संदेशाचा अर्थ कळणार का? (२१ ऑक्टोबर २०२४)
- रुपालीला दक्षिण दिशेला कोण बोलावतंय हे नेत्राला कळेल का? (२ नोव्हेंबर २०२४)
- अद्वैत आणि तेजस पाठलाग करत असताना रुपाली एका ठिकाणी जाऊन गायब होणार. (६ नोव्हेंबर २०२४)
- विरोचक अधिक शक्तिशाली होऊन येईल हा नेत्राचा अंदाज खरा ठरेल का? (१३ नोव्हेंबर २०२४)
- विरोचकाच्या वशीकरण शक्तीने नेत्राचा संभ्रम वाढणार. (२६ नोव्हेंबर २०२४)
- रुपाली वशीकरण शक्तीने करणार नेत्राला आव्हान. (२१ डिसेंबर २०२४)
पुनर्निर्मिती
[संपादन]भाषा | नाव | वाहिनी | प्रकाशित |
---|---|---|---|
बंगाली | त्रिनयनी | झी बांग्ला | ४ मार्च २०१९ - २६ जुलै २०२० |
उडिया | दिब्यदृष्टी | झी सार्थक | ६ जानेवारी २०२० - १६ जुलै २०२२ |
तेलुगू | त्रिनयनी | झी तेलुगू | २ मार्च २०२० - चालू |
पंजाबी | नयन - जो वेखे अनवेखा | झी पंजाबी | ३ जानेवारी २०२२ - २३ मार्च २०२४ |
तमिळ | मारी | झी तमिळ | ४ जुलै २०२२ - चालू |
मल्याळम | पार्वती | झी केरळम | १२ जून २०२३ - ३० सप्टेंबर २०२४ |
बाह्य दुवे
[संपादन]रात्री १०.३०च्या मालिका |
---|
शुभं करोति | गुंतता हृदय हे | आभास हा | दिल दोस्ती दुनियादारी | रात्रीस खेळ चाले | १०० डेझ | दिल दोस्ती दोबारा | जागो मोहन प्यारे | ग्रहण | नाममात्र | बाजी | रात्रीस खेळ चाले २ | देवमाणूस | ती परत आलीये | देवमाणूस २ | सातव्या मुलीची सातवी मुलगी | तुला शिकवीन चांगलाच धडा |