वैदेही परशुरामी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
VAIDEHI PARASHURAMI.jpg

वैदेही वैभव परशुरामी (English: Vaidehi Parshurami) (जन्म : मुंबई, १ फेब्रुवारी १९९२) ही एक मराठी चित्रपट अभिनेत्री आहे.

'वेड लावी जीवा' या मराठी चित्रपटातून वैदेहीने चित्रसृष्टीत पदार्पण केले. तिने वजीर आणि सिम्बा हे दोन बॉलिवूड चित्रपट केले आहेत. ती कथ्थक नृत्यपारंगत असून ती पंडित बिरजू महाराजांसमवेतही काही क्षण नाचली आहे. अभिजित देशपांडे यांच्या 'आणि... डाॅ. काशिनाथ घाणेकर' या मराठी चित्रपटातील तिच्या अभिनयाने तिला लोकप्रियता मिळाली. समीक्षकांनी आणि प्रेक्षकांनी तिच्या अभिनयाचे खूप कौतुक केले. त्यावर्षीच्या तिच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल तिला अनेक पुरस्कार मिळाले.