आभाळमाया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

आभाळमाया ही पहिली मराठी मालिका होती. ती अल्फा मराठी (सध्या झी मराठी) दूरचित्रवाणीवरून प्रसारित झाली होती.

या मालिकेचे शीर्षकगीत[संपादन]

उडतो तो जीव लागते ती आस
बुडतो तो सूर्य उरे तो आभास,
कळे तोच अर्थ उडे तोच रंग,
ढळतो तो अश्रू सुटतो तो संग,
दाटते ती माया सरे तोच काळ,
ज्याला नाही ठाव ते तर आभाळ,
घननिळा डोह पोटी गूढमाया,
आभाळमाया.....

कवी - मंगेश कुळकर्णी, गायिका - देवकी पंडित, संगीत दिग्दर्शक - अशोक पत्की

खासगी मनोरंजन वाहिन्यांवरील आजच्या लोकप्रिय शीर्षक गीतांचा पाया ‘आभाळमाया’च्या या गीताने घातला असे म्हटले जाते.