होम मिनिस्टर (मालिका)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
होम मिनिस्टर
दिग्दर्शक निखिल शिगवण
निर्माता निलेश मयेकर
सूत्रधार आदेश बांदेकर, जितेंद्र जोशी, निलेश साबळे
देश भारत
भाषा मराठी
वर्ष संख्या १६
निर्मिती माहिती
चालण्याचा वेळ सोमवार ते शनिवार संध्या. ६.०० वाजता
प्रसारण माहिती
वाहिनी झी मराठी
पहिला भाग * १३ सप्टेंबर २००४ ते ०१ मे २०१०
 • १४ जानेवारी २०११ ते २१ मार्च २०२०
प्रथम प्रसारण ०८ जून २०२० –
अधिक माहिती
आधी वेध भविष्याचा
नंतर घेतला वसा टाकू नको

होम मिनिस्टर हा झी मराठी या वाहिनीवरील एक कार्यक्रम आहे. ह्या रिऍलिटी शोमध्ये पूर्वी आदेश बांदेकर प्रत्येक एपिसोडमध्ये वेगवेगळ्या स्पर्धा घेऊन यायचे. ह्या स्पर्धा २ वहिनींमध्ये असायच्या. प्रत्येक एपिसोडमध्ये जिंकणाऱ्या वहिनींना एक पैठणी देण्यात येत असे. लॉकडाऊन दरम्यान घरच्या घरी या विशेष पर्वामध्ये व्हिडीओ कॉलद्वारे कार्यक्रमाचं शूटिंग सुरु करण्यात आलं होतं.[१] होम मिनिस्टर आयएमडीबीवर

नवे पर्व[संपादन]

 1. नववधू नं.१ (१४ सप्टेंबर २००९)
 2. जाऊबाई जोरात (१४ जानेवारी २०११)
 3. स्वप्न गृहलक्ष्मीचं (१६ मे २०११)
 4. मानाची पैठणी (२१ मे २०१२)
 5. होणार सून मी ह्या घरची (३१ मार्च २०१४)
 6. गोवा स्पेशल (२५ एप्रिल २०१६)
 7. काहे दिया परदेस (१५ मे २०१६)
 8. चूकभूल द्यावी घ्यावी (१३ फेब्रुवारी २०१७)
 9. लागिरं झालं जी (०१ मे २०१७)
 10. अग्गंबाई सासूबाई (१९ ऑगस्ट २०१९)
 11. भारत दौरा (०१ जानेवारी २०२०)
 12. घरच्या घरी (०८ जून २०२०)
 13. कोव्हिड योद्धा विशेष (२७ जुलै २०२०)
 14. माझा बबड्या (०७ सप्टेंबर २०२०)
 15. सासूबाई माझ्या लयभारी (१२ ऑक्टोबर २०२०)
 16. पैठणी माहेरच्या अंगणी (०४ जानेवारी २०२१)
 17. लिटील चॅम्प्स (२६ जुलै २०२१)

इतर पर्वे[संपादन]

 1. महाराष्ट्राची महामिनिस्टर
 2. दिल्या घरी तू सुखी रहा
 3. उत्सव नात्यांचा, मैत्रीचा आणि आपल्या माणसांचा
 4. नांदा सौख्य भरे
 5. पंढरीची वारी विशेष (दरवर्षी जुलै महिन्यात)

नवीन वेळ[संपादन]

क्र. दिनांक वार वेळ
१३ सप्टेंबर २००४ - १९ मे २००६ सोम-शुक्र संध्या. ७.३०
२२ मे २००६ - २९ जून २००७ संध्या. ६.३०
०२ जुलै २००७ - २५ जुलै २००९ सोम-शनि
२७ जुलै - १२ सप्टेंबर २००९ संध्या. ६
१४ सप्टेंबर २००९ - ०१ मे २०१० संध्या. ६.३०
१४ जानेवारी - १४ मे २०११ संध्या. ६
१६ मे २०११ - १९ ऑक्टोबर २०१९ सोम-शनि (कधीतरी रवि) संध्या. ६.३०
२१ ऑक्टोबर २०१९ - २१ मार्च २०२० संध्या. ६
०८ जून - ३१ ऑक्टोबर २०२० संध्या. ६.३०
१० ०२ नोव्हेंबर २०२० - २४ एप्रिल २०२१ संध्या. ६
११ २७ एप्रिल - १५ मे २०२१ संध्या. ७
१२ १७ मे - १४ ऑगस्ट २०२१ संध्या. ६.३०
१३ १६ ऑगस्ट २०२१ - चालू संध्या. ६

विशेष भाग[संपादन]

 1. पैठणीच्या खेळासाठी जुई आणि मल्लिकामध्ये रंगणार जुगलबंदी. (१७ सप्टेंबर २०१७)
 2. कोण ठरणार महाराष्ट्राची सुपरवहिनी? (२६ नोव्हेंबर २०१७)
 3. सावित्रीला भावोजींचा सलाम. (०२ सप्टेंबर २०१८)
 4. विनोदाचा डॉक्टर अवतरणार होम मिनिस्टरच्या मंचावर. (२१ ऑक्टोबर २०१८)
 5. अभिमान स्त्रियांचा, सन्मान पहिल्या महिला डॉक्टरच्या संघर्षाचा. (१० फेब्रुवारी २०१९)
 6. भावोजींकडे आली तक्रार वहिनींची, मिस्टरांचा गळा दाबण्याची. (०१ जुलै २०१९)
 7. माऊलींची ओढ लागता, भावोजी निघाले वारीला. (०५ जुलै २०१९)
 8. वारीची वाट चालता, भावोजी आले पंढरपूरला. (१२ जुलै २०१९)
 9. शहीद मेजर कौस्तुभ राणेंच्या शौर्याने प्रेरित त्यांच्या वीरपत्नीच्या जिद्दीची कहाणी. (१५ ऑगस्ट २०१९)
 10. आता एकटी नाही खेळणार सूनबाई, स्पर्धक बनून समोर उभ्या राहणार सासूबाई. (१९ ऑगस्ट २०१९)
 11. आता पैठणीचा खेळ रंगणार स्वतः आदेश भावोजींच्या घरी. (१३ सप्टेंबर २०१९)
 12. लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने भावोजी उलगडणार आसावरी-अभिजीतची गोष्ट. (२७ ऑक्टोबर २०१९)
 13. घेऊन येतोय महाराष्ट्राची लाडकी पैठणी संपूर्ण भारतातल्या वहिनींसाठी. (०१ जानेवारी २०२०)
 14. होम मिनिस्टरची स्वारी पोहोचणार आता नवी दिल्ली, बंगळूर, अहमदाबाद, इंदूर, गोवा, जयपूर, हैदराबाद, वाराणसी, कोलकाता, चंदीगढ आणि चेन्नईमध्ये. (०४ जानेवारी २०२०)
 15. वहिनी म्हणे मिस्टरांना, माझा होशील ना. (०८ जून २०२०)
 16. इतके दिवस काढत होतात ना भावोजींच्या आठवणी, म्हणूनच ते येत आहेत घेऊन ऑनलाईन पैठणी. (२२ जून २०२०)
 17. प्रत्यक्षात ज्यांनी केले संकटांशी दोन हात, अशाच कोव्हिड योद्धांचा भावोजी करणार सन्मान. (२७ जुलै २०२०)
 18. सासू आणि सून आता पैठणीसाठी भिडणार, पण ह्यात मात्र त्यांचा बबड्या अडकणार. (०७ सप्टेंबर २०२०)
 19. पैठणी कोणाला मिळणार हा प्रश्न सगळ्यांना पडला, भावोजींना उत्तर देताना बबड्या अडचणीत सापडला. (१४ सप्टेंबर २०२०)
 20. बबड्या कोणाचा हा प्रश्न सासू-सुनेला पडलाय, पण बबड्या मात्र लांबच ऐकत बसलाय. (२१ सप्टेंबर २०२०)
 21. बबड्या आहे फारच हट्टी, त्यामुळे सासू-सुनेची होईल का गट्टी? (२८ सप्टेंबर २०२०)
 22. आता रंगतील माहेरच्या आठवणी, कारण पैठणीचा डाव रंगणार माहेरच्या अंगणी. (०४ जानेवारी २०२१)
 23. मी येतोय तुमच्या माहेरच्या अंगणी, पण वहिनी तुमची आहे का तयारी? (०७ फेब्रुवारी २०२१)
 24. प्रत्येक कुटुंबासाठी इम्युनिटी बूस्टर, होम मिनिस्टर. (२६ एप्रिल २०२१)
 25. माऊलीच्या भक्तीची ओढच न्यारी, कार्तिकीच्या संगे अनुभवू पंढरीची वारी‌. (१८ जुलै २०२१)
 26. मिस्टरांची सोशल भटकंती, वहिनींना मिळेल का शांती? (२१ जुलै २०२१)
 27. आता आली घरच्या लिटील चॅम्प्सची पाळी, मोठ्यांची झाली अळीमिळी गुपचिळी. (२३ जुलै २०२१)
 28. घरचे लिटील चॅम्प्स ठरवणार पैठणीची मानकरी, नवे पर्व लिटील चॅम्प्ससंगे. (२६ जुलै २०२१)
 29. घरच्या लिटील चॅम्पने शोधली नाण्याची तिसरी बाजू. (२८ जुलै २०२१)
 30. आईचा मार चुकवतो, हा लिटील चॅम्प शाळेतच का रमतो? (३० जुलै २०२१)
 31. रात्री दोन वाजता ते घरात आले आणि भांडी बाहेर, असं का झालं? (०२ ऑगस्ट २०२१)
 32. लिटील चॅम्प्सच्या खेळात पाटील कुटुंबाची नाती रंगणार, जाऊ की नणंद कोण सरस ठरणार? (०४ ऑगस्ट २०२१)
 33. जेव्हा वहिनींनी मिस्टरांना गात विचारलं 'माझा होशील ना', तेव्हा सुरु झाली सुरेल लव्हस्टोरी. (०६ ऑगस्ट २०२१)
 34. वहिनींना पैठणी द्यायला आणि लिटील चॅम्प्सबरोबर मस्ती करायला आता भावोजी येणार नवीन वेळेत. (१६ ऑगस्ट २०२१)
 35. सिमकार्ड प्रेमकथा. (२३ ऑगस्ट २०२१)
 36. जाऊबाई, मिस्टर आणि वहिनी तिघेही घसरून कसे काय पडले? (२५ ऑगस्ट २०२१)
 37. पानाच्या गादीवर पानाबरोबर कशी रंगली लव्हस्टोरी? (२७ ऑगस्ट २०२१)
 38. सर्वात वरच्या थरावर चढून विक्रम रचणाऱ्या या लिटील चॅम्पला का म्हणतात सोळा पाव? (३० ऑगस्ट २०२१)
 39. सासरेबुवा असं काय म्हणाले ज्यामुळे वहिनींच्या डोळ्यात अश्रू दाटून आले? (०१ सप्टेंबर २०२१)
 40. मिस्टरांनी काढला ठाणे-पुणे रेल्वेपास, प्रेमाचा प्रवास की प्रवासावर प्रेम? (०३ सप्टेंबर २०२१)
 41. नऊवारी धुवायला कंटाळलेल्या सुनांना काय म्हणाल्या सासूबाई? (०६ सप्टेंबर २०२१)
 42. लिटील चॅम्प्स रिपोर्टर होणार, मोठ्यांच्या ब्रेकिंग न्यूज भावोजींना सांगणार. (०८ सप्टेंबर २०२१)
 43. लिटील चॅम्प्स साजरा करणार गणेशोत्सव भावोजींसोबत. (१० सप्टेंबर २०२१)

संदर्भ[संपादन]

 1. ^ "आदेश बांदेकर - आता झी मराठी देणार ऑनलाईन पैठणी - मनोरंजन - हेडलाईन मराठी".

बाह्य दुवे[संपादन]