विक्रांत सरंजामे (सुबोध भावे) एक श्रीमंत व्यापारी असतो जो एक विधुर असतो आणि त्याच्या विधवा आई स्नेहलता सरंजामे ऊर्फ आईसाहेब (विद्या करंजीकर) आणि छोटा भाऊ जयदीप सरंजामे (आशुतोष गोखले) बरोबर कर्जत, महाराष्ट्र मध्ये राहतो. तो एकदा ईशा निमकरला (गायत्री दातार) एका रिक्षात भेटतो जी एक गरीब चाळीत राहणारी बाई असते. तो तिच्या प्रेमात पडतो आणि तिला त्याची कर्मचारी म्हणुन त्याच्या कंपनीमध्ये नोकरीवर ठेवतो. दरम्यान, विक्रांतचा ऑफिसमधला सहाय्यक आणि मित्र विलास झेंडे त्याला ईशापासून वेगळा करायचा प्रयत्न करतो. तथापि, विक्रांत आणि ईशा सगळ्यांना पटवण्यात यशस्वी होतात आणि खुप मोठं लग्न करतात. त्यांच्या लग्नानंतर लवकरच गोष्टी अनअपेक्षितपणे बदलायला सुरू होतात. विक्रांत आणि झेंडेची एक काळी बाजू दाखवली जाते. असं अचानकपणे प्रकट होतं की विक्रांतनी ईशाची तिचा वापर करून सरंजामेंची मालमत्ता मिळवण्यासाठी लग्न केलं कारण त्याच्या स्वर्गीय बाबा दादासाहेब सरंजामे ह्यांनी त्यांच्या विल मध्ये एक असा क्लॉस टाकला होता की त्याची प्रथम-बायको राजनंदिनी सरंजामे ही मालमत्तेची खरी मालकीण आहे. तथापि, ईशाला हे कळून धक्का बसतो की विक्रांतचं खरं नाव आहे "गजेंद्र पाटील" आणि तो सरंजामेंच्या कंपनीमध्ये फसवणूक करतोय. तिला हे सुद्धा कळतं की राजनंदिनी ही आईसाहेबांची मुलगी आणि जयदीपची बहीण होती. फार त्रासलेली ईशा मग विक्रांतला त्याच्या सत्याबद्दल एका हॉटेलमध्ये ओरडते आणि निघून जाते. विक्रांत तिचा विश्वास परत मिळवण्यासाठी तिला भूतकाळातली एक खोटी गोष्ट सांगतो. पुढे, तो ईशाला सरंजामे घरातल्या एका बंद खोलीत घेऊन जातो जिथे राजनंदिनीचे कपडे, बूट, दागिने, पिशव्या वगैरे त्यानी सुरक्षितपणे ठेवले असतात. तथापि, ईशा राजनंदिनीचा फोटो बघुन बेशुद्ध पडते आणि तिला राजनंदिनीचं आयुष्य स्वप्नात दिसतं जे एका फ्लॅशबॅक मध्ये दाखवलं जातं: मध्यमवयीन राजनंदिनी सरंजामे (शिल्पा तुळसकर) तिची आई आईसाहेब आणि बाबा दादासाहेब सरंजामे (अनिल खोपकर) ह्यांच्या बरोबर कर्जत मध्ये राहत होती. एकदा तिच्या गाडीचा टायर पंक्चर झालेला ज्यामुळे तिला एका रिक्षानी जावं लागलं ज्यात आधीच एक मुलगा बसलेला. तो मुलगा होता गजेंद्र पाटील जो एक गरीब शिक्षित पण बेरोजगार अनाथ होता आणि त्याचा रूममेट विलास झेंडे बरोबर एका चाळीत राहत होता. गजेंद्र आणि राजनंदिनी एकमेकांच्या प्रेमात पडलेले आणि ते त्यांनी कबुल केलं. गजेंद्रनी सरंजामेंची मालमत्ता मिळवण्यासाठी राजनंदिनीशी लग्न केलेलं. त्यानी त्याचं नाव पण बदलून "विक्रांत सरंजामे" ठेवलं. दादासाहेबांना त्याच्या विरुद्ध सगळे पुरावे मिळाले आणि त्यांनी त्याच्या अपमान केला. त्यांच्या सूद घेण्यासाठी विक्रांतनी त्यांना चुकीचं औषध घ्यायला लावली ज्यामुळे दादासाहेबांचा मृत्यू झाला. राजनंदिनीला त्याच्यावर संशय आला आणि तिनी त्याच्या ऑफिस कॅबिनमध्ये एक मायक्रोफोन लावला ज्यात विक्रांतचा आणि झेंडेचा डाव रेकॉर्ड झाला. हा पुरावा मिळवल्यावर, राजनंदिनीनी विक्रांतला आणि झेंडेला पोलिसात द्यायची धमकी दिली. तथापि, त्याला हे करायचं नव्हतं तरीही विक्रांतनी तिला गच्चीवरून ढकलून दिलं, ज्यामुळे राजनंदिनीचा मृत्यू झाला. वर्तमान-काळात, ईशाला हे स्वप्न बघुन हे सुद्धा कळतं की ती खरच राजनंदिनीचा "पुनर्जन्म" आहे. ईशा मग विक्रांत कडून बदला घ्यायचा ठरवते. झेंडेला तिच्यावर संशय येतो आणि तो विक्रांतला तिचा डाव सांगायचा प्रयत्न करतो. विक्रांत त्याच्यावर विश्वास ठेवत नाही आणि त्याला मारून टाकतो. शेवटी, ईशा विक्रांतला ब्रेनवॉश करते आणि त्याला आईसाहेब, जयदीप, सर्जेराव आणि दुसऱ्यांसमोर सत्य कबुली करायला लावते. विक्रांत मग ईशाला तिच्याशी बोलण्यासाठी गच्चीवर बोलावतो. आधी आईसाहेबांना असं वाटतं की विक्रांत ईशाला गच्चीवरून ढकलून देईल, जसं त्यानी राजनंदिनीला मारून टाकलं. गच्चीवर, विक्रांत त्याचं ईशावरचं प्रेम कबुल करतो. तथापि, तो शेवटी धक्कादायकपणे गच्चीवरून उडी मारून आत्महत्या करतो, कारण त्याला त्याच्या अपराधा बरोबर करार करता येत नाही. ईशा सुद्धा सरंजामे घर सोडते, असं सांगून की तिला "ईशा निमकर" म्हणुनच जगायचं आहे. काही महिन्यांनंतर, निमकरांचा नवीन खानपान व्यवसाय दाखवला जातो. ही मालिका सगळ्या पत्रांची खरी नावं प्रेक्षकांना दाखवण्यात संपते.