वेध भविष्याचा
Appearance
वेध भविष्याचा | |
---|---|
सूत्रधार | पंडित अतुलशास्त्री भगरे गुरूजी |
देश | भारत |
भाषा | मराठी |
निर्मिती माहिती | |
प्रसारणाची वेळ | * दररोज सकाळी ८ वाजता
|
प्रसारण माहिती | |
वाहिनी | झी मराठी |
प्रथम प्रसारण | ८ जून २०२० – चालू |
वेध भविष्याचा कार्यक्रमात ज्योतिषशास्त्राच्या आधारे सर्व राशींचे भविष्य सांगितले जाते. तसेच या कार्यक्रमात भागवतकथा पुराण, भगवद्गीता, रामायण, महाभारत यांच्यातील मजकूर देखील सांगितला जातो. प्रत्येक कार्यक्रमाच्या सुरुवातीला रोज एक श्लोक म्हणून त्याचा अर्थ आणि त्यानंतर दिनविशेष सांगितला जातो.
विशेष भाग
[संपादन]- दूर होतील मनातल्या साऱ्या व्यथा, सादर होत आहे श्रीमद् भागवतकथा. (८ जून २०२०)
- अश्वत्थामा निघालाय झोपलेल्या पांडवांचा वध करायला, आता पुढे काय? (२५ जून २०२०)
- खाल्लेल्या अन्नाप्रमाणे आपली वृत्ती तयार होते का? (२६ जून २०२०)
- अर्जुन आणि दुर्योधनाला प्रभूंनी विचारला प्रश्न, निःशस्त्र कृष्ण हवा की शस्त्रधारी सेना? (३ जुलै २०२०)
- भीष्मांनी प्रतिज्ञा घेतली रोज एक पांडव मारणार, द्रौपदी पांडवांना वाचवू शकेल का? (४ जुलै २०२०)
- पापाचं साम्राज्य वाढवणाऱ्या कलियुगाची सुरुवात केव्हा झाली? (५ जुलै २०२०)
- पांडवांच्या शेवटच्या राजाने का घातला समाधिस्त साधूंच्या गळ्यात मेलेला सर्प? (६ जुलै २०२०)
- सात दिवसांनी मृत्यू अटळ आहे, कोण वाचवेल पांडवांच्या शेवटच्या राजाला? (७ जुलै २०२०)
- भूलोकातील मोठ्या यज्ञात महादेवांना स्थान न देणाऱ्या पित्याला सतीने दिलं चोख प्रत्युत्तर. (२७ जुलै २०२०)
- लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी घरात काय काळजी घ्याल? (२१ ऑगस्ट २०२०)
- लॉकडाऊनमध्ये गणेश पूजा कोण सांगणार? काळजी नको! भगरे गुरुजी सांगणार गणेश प्रतिष्ठापना पूजा. (२२ ऑगस्ट २०२०)
- सुरू ठेवूयात भक्तीची गाथा, श्रवण करुयात गणेश अवतारांची कथा. (२३ ऑगस्ट २०२०)
- मधासुराला मारण्यासाठी प्रकट झाला गणेशाचा एकदंत अवतार. (२४ ऑगस्ट २०२०)
- मत्सासुराने केला हाहाकार, प्रकट झालाय वक्रतुंड अवतार. (२५ ऑगस्ट २०२०)
- विश्वामित्रांनी दशरथ राजाकडे मागितला त्यांचा प्रिय राम, काय असेल उत्तर? (२४ सप्टेंबर २०२०)
- राक्षसांच्या संहारासाठी सज्ज झाले रामचंद्रांचे धनुष्य. (२५ सप्टेंबर २०२०)
- आकाशाशी जडले नाते धरणी मातेचे, स्वयंवर झाले सीतेचे. (२६ सप्टेंबर २०२०)
- शिवधनुष्य तोडणाऱ्या श्रीरामचंद्रांवर परशुराम का रागावले? (२७ सप्टेंबर २०२०)
- अलक्ष्मीला दूर ठेवून घरात कसा होईल लक्ष्मीचा प्रवेश? (१४ नोव्हेंबर २०२०)
- माता सीतेने दिली अग्निपरीक्षा. (१५ नोव्हेंबर २०२०)
- काय आहे बलिप्रतिपदेचं महत्त्व? (१६ नोव्हेंबर २०२०)
- पुतनाला पाहिल्यावर प्रभूंनी डोळे का मिटले? (१४ डिसेंबर २०२०)
- संपन्न होतोय युधिष्ठिराचा महायज्ञ. (२३ एप्रिल २०२१)
- युधिष्ठिराच्या महायज्ञात प्रभूंनी कोणती भूमिका स्वीकारली? (२४ एप्रिल २०२१)
- शिशुपालाच्या वधानंतर द्वारकेवर आक्रमण होणार का? (२५ एप्रिल २०२१)
- सत्यभामेने द्रौपदीला कोणता प्रश्न विचारला? (१४ मे २०२१)
- संतांनी प्रभू श्रीकृष्णाची कशी केली स्तुती? (१५ मे २०२१)
- कोणकोणत्या महिन्यात काय वर्ज्य करावे? (१ ऑगस्ट २०२१)
- कथा राजा हरिश्चंद्राची. (२ ऑगस्ट २०२१)
- राजा युधिष्ठिराला प्रभूंनी सांगितले एकादशीचे माहात्म्य. (३ ऑगस्ट २०२१)
- आषाढ कृष्ण पक्षातील एकादशीचे माहात्म्य. (४ ऑगस्ट २०२१)
- वामन एकादशीचे माहात्म्य. (५ ऑगस्ट २०२१)
- श्रावण शुद्ध एकादशीला पुत्रदा एकादशी का म्हणतात? (१८ ऑगस्ट २०२१)
- भगरे गुरुजींच्या गणेशकथा ऐकायला येणार महाराष्ट्राचे सुपरस्टार. (१० सप्टेंबर २०२१)
- गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर घेऊया वेध भविष्याचा नवीन वेळेत. (३० मार्च २०२५)