चला हवा येऊ द्या

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
चला हवा येऊ द्या
दिग्दर्शक निलेश साबळे
कलाकार भारत गणेशपुरे
सागर कारंडे
भालचंद्र कदम
कुशल बद्रिके
अंकुर वाढवे
श्रेया बुगडे
योगेश शिरसाट
देश भारत
भाषा मराठी
एपिसोड संख्या 400
प्रसारण माहिती
वाहिनी झी मराठी

चला हवा येऊ द्या ही नितिन केणी निर्मित बहुचर्चित मराठी दूरचित्रवाणी विनोदि मालिका सध्या झी मराठी ह्या वाहिनीवर दर सोमवारी व मंगळवारी रात्री ९:३० वाजता प्रक्षेपित केली जाते. या मालिकेचे दिग्दर्शन आणि निवेदन डॉक्टर निलेश साबळे करतात. ह्या तुफान विनोदी मालिकेत प्रमुख भूमिकेत भालचंद्र कदम, कुशल बद्रिके, सागर कारंडे, भारत गणेशपुरे आणि श्रेया बुगडे आहेत.

ह्या मालिकेत मराठी रंगभूमीवरील कलाकार येतात आणि त्यांच्या आगामी चित्रपटाची किंवा नाटकाची माहिती देतात. ह्या मालिकेची मध्यवर्ती संकल्पना थुकरटवाडी या गावातील घडणार्‍या गमतीजमतींवर आधारित आहे. थुकरटवाडी गावाच्या सरपंचांच्या हस्ते गावात आलेल्या पाहुण्यांचे सत्कार होतात, सरपंचांचे विनोदी भाषणही ऐकायला मिळते. थुकरटवाडी गावाचा पोस्टमन आलेल्या पाहुण्या कलाकारांसाठी त्यांच्या नातलगांनी पाठवलेली पत्रे घेऊन येतो आणि विशिष्ट शैलीत ती वाचूनही दाखवतो. ह्या थुकरटवाडी गावात खटले सुद्धा भरवले जातात, यात कलाकार पाहुण्याला गुन्हेगार ठरवून त्यांच्यावर खटला चालवला जातो. न्यायाधीश म्हणून भारत गणेशपुरे व सरकारी वकील सागर कारंडे भूमिका साकारतात.

प्रमुख कलावंत व भूमिका[संपादन]

 • निलेश साबळे : निलेश फक्त प्रसिद्ध नट नाही तर तो एक चांगला विनोदी लेखकही आहे. ह्या कार्यक्रमात त्याची भूमिका कॅफेचा मालकाची आहे. येथे तो कलाकारांशी संवाद साधतो.
 • भारत गणेशपुरे : थुकरटवाडी गावाचे सरपंच, तसेच न्यायाधीश, तर कधी श्रेया बुगडेच्या नवर्‍याच्या भूमिकेत पाहायला मिळतात.
 • सागर कारंडे : सरकारी वकिलाच्या, तसेच पोस्टमन व प्रहसनानुसार स्त्री भूमिकेत दिसतात.
 • भालचंद्र कदम (भाऊ कदम) : निलेशच्या वडिलांची भूमिका करतात. त्यांना कधीही लोंकाची नावे लक्षात राहत नाहीत, त्याबाबतीत ते नेहमी नवा गोंधळ करतात. विनोदी प्रहसनानुसार त्यांची भूमिका बदलत राहते.
 • श्रेया बुगडे : ह्यांनी खेड्यातील मुलीची म्हणजे सरपंचांच्या मुलीची भूमिका साकारली आहे. कधी कधी त्या पत्रकार, हायस्कूल टीचर यांच्या भूमिका साकारताना दिसतात.
 • विनीत भोंडे : ह्या मालिकेतला एक कलाकार. अन्य क्लाकारांपेक्षा सगळ्यात कमी उंची ह्या कलाकाराची आहे.
 • अंकुर वाढवे : ह्या मालिकेतील हा एक कलाकार आहे. या कलाकाराची उंची इतर कलाकारांनपेक्षा सगळ्यात कमी आहे.

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ[संपादन]

 1. http://www.zeemarathi.com/shows/chala-hawa-yeu-dya
 2. http://www.zeemarathi.com/shows/chala-hawa-yeu-dya
 3. http://timesofindia.indiatimes.com/tv/trade-news/marathi/CHYD-completes-100-episodes/articleshow/48281229.cms
 4. http://www.zeemarathi.com/shows/chala-hawa-yeu-dya
 5. http://www.zeemarathi.com/shows/chala-hawa-yeu-dya/character/nilesh-sable
 6. http://www.zeemarathi.com/shows/chala-hawa-yeu-dya/character/bhalchandra-kadam
 7. http://www.zeemarathi.com/shows/chala-hawa-yeu-dya/character/shreya-bugade
 8. http://www.zeemarathi.com/shows/chala-hawa-yeu-dya/character/bharat-ganeshpure