एका लग्नाची तिसरी गोष्ट
एका लग्नाची तिसरी गोष्ट ही झी मराठी वरील लोकप्रिय मालिका होती. यात उमेश कामत, स्पृहा जोशी यांनी अभिनय केला आहे.
एका लग्नाची तिसरी गोष्ट | |
---|---|
दिग्दर्शक | विनोद लव्हेकर |
कलाकार | उमेश कामत, स्पृहा जोशी |
भाषा | मराठी |
वर्ष संख्या | १ |
निर्मिती माहिती | |
चालण्याचा वेळ | सोमवार ते शनिवार रात्री ०९:०० वाजता |
प्रसारण माहिती | |
वाहिनी | झी मराठी |
अधिक माहिती | |
आधी | जुळून येती रेशीमगाठी |
नंतर | फू बाई फू / अस्मिता |
एका लग्नाची तिसरी गोष्ट ही २०१३ मध्ये झी मराठी वाहिनीवर प्रक्षेपित झालेली मालिका आहे. याआधी याच वाहिनीवर एका लग्नाची दुसरी गोष्ट ही मालिका प्रसारित झाली होती. त्या अनुषंगाने या मालिकेचे नाव एका लग्नाची तिसरी गोष्ट असे होते. या मालिकेची निर्मिती श्रीरंग गोडबोले यांनी इंडियन मॅजिक आय प्रा.लि. या निर्मितीसंस्थेद्वारा केली होती. या मालिकेचे कथानक नर्मविनोदी असल्याने ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. २०१५ मध्ये ही मालिका मिले सूर मेरा तुम्हारा या नावाने हिंदीमध्ये डब करुन झी टीव्ही वाहिनीवर प्रसारित करण्यात आली होती.
कथानक [संपादन]
ही मालिका ओम चौधरी (उमेश कामत) व ईशा देशमुख (स्पृहा जोशी) या दोन वकिलांची प्रेमकथा आहे. ईशा ही एकत्र कुटुंबात वाढलेली मुलगी आहे. तर ओम हा त्याच्या आई-वडिलांचा लहानपणीच घटस्फोट झाल्याने वसतिगृहात वाढलेला मुलगा आहे. मात्र योगायोगाने काही माणसं त्यांच्या आयुष्यात येतात व तो त्यांना त्यांच्या घरात सामावून घेतो. त्यांचे एक अनौपचारिक कुटुंब तयार होते. मात्र ईशा-ओमच्या लग्नासाठी ईशाच्या आजोबांची अट असते की ओमचे सख्खे नातेवाईक एकत्र यायला हवेत. मानलेली नाती असलेल्या कुटुंबामध्ये ईशाचे लग्न होणार नाही. तेव्हा ईशा ओमच्या खर्या नातेवाईकांना एकत्र आणण्याचे आव्हान स्वीकारते. त्यात ती यशस्वी होते की नाही याचीच गोष्ट म्हणजे एका लग्नाची तिसरी गोष्ट ही मालिका आहे.
कालावधी[संपादन]
या मालिकेचे प्रक्षेपण झी मराठी वाहिनीवर दि.१४ ऑक्टोबर २०१३ रोजी सुरु झाले. या मालिकेचे एकूण २७१ भाग प्रसारित झाले व या मालिकेचा शेवटचा भाग दि.१६ ऑगस्ट २०१४ रोजी प्रसारित झाला.
मालिकेचे तंत्रज्ञ[संपादन]
कथा – श्रीरंग गोडबोले
पटकथा – चिन्मय मांडलेकर, संदेश कुलकर्णी
संवाद – सागर देशमुख
वेशभूषा, रंगभूषा – गीता गोडबोले
दिग्दर्शक – विनोद लव्हेकर
पात्रपरिचय[संपादन]
१) उमेश कामत – ओम चौधरी
२) स्पृहा जोशी – ईशा देशमुख
३) मोहन जोशी – दत्ताराम
४) शुभांगी गोखले - शोभना
५) शुभा खोटे – प्रमिला देसाई
६) आरती वडगबाळकर - मधू
७) सागर तळाशीकर – (ओमचा काका) रणजित चौधरी
८) संदेश कुलकर्णी - जयेश
९) स्नेहा माजगावकर - धनश्री
१०) रमेश मेढेकर – कामत आजोबा
११) तुषार दळवी – ओमचे बाबा (अजित चौधरी)
१२) शिल्पा तुळसकर – ओमची आई
१३) मिलिंद फाटक – उल्हास प्रधान
१४) सुनील अभ्यंकर- श्रीकांत ब्रह्मे
१५) मोहन आगाशे – ईशाचे आजोबा
१६) अनिता दाते-केळकर – अश्विनी केतकर
१७) अजित केळकर – ईशाचे बाबा
१८) उमा सरदेशमुख – ईशाची आई
१९) सुदीप मोडक - सागर
संगीत[संपादन]
शीर्षक गीत – संदीप खरे
शीर्षक संगीत – सलील कुलकर्णी
गायक – सचिन पिळगावकर, अंजली कुलकर्णी
पार्श्वसंगीत – अभिजित पेंढारकर
गीत (वेडे मन) – श्रीरंग गोडबोले
संगीत (वेडे मन) – सुखदा भावे-दाबके
गायिका – जुईली जोगळेकर