तुझ्यात जीव रंगला

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
तुझ्यात जीव रंगला
दिग्दर्शक अनिकेत अरुण साने
निर्माता स्मृती शिंदे
निर्मिती संस्था सोबो फिल्म्स
कलाकार अक्षया देवधर, हार्दिक जोशी
थीम संगीत संगीतकार ए.व्ही. प्रफुल्लचंद्र
संगीतकार ए. व्ही. प्रफुल्लचंद्र
देश भारत
भाषा मराठी
निर्मिती माहिती
चालण्याचा वेळ सोमवार ते शनिवार सायं. ०७:३० वाजता
प्रसारण माहिती
वाहिनी झी मराठी
प्रथम प्रसारण ०३ ऑक्टोबर २०१६ –
अधिक माहिती
आधी मिसेस मुख्यमंत्री
नंतर माझ्या नवऱ्याची बायको

तुझ्यात जीव रंगला ही एक भारतीय रोमॅंटिक दूरचित्रवाणी मालिका आहे जिची निर्मिती सोबो फिल्म्सने केली आहे. झी मराठी वाहिनी आणि झी ५ डिजिटल प्लॅटफॉर्मवर ही मालिका सोमवार ते शनिवार सायंकाळी ७:३० वाजता प्रसारित केली जाते. ही मालिका २१ ऑक्टोबर २०१९ ते २७ मार्च २०२० या काळात सायंकाळी ६:३० वाजता प्रसारित केली जात होती. [१]

कलाकार[संपादन]

 • हार्दिक जोशी = रणविजय प्रतापराव गायकवाड (राणादा)
 • अक्षया देवधर = अंजली रणविजय गायकवाड किंवा अंजली दिनकर पाठक (अंजलीबाई)
 • धनश्री काडगांवकर = नंदिता सूरज गायकवाड किंवा नंदिता उत्तमराव जाधव (ताईसाहेब)
 • राज हंचनाळे = सूरज प्रतापराव गायकवाड (सनीदा)
 • छाया सागावकर = गोदावरी (गोदाक्का)
 • मिलिंद गणेश दास्ताणे = प्रतापराव गायकवाड (आबा)
 • अमोल नाईक = बरकत
 • दीप्ती सोनवणे-क्षीरसागर = चंदा
 • श्रुती कुलकर्णी = रेणुका
 • प्रफुल्ल उर्फ पप्पू गवस = महाजन मास्तर
 • रुद्र राकेश रेवणकर = बाल राणा
 • सिद्धेश मुकुंद खुपरकर = बाल सूरज
 • बाळकृष्ण शिंदे = इन्स्पेक्टर संग्राम मोहिते
 • = माधुरी सूरज गायकवाड
 • = माननीय परेश पाटील
 • = निवृत्ती नाईक
 • वाग्मी अमेय शेवाडे = राजलक्ष्मी रणविजय गायकवाड
 • श्रेयस संजय मोहिते = युवराज सूरज गायकवाड
 • = सरपंच अवधूत

मालिकेची रुपरेषा[संपादन]

तुझ्यात जीव रंगला ही राणा-अंजलीची प्रेमकथा आहे. राणा एक शेतकरी आणि कुस्तीपटू आहे, तर अंजली उच्चशिक्षित शालेय शिक्षिका असून नुकतीच ती गावात स्थायिक झाली आहे. त्यांची मानसिकता, संगोपन आणि जीवनशैलीतील फरक त्याचवेळी त्यांची प्रेमकथा गोड आणि गुंतागुंतीची बनवते. गायकवाड घराण्याच्या दोन सूनबाई, अंजली आणि नंदिता यांच्यात होणाऱ्या भांडणावरही या कार्यक्रमात भर देण्यात आला आहे.

सारांश[संपादन]

रणविजय गायकवाड उर्फ राणा दा हे प्रतापराव गायकवाड यांचा थोरला मुलगा आहे. प्रतापराव गायकवाड हे गावचे एक मोठे राजकीय व्यक्तिमत्त्व आणि महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री आहेत. राणा एक कुस्तीपटू आणि शेतकरीही आहे. तो शाळेत कधीच गेला नसल्यामुळे तो अशिक्षित आहे. कुस्तीपटू असल्याने तो कुस्ती समुदायाच्या नियमांचे तो पालन करतो. त्या नियमांनुसार त्याने स्वतःच्या नातेवाईकांव्यतिरिक्त कुठल्याही महिलांशी बोलू किंवा संपर्क साधू नये असाही एक नियम आहे. [२] राणा यांचा एक छोटा भाऊ सूरजसिंग गायकवाड उर्फ सनी दा आहे. सूरज हा एक व्रात्य आणि वाया गेलेला आहे. मुख्यत: आपल्या मद्यपानाच्या वाईट सवयीमुळे तो गावात कुप्रसिध्द आहे. गावातल्या इतर गुंडासह गावात भटकणे आणि फक्त फुशारक्या मारण्यासाठी पार्ट्या देणे त्याला पसंद आहे. सूरजने नंदिताशी लग्न केले आहे. ती एक श्रीमंत राजकीय जाधव कुटूंबातील असल्याने ती अत्यंत अहंकारी दाखवली आहे. गायकवाड कुटुंबावर संपूर्ण नियंत्रण नंदिताला हवे आहे म्हणून तिचा प्रत्येक डाव राणाचे लग्न न होऊ देण्याकरिता असतो. राणाने लग्न केले तर आपोआपच मोठ्या मुलाची पत्नी म्हणून राणाची बायको कुटुंबाची प्रमुख स्त्री होईल, अशी भीती तिला वाटत असते.

अंजली एक अतिशय हुशार आणि उच्च शिक्षित शहरात मुलगी आहे. या गावात तिला शालेय शिक्षिका म्हणून नियुक्त केले आहे. तिचे वडील बॅंक कर्मचारी असतात आणि या गावात त्यांची बदली झालेली असते. वडील व आईसमवेत अंजली या गावात आनंदाने राहत असते. एक चांगला दिवस तिची राणाशी भेट होते आणि त्यांच्या प्रेमाची सुरुवात मैत्रीपासून होते. [३][४]

या मालिकेचा नंतरच्या भागात नंदिता आणि अंजली यांच्यातील मत्सरावर केंद्रित आहे. यात राणा दा यांचे बालपण आणि लग्नाआधी नंदिताचे आयुष्यवर फ्लॅशबॅक देण्यात आले आहेत.

पुनर्निर्मिती[संपादन]

ही मालिका अनेक भाषांमध्ये पुन्हा तयार केली गेली.

भाषा नाव वाहिनी प्रकाशित
तामिळ रेक्का कट्टी परकडूधू मनसु
றெக்கை கட்டி பறக்குது மனசு
झी तामिळ १९ जून २०१७ - २४ मे २०१९
कन्नड जोडी हक्की
ಜೋಡಿ ಹಕ್ಕಿ
झी कन्नड १३ मार्च २०१७ - ५ जुलै २०१९
मल्याळम अलियायंबल
അല്ലിയാമ്പൽ
झी केरलाम् २६ नोव्हेंबर २०१८ – चालू
तेलुगू फिदा (अलियायंबलने केलेला अनुवाद)
ఫిధా
झी तेलुगू २८ जानेवारी २०१९ - चालू
हिंदी तुझ संग प्रीत लगाई (तुझ्यात जीव रंगलाने केलेला अनुवादित) झी अनमोल १ मे २०१९ - चालू

संदर्भ[संपादन]

 1. ^ "Zee Marathi". 2017-01-10 रोजी पाहिले.
 2. ^ "Riveting beauty of Kolhapur on TV - Times of India". The Times of India. 2017-01-10 रोजी पाहिले.
 3. ^ "A new love story on small-screen - Times of India". The Times of India. 2017-01-10 रोजी पाहिले.
 4. ^ "हुरडा पार्टीच्या निमित्ताने गायकवाड कुटुंबाचा भाग होणार अंजली?". Loksatta. 2016-12-23. 2017-01-10 रोजी पाहिले.