झी फाईव्ह

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

झी फाईव्ह ही एसएसएल ग्रुप आणि सहाय्यक कंपनी झी एंटरटेनमेंट एंटरप्राइजेज लिमिटेड यांची एक व्हिडिओ डिमांड वेबसाइट आहे.

हे १२ भाषांमध्ये (उदा., मराठी, हिंदी, इंग्रजी, तामिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम्, उडिया, बंगाली, गुजराती, पंजाबी, भोजपुरी) १४ फेब्रुवारी २०१८ रोजी भारतात लाँच केले गेले. झी फाईव्ह मोबाइल अ‍ॅप इतर डिव्‍हाइसेससह वेब, अँड्रॉइड, आयओएस, स्मार्ट टीव्हीवर उपलब्ध आहे. झी फाईव्हचे डिसेंबर २०१९ मध्ये महिन्याला ५६० लाख सक्रिय वापरकर्ते होते.